राजा-राणी चोर-शिपाई

Submitted by ओजसउवाच on 5 December, 2017 - 05:34

आपल्या देशाबाहेर होणाऱ्या भाषणांमध्ये अनेकदा तरुण पिढी कशी समंजस आहे, किती समजूतदार आणि हुशार आहे, असे वर्णनं केले जातात.
जगात भारत हा असा देश आहे जेथे मेजॉरिटी हि तरुणांची आहे.
पण तरी देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चांमध्ये तरुण वर्गाची मतं लक्षात घेतली जातात?
कि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्या यांवर फक्त केस पांढरे झालेल्यांचाच अधिकार आहे?
या विषयावर थोडा प्रकाश टाकून बघायचा एक प्रयत्न.
आपल्या समाजात अनेक प्रकारची लोकं असतात,
हे या समाजचं जितकं दुर्दैव आहे तितकंच भाग्य सुद्धा.
सगळेच शाळेत जातात, काहींना गणित आवडतं, काहींना भाषा आवडते पण इतिहास हा विषय सगळ्यांसाठीच किचकट आणि कंटाळवाणा आहे.
मग सगळ्यात जास्त कॉप्या इतिहासाच्या विषयात होतात.
पुढे जाऊन कुणी इतिहास या विषयावर phd करतं तर कुणी कायमची लाथ मारून तो बाजूला ठेवतं.
इतिहासाला लाथ मारून बाजूला ठेवणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात,
त्यातला एक प्रकार म्हणजे, इतिहास न नाकारता तो कंटाळवाणा वाटतो म्हणून बाजूला ठेवणं आणि दुसरा प्रकार म्हणजे, इतिहास या विषयाला थेट धर्म,अहंकार, आत्मसन्मान अश्या गोष्टींमधून बघणं.
या दुसऱ्या प्रकारातले बऱ्याचदा घोषणाबाजी करणारे अशिक्षित कार्यकर्ते होतात, नाहीतर निर्बुद्ध राजकारणी.
मग आमचा राजा आमची राणी म्हणत बोंबलत फिरायला हे अशिक्षित मोकळे असतात.
इतिहास कळालेला नसतो, म्हणून यांनी यांचाच एक वेगळा स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास तयार केलेला असतो.
हि गोष्ट बालपणातील राजा राणी चोर शिपाई या खेळाइतकीच बालिश असते.
अश्याना एक धर्म असतो, सतत दुखावणाऱ्या भावना असतात, सतत ठणकत राहावे असे अध्यात्माचे गढू सुद्धा असतात,
जे वार्याप्रमाणे अनेकदा ठणकत असताना आपल्याला दिसतात.
कधी भावना दुखावतील, कुणावरून दुखावतील याचा अंदाज घेणं सुद्धा कठीण असतं.
गम्मत म्हणजे यांच्या राज्याचा यांच्या राण्यांचा अपमान कसा कधी कोठे होऊ शकतो हे यांनी ठरवलेलं असतं.
कारण इतिहासातल्या राज्यांचा राण्यांच्या हक्क हा फक्त अश्याच अशिक्षितांनी घेतलेला असतो.
यांच्यासाठी यांच्यामते शिक्षित वर्ग बिचारे अडाणी असतो, कलाकार हे नेहमीच धर्माच्या विरोधात असतात, आणि अश्याना राज्याबद्दल किंवा धर्माबद्दल अजिबातच प्रेम नसते अशी यांची मानसिकता असते.
(हे दुर्दैव, इतिहासाचं म्हणावं?समाजाचं म्हणावं कि ह्यांची ज्या राज्यावर-राणीवर, धर्मावर मालकी आहे त्या संस्कृतीचं?)
आता बघा ना,
सध्याचं उदाहरण घेऊयात तर भन्साळींचा "पद्मावती" नावाचा सिनेमा.
१५० करोड बजेट आहे म्हणे... असणारच, राजपुतांची शान दाखवायची म्हणजे साधं काम नाही.
पण राजपुतांची शान वगैरे हे आम्ही ट्रेलर मध्येच सध्या बघतोय.
आणि दुसरीकडे, या सिनेमाचा
नाक कापू, शीर कापू अश्या भाषेत विरोध चालू आहे, आणि सिनेमा काही केल्या रिलीज होऊ शकला नाही.
विरोध करणारे हे कित्ती शिक्षित आहेत हा मुद्दा कुणीही फारसा लक्षात घेतला नसावा.
याचे फळं आम्ही तरुण रसिक वर्ग भोगतोय.
ज्या समाजाला, एका स्त्री चा आदर ठेवता येत नाही तो समाज राणीच्या मान आणि अपमानाबद्दल पेटून उठतो हे किती हास्यास्पद आहे?
यात स्त्रिया सुद्धा असणं म्हणजे अजूनच भयंकर.
धर्म-इतिहास या गोष्टी कलेतून बघताना बदलतात या सध्या गोष्टींचा विचार करण्याची अक्कल आपल्याला एकविसाव्या शतकात नसणं म्हणजे कल्याण च कल्याण लिहिलंय आपल्या भविष्यात.
हा मुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे हि गंभीरता फारशी दिसत नाही.
नको ! अभिव्यक्ती स्वतंत्र्य या बद्दल कुणी लिहिणं म्हणजे देशद्रोही वगैरे हा आरोपच नको.
अरे हो!! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून आठवलं,
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे, ज्याला जे वाटतं ते म्हणण्याचा आणि करण्याचा अधिकार आहे.
पण या सगळ्याची सुरुवात होते ती साक्षरतेमधून.
हे आजच चित्र बघून वाटतंय कि प्रत्येक साक्षर माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ माहीतच असतो असं नाही.
मुळात साक्षर म्हणजे, लिहिता वाचता येणारा, हा उथळ विचार समाजात प्रसिद्ध जरी झालेला असला तरी,
साक्षरतेची खरी व्याख्या म्हणजे, जे लिहिलंय,जे दिसतंय ते नुसतं कळण्यापेक्षा समजून घेणे, अशी आहे.
हा विषय बाजूला ठेऊ!
भारत हा देश तरुणाचा देश म्हणून मानला जात असला तरी तरुणांचं,अश्या विषयांबद्दल मत हे गृहीतच धरलं जात नाहीये.
मुळात ज्या तरुणांना पुढे करून भारताचे कौतुक केले जाते, त्यांच्या मातांना काडीची किंमत मिळत नाही.
हा तरुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. असं माझं प्रामाणिक मत आहे.
सिनेमा बघायला जाणाऱ्या वर्गापैकी तरुण हे जास्त आहेत, जे अश्या गोष्टींच्या बाबतीत अत्यंत चांगला विचार करताय या कडे कुणाचंच लक्ष नाहीये.
मी काय बघायचं आणि काय नाही याचा अधिकार माझ्या संस्कृतीला आहे तो अधिकार जर या अश्या सतत भावना भडकणाऱ्या अशिक्षितांच्या हाती गेला तर मात्र
वर्तमानाचा एक वाईट इतिहास आपली पुढची पिढी वाचेल तो सुद्धा "आपला मानून" आणि आपला राजा सुद्धा कुठल्याही गोष्टीला विरोध करणारा, आणि अभिव्यक्तीचा खून करणारा क्रूर राजा होऊन बसेल.
आणि तसंही एका २,२:३० तासाच्या सिनेमा मुळे, आपल्या धर्माचा, आपल्या पूर्वजांचा अपमान होतोय असं वाटत असेल तर मग आपण ऑलरेडी आपल्या संस्कृतीचे नाक कापायला आणि इतिहासाचे शीर कापायला सुरुवात केली आहे असे समजूयात.

ओजस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरंच विस्कळीत वाटलं. आधी वाटलं की जनरल लिहिलं आहे की राजाराणीचोरशिपाई खेळाप्रमाणे आजच्या तरुणांपुढे राजकारणात शिरलेले चोर (दुषप्रवृत्ती) नीट निरीक्षण करून वेचायचं चॅलेंज आहे पण नंतर लक्षात आलं की सगळा रोख पद्मावती सिनेमावर आलेल्या बंदीवर आहे. मग शीर्षकात ते चोर शिपाई कश्यासाठी?

होय, कुठेतरी इतक्या लहानश्या गोष्टींना डोक्यावर चढवले जाते, हे कुठेतरी "मला" बालिश वाटते म्हणून असे शीर्षक दिले Happy