माझी एक भयाण आठवण

Submitted by मिनल हरिहरन on 4 December, 2017 - 01:34

नमस्कार , मी मीनल .. खरंतर मला लिहायची वैगरे काही सवय नाही आहे.. पण आज मुद्दाम पर्यंत करत आहे.. आणि हो लिहायची सवय म्हणजे लेख वैगरे लिहायची सवय नाहीये.. पण मला वाचायला प्रचंड आवडत.. अगदी लहानपणा पासून.. म्हणजे लहानपणी घरी मिळतील, असतील,येतील ती सगळी पुस्तक मी वाचायचे.. देवाच्या पोथ्यांचे कथासार ,मग बहिणींचे पुस्तक ,झालाच तर उन्हाळ्याच्या सुट्टीत कॉलोनी तील पुढील वर्गाच्या मुलीचे पुस्तक आणून ते सुद्धा मी वाचायचे.. आणि घरी कोणी खूप पुस्तक प्रेमी नव्हतं त्यामुळे..आणि एकंदर हौस किंवा छंद म्हणून पुस्तक मिळणं शक्यच नव्हतं ..अर्थात आर्थिक परिस्थिती सुद्धा माध्यम वर्गीय...असो मग आमच्या समोरच्या जोशी काका न कडे जाऊन पुस्तक वाचायचे..कारण काका प्रॉफेसर आणि त्यांची मुलगी माझ्या पेक्षा थोडीच लहान त्यामुळे त्याच्या कडे बरीच लहान पणी वाचण्यासारखी पुस्तके होती मग काय त्यांच्या कडे जाऊन..साने गुरुजींच्या घामाची फुले, सोराब आणि रुस्तम,करूणादेवी..अशी बरीच पुस्तक वाचली ... घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांनी काही पैसे दिले (म्हणजे तसे आपल्याकडे देतात..खाऊसाठी ) पण माझा खाऊ म्हणजे पुस्तक.. आता आठवत पण नाही पण बरीच अशी पुस्तक मी वाचली आहेत.. पण ह्यामुळे काय झाले मी कधी मित्र / मैत्रिणी जमवू शकले नाही.. आणि खेळात तर फुसका किंवा कच्चा लिंबूच राहिले ...

माझ्या आठवणी हाच माझ्या ह्या लेखाचा विषय कारण कधीतरी खूप आठवणी येतात आणि तश्याच विरून जातात ... एक अशीच आठवण.. माझी आई शिक्षिका आणि आई नोकरी करत असली कि ती मुलांच्या वाटेला खूप कमी येते म्हणजे त्यांना हवी तेवढी येत नाही...माझ्याही बाबतीत तेच त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आईला सोडत नसे... असाच एकदा आई कोणातरी नातेवाईकांना भेटायचं म्हणून धुळ्याहुन नाशिक ला निघाली होती.. मग मी ही आई बरोबर तीच शेपूट असल्या प्रमाणे निघाले.. तसे आईचे बरेच नातेवाईक नाशकात आहेत नेमकं आम्ही तेव्हा कोणाला भेटलो ते आठवत नाही.. पण संध्याकाळी मी आणि आई नाशिक हुन त्रंबकेश्वराला पोहचलो .. तिथे माझी आतेबहीण राहत होती ... जी तिथल्या गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये nurse होती .. साधारण संध्याकाळी ६ वाजता आम्ही त्रम्बक ला पोहचलो .. त्रंबकेश्व्यरच दर्शन घेऊन.. आम्ही आते बहिणीच शोध घेतला कारण ती तिथे गव्हर्मेंट quarter मध्ये राहते हे माहित होत पण नेमकं कुठे ते माहित नव्हतं आणि हि गोष्ट साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे मोबाइल वैगरे नव्हतेच सहज .. मग तिचा शोध घेत आम्ही तिच्या रूम पर्यंत पोहचलो पण quarter बंद मग बाजूला चौकशी केली ते म्हणाले येईल एव्हढ्यात वैगरे ..मग तिथेच तिची वाट पाहत थांबलो ..त्या quarter च्या भोवतीच वातावरण काहीस गूढ वाटत होत का ते माहित नाही पण ती वेळ तशी असेल म्हणून कदाचित .. साधारण ९. ३० पर्यंत वाट पहिल्या नंतर
आम्ही शेजारच्या quarter मधील एका तरुण काकुंशी बोललो त्यांच्या मते ती म्हणजे माझी आतेबहीण बहुधा नाशिकला निघून गेली असावी .. मग आमच्या पुढे प्रश्नचिन्ह ?? आता काय .. कारण नाशिक किंव्हा धुळ्याला आता बसने रात्रीच जाणे शक्य नव्हते मग बहुधा आई ने आणी त्या काकूंनी विचार करून त्या काकूंन कडे राहण्याचे ठरवले .. पण का ते माहित नाही त्या गूढ आणि वेगळ्याच वाटणाऱ्या ठिकाणी आतून खूप शब्दयात न मांडता येणारी अस्वस्थता होती.. ती रात्र जी मी आणि माझी आई कधीच विसरू शकणार नाही .. आम्ही त्या काकूंच्या घरात प्रवेश केला .. पाणी वैगरे घेऊन मी अल्मोस्ट झोपायला आल्याने त्यांनी आमची त्यांच्या हॉल मध्ये व्यवस्था केली म्हणजे एक सतरंजी दिली .. मग अचानक त्या काकूंचे यजमान आले आणि कोणाशी काहीही न बोलता आतल्या खोलीत निघून गेले ज्यांना नतर आम्ही कधीच पाहिलं नाही.. ते परत बाहेर आलेच नाही .. काकू सुद्धा आत गेल्या बहुधा त्यांनी आतला दरवाजा बंद केला मग कुठलाही आवाज नाही.. एक भयाण शांतता.. ते quarter ,तो परिसर ,त्या आवारात असलेलं प्रचण्ड मोठ वडाच झाड .. आणि इतक मोठ झाड असूनही कुठलीच सळसळ नाही.. सगळीच स्तब्धता .... पण झोप येत असल्याने आणि थकल्याने आम्ही दोघी तशात झोपलो पण रात्री अचानक काही तरी खूप अंगावर येत होता डांस सारखं पण ते डास नक्कीच नव्हते आणि आई तिच्या पदराने ते हाकल्याण्याचा प्रयन्त करत होती.माझ्या आजोबा पासून आमच्या घरात दत्तबावनी म्हणायचं प्रघात आहे , आई तीच दत्तबावनी गुणगुणत होती . माहित नाही ज्या रात्रीची कधीच सकाळ होणार नाही असे वाटत होते कदाचित घरी धार्मिक वातावरण असल्याने किव्हा अजून काही त्या रात्रीची प्रचंड भयाण अवस्थे अंतर सकाळम्हणजे पहाट झाली आणि मी आणि आई त्या काकूंना सांगून निघण्यासाठी बरेचदा त्यांच्या खोलीचं दार वाजवून पहिले पण कुठलाही प्रतिसाद न आल्याने .. प्रचंड वेगाने बस स्टॅन्ड कडे निघालो.
आजही कळत नाही की ते काय होत, त्या काकू,ते काका, ते quarter ,ती भयाण शांतता , आणि सकाळीं खूप दार वाजवून ही त्या काकूंनी दार ना उघडणे ..आणि भेट झ्याल्यावर आते बहिणीने सांगणे कि ते quarter बंदच आहे.. तेथे कोणी राहत नाही ...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनुभव भयानक आहे.
पण सुरुवातीला स्वतःच्या वाचनाबद्दल का लिहिलं आहे?

आजही कळत नाही की ते काय होत, त्या काकू,ते काका, ते quarter ,ती भयाण शांतता , आणि सकाळीं खूप दार वाजवून ही त्या काकूंनी दार ना उघडणे ..आणि भेट झ्याल्यावर आते बहिणीने सांगणे कि ते quarter बंदच आहे.. तेथे कोणी राहत नाही ... >>> आतेबहिणीला तीथे तसा काही अनुभव आला का ?? किंवा ईतर कुणाला??

ह .. कारण खर तर मी काही लिहिण्याची पहिलीच वेळ ... म्हणून जस सुचत होत तस लिहिलं ... धन्यवाद ...सस्मित

कळल नाही, बंद क्वार्टर मधे जाउन राहिलेलात का?
हो म्हणजे आम्ही गेलो तेव्हा ते बंद नव्हतं.. पण ते quarter बंद च होत .. आते बहिणी नुसार .... आणि हा अनुभव आहे .. खूप भयाण प्रकारे अनुभवलेला ... पण नक्की काय हे सांगणं ???

भयानक.
पण लिहीत रहा. तुमच लिखाण चांगल आहे.

मिनल चांगलं लिहिलंय.

अमानविय धाग्यावर टाकण्याची पोस्ट आहे ही +१११ मला पण असंच वाटलं

फारच भयंकर अनुभव अनुभवलात व त्यातून सहीसलामत वाचला सुध्दा
बहुतेक तेथे अमानवीय शक्तीचा वास असेल व ते काका काकु एखाद्या अतृप्त आत्मा सुध्दा असतील.... फक्त दत्तकृपेने तुम्ही वाचलात

ते काका काकु एखाद्या अतृप्त आत्मा सुध्दा असतील
>>>
पटकन असा विचार करणे चूक आहे.
बंद क्वार्टरचा फायदा उचलत बिचारे काकाकाकूंचे गरजू जोडपे तिथे राहत असावे. तरी त्यांनी तुम्हाला न हटकता राहायला दिले. पण जास्त बोभाटा नको म्हणून सकाळी भेटले नाही किंवा आतल्या खिडकीतून रात्रीच पसार झाले. ईतके सिंपल आहे हे.
बाकी नवीन जागी भूतासारखे कोणालाही सहज वाटते. मनाची साहजिक अवस्था आहे ती. भूत तर सोडा, माझा तर कधी कधी देवावरही विश्वास बसतो अश्यावेळी Happy

राहिला प्रश्न त्या वडाच्या झाडाचा. ते का सळसळ करत नव्हते. तर जरा हिंमत करून त्या वडाच्या झाडाखाली झोपला असता तर तुम्हाला ईतर जग स्तब्ध भासले असते आणि ते वडाचे झाड सळसळ करतेय असे वाटले असते.

बाकी पहिलेच लिखाण छान, लिहित राहा.. Happy

अनुभव खतरा आहे..... भिती वाटण्यासारखाच
बाकी तुम्हाला त्या काका काकूंच्या घरी काही सामान दिसले का?

मनाची साहजिक अवस्था आहे ती. भूत तर सोडा, माझा तर कधी कधी देवावरही विश्वास बसतो अश्यावेळी >>>>>

हो..नक्किच म्हणूनच अजूनही ती एक आठवण आहे... न समजणारी ,पण हे निश्चित कि तो अनुभव वेगळा होता ...धन्यवाद ऋन्मेष,

धन्यवाद महेशकुमार ,अंजली _२१,भुत्याभाऊ

तुम्ही नंतर कधीतरी त्या जागेवर जायला हवे होते
नेमकं काय होत त्या परिसरात त्या घरात ते तरी समजलं असतं

जेव्हा आपण एखाद्या भयानक प्रसंगाचा सामना करतो तेव्हा कळतं
भीती आणी भय काय असतं ते