कळी म्हणते ....

Submitted by कोमल मानकर on 1 December, 2017 - 04:24

कळी म्हणते कळीला

कळी म्हणते कळीला 
उद्या मी होईल फुल गळेल मग
पाकळया सार्या नेईल 
कोणीतरी मजला चुरगळून ...
  
किती छान वाटतं जेव्हा कोहळं
हे बालपण पानाच्या गर्द 
हिरवाळाईत डुलतं पण कळीच जेव्हा फुलं होतं
तेव्हा इतराच्या नजरेत भरतं....

स्त्री आणि कळी 
यांचा मिलाप किती जुळतो 
दोघीच्याही वाट्याला खुटून नेण्याच दुख: मात्र
माणसाकडूनच मिळतं....

फांदीवरच्या देठावर फुल नाही रहात
रहातो तो त्या कळीचा संवाद जो  निर्थकळ पण
अर्थपूर्ण वाटतो समजून घेतला ना हा साम्यवाद 
तर काळजाला लागतो ....

शेवटी कळी म्हणते.......
कळीला ,
        चुरगळून नेणार्यां मनमोजीनी
केला हाच एक विचार फांदीला ही 
फुल दिसते कीती छान ....!!

झाड म्हणजे विश्व त्या फुलाचं
गर्दीत नाही त्यांच्या वैफल्य कशाचं
शेवटी फुलं ही देते ना 
फळांना जन्म ..॥

अधोरेखित एक विधीलिखित होते 
पुर्ण इथे  कळीचा संवाद लागू होतो 
स्त्री मनाच्या विश्वव्यापी 
अभुत्वपूर्णांईला जिथे.... 
   

   @ - कोमल प्रकाश मानकर
   
        

Group content visibility: 
Use group defaults