अबिद

Submitted by अविनाश जोशी on 20 November, 2017 - 07:28

अबिद
एक छोटा मुलगा.
खरं म्हणजे शाळेत जायचे , खेळण्याचे वय.
पण अम्मी गेल्यापासून अबूला मदत करायला त्याला घरीच थांबावे लागे.
आटपाडी तस छोटं गाव होत. हजार बाराशेचा उंबरठा असेल. बहुतांशी मुस्लिम,
अबू दफन भूमीचा रखवालदार होता. आठवड्यातून २-३ तरी मयत व्हायच्याच.
दफनभूमीवर बरेच काम असायचे खड्डे तयार ठेवायचे, प्रेत ठेवल्यावर बुजवायचे माती चापून चोपून बसवायची आणि असलेतर थडग्यावर दगड बसवायचे.
अम्मी असताना ती सर्व कामांना मदत करायची पण अम्मी गेल्यापासून अब्बू बिचारा एकटाच पडला. कोणीतरी जोडीदार मिळावा म्हणून त्याने बरेच प्रयत्न केले पण दफन भूमीत येऊन काम करायची कोणाचीच तयारी नव्हती शेवटी अबिद ला शाळा सोडून घरी बसावे लागले.
पावसाळ्याच्या दिवसात तर भरपूर चिखल आणि निसरडे व्हायचे त्यातच सर्व कामे पावसातच करायला लागायची. अबिद अब्बुला भरपूर मदत करायचा. दफनभूमीत आणि घरकामात सुद्धा. दोघांचा एकमेकांवर अतिशय जीव होता.
असेच एका दिवशी एकदम दोन मायती झाल्या. पाऊस पडत असल्यामुळे घाईघाईतच माती ढकलून लोक निघून गेली. त्या बारसातीतही अब्बूनी बऱ्यापैकी मातीने खड्डा भरला. आणि गोळा केलेल्या बाभळीच्या काटेरी फांद्या दोन्ही खड्ड्यावर पसरल्या. कोल्ह्या कुत्र्यांनी उकरा उकरी करू नये म्हणून हा उद्योग. पूर्वी रखवालदाराचे काम सोप्पे असायचे पण आता कोल्ह्या कुत्र्यांबरोबर माणसं ही प्रेत पळवायला लागल्या मुळे अधिकच जिकिरीचे झाले होते.
संध्याकाळी अब्बुला सामानासाठी तालुक्याच्या गावाला जायचे होते रात्री बऱ्याच वेळे पर्यंत अबिद एकटाच त्या दफन भूमीत राहणार होता. त्याला सोबत द्यायला कोणीही येणार नव्हते. अब्बूच्या जायचे जीवावर आले होते पण जाणे भागच होते.
अबिद ला नीट समजावून सांगून अब्बू गेला.
अंधार पडला तशी अबिद ला थोडी भीती वाटली. तो व्हरांड्यातच कंदिला जवळ दफन भूमीकडे आणि अब्बूच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. बसल्या बसल्या कधी पेंग लागली हे त्यालाही कळले नाही. जाग आली ती कुत्र्याच्या भुंकण्यामुळे.
अब्बू येण्याची वेळ झालीच होती. कुत्र्यांनी माती उकरू नये म्हणून अबिद सोटा घेऊन दफन भूमीत धावला.
कुत्र्याच्या मागे लागताना सकाळच्या खड्यात कधी पाय गेला त्याला कळलेच नाही. कुत्रा तर पळून गेले होत. पण अबिद चा पाय मात्र अडकून बसला होता. चिखलात ही आणि काटेरी फांद्यातही. जीवघेणी कळ त्याच्या मस्तकात गेली आणि तो ओरडला. पण त्याच्या मदतीला यायला कोणीच नव्हते. पायाला बरेच लागले आहे हे त्याला कळत होते. जीवाचा आकांत करून त्याने पाय सोडवला आणि रांगत रांगत तो व्हरांड्यात आडवा झाला.
प्रचंड वेदना होत होत्या. अब्बूची वाट पाहण्याशिवाय त्याच्या हातात काही नव्हते.
किती वेळ गेला माहित नाही. त्याला जाग आली तेव्हा अब्बू त्याला उठवत होता. अब्बूनी त्याला उचलून घेतले होते आणि तोही रडत होता. तसाच त्याला घेऊन तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने त्याला स्ट्रेचर वर ठेवले आणि दोघांनी त्याचे पाय स्वच्छ केले. त्याची जखम साफ करून बँडेज बांधले तोपर्यंत अबिद बोलण्याच्या स्थितीत आला होता.
' काय रे अबिद? काय झाले पायाला? अशा कशा जखमा झाल्या?
' खड्यात पाय गेला आणि काटे लागले. 'अबिद'
' अरे पण या खुणा तर कोणीतरी माणूस चावल्याच्या आहेत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

तुमच्या कथा हॉलीवूड मूवी सारख्या असतात....
एक उत्सुकता निर्माण करून तुम्ही शेवट करता... (after all I think this is ur signature)
...तरीही मस्त!