बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

Submitted by अनन्त्_यात्री on 20 November, 2017 - 04:35

|| बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे
….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे
….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे
….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे
...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे
…शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे
…फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
…वास्तवाला तोलणारे यंत्र आहे
… प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे
…अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...

....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

.....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडं आम्हाला द्याल का ? Happy
अप्रतिम आणि अप्रतिमच !
बघ माझ्या झोळीत शब्दांचे जादूगार अनंतजी आहेत !!!! Happy

दत्तात्रयजी, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार!
तृषार्ताने यावे | कितीही प्राशावे
ऐसे हे बरवे | शब्दामृत ||

वाह !

प्रतिसादाला सुध्दा एवढा सुरेख प्रतिसाद !
तृषार्ताने यावे | कितीही प्राशावे
ऐसे हे बरवे | शब्दामृत ||
धन्यवाद !