न वाटे कधी मनातून रात्र ही सरावी

Submitted by प्रशांत तिवारी on 19 November, 2017 - 01:11

न वाटे कधी मनातून रात्र ही सरावी
विवंचनेतून मात्र साऱ्या गात्र ही स्थिरावी
न वाटे...

रुक्ष क्षणातुनी मनास फुंकर ही मिळावी
वेदनेची वाट त्या परिघास छेदून ही यावी
न वाटे...

शल्य या शब्दास मनी परी जागा ही न उरावी
वाटे आयुष्याची दुखरी तान कधी न आळवावी
न वाटे...

अलवार होणाऱ्या जाणिवांची गर्दी ही विसवावी
आगंतुक येणाऱ्या भावनांना वाट मोकळी असावी
न वाटे...

अकल्पित प्रश्नांना वार्धक्याची सावली गवसावी
उत्तरांच्या या गर्दीत आनंदाची लहर ही उमलावी
न वाटे...

चिरनिद्रेस आधीन होण्या भ्रांत ही का पडावी
निमिषा च्या या खेळात सुख दुःखे एकत्र नांदावी
न वाटे...

https://www.facebook.com/prashant.s.tiwari

https://www.youtube.com/channel/UCsvB3X7OV2p7PMjpTEtch3g

Group content visibility: 
Public - accessible to all site users