रातराणी

Submitted by vijaya kelkar on 15 November, 2017 - 09:57

रातराणी
सुवास सांगे मी रातराणी
वाट पहाते येतील राजा नि राणी
नसतील आणिक कोणी
धुंदीत गाती मौन-गाणी
हलकेच दवबिंदू झेलुनी
गुलाब शिंपेल गुलाबपाणी
डवरला कुंद, कळ्या-फुलांनी
वर्षाव करील भरभरुनी
जळात जाळ्यात बंदिनी
एकटीच पण डोले कमळीणी
वदे सखी सुर्यमुखी उमलुनी
देव-वंदनेने सुरु व्हावी दैनंदिनी
विजया केळकर ______
badeejaidevee blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर !!!

नमस्कार ____/\____, दत्तात्रय साळुंके ,आणि धन्यवाद आभिप्रायासाठी