खरच आयुष्य इतक स्वस्त झालय ?

Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 15 November, 2017 - 03:02

आज आपण २१ व्या शतकात वावरत आहे आणि आपला भारत देश महासत्ताक होण्याच्या मार्गावर आहे; आणि अश्या देशातील लोकांना आयुष्य खुप स्वस्त वाटायला लागले आहे.आपल्या देशाला भ्रष्टाचार , गरिबी,कुपोषण ,अंधश्रध्दा याबरोबर आत्महत्या हा प्रश्न देखील खुप भेडसावत आहे.आयुष्याचे प्रश्न भिन्न ,पण उपाय एकच -आत्महत्या ? शेतकरी, विद्यार्थी ,तरूणपिढी किंवा अजून कोणी असू देत, त्यांना त्यांच्या अडचणीवर एकच उपाय सापडला आहे तो म्हणजे आत्महत्येचा. पण खरच आत्महत्येने अडचणी ,प्रश्न सुट्तात कां? त्यांच्या आत्महत्येनंतर दोन - चार दिवस सर्वत्र ओरड होते, मोठे मोठे लोक येऊन भेटतात आणि नंतर मात्र सर्व शांत होते जणू काही झालेच नाही. फरक पडतो तो फक्त त्यांच्या कुटुंबाना , जाणारा तर जातो पण तो घरच्यांसाठी मुळ प्रश्नासोबत अजून असंख्य प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून.
शेतकर्याने बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊन पारंपारीक शेतीला फाटा देऊन , आधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्याने शेती केली तर नक्की फायदा होणार . विद्यार्थ्यांनी नियमीत अभ्यास करून मिळालेल्या गुणांची तुलना न करता आपल्या अभ्यासात सातत्य ठेवावे. प्रत्येकाने इतिहासातील आदर्श डोळ्यासमोर ठेवावे. शिवाजी महाराजांना का कमी अडचणी आल्या असतील स्वराज्याची स्थापना करतांना, त्यांना तर घरच्यांनीच अडचणी आणल्या ; पण प्रत्येकवेळी ते नव्या जोमाने लढले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. अनेक क्रांतीकारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले पण त्यांनी आत्महत्या नाही केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांना तर काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ; आणि हल्लीची पिढी थोडे काही मनासारखे नाही झाले की केली आत्महत्या. खरच आयुष्य आत्महत्या करण्याइतपत स्वस्त झालय का ???
जीवनात आलेल्या अडचणीचे
उत्तर शोधा नव्याने
आयुष्य भरून जाईल आनंदाने
सुटत नसतात प्रश्न आत्महत्येने.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद

धन्यवाद