तेव्हा माणसे आली

Submitted by द्वैत on 13 November, 2017 - 14:55

घराच्या बंद दारा आत तेव्हा माणसे आली
मनीच्या स्वप्नप्रेमा आड तेव्हा माणसे आली

कठीण शी वेळ पाहुनी परस्पर दूर गेलेली
मिळालेल्या यशाच्या साथ तेव्हा माणसे आली

न मिळता हात मदतीचा कुणी रस्त्यात मेला आज
दिवे घेऊन हातोहात तेव्हा माणसे आली

मरो कष्टात अपुली माय मरो कष्टात अपुला बाप
असे धोक्यात अपुली जात तेव्हा माणसे आली

जरी हे चोर खादीतील लुटती नित्यनियमाने
दिली चोरांनी पुन्हा हाक तेव्हा माणसे आली

नका फेडू नवस कुठला म्हणाला देव भक्तांना
ठरवण्या मूर्ख देवालाच तेव्हा माणसे आली

Group content visibility: 
Public - accessible to all site users