"असतेस घरी तू जेव्हां"

Submitted by ओबामा on 13 November, 2017 - 03:55

संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन......

"असतेस घरी तू जेव्हां"
************************************************
असतेस घरी तू जेव्हां
जीव घाबरा घुबरा होतो
जगण्याची विरते आशा
संसार नकोसा होतो
असतेस घरी तू जेव्हां ...../1/

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ग होतो
घराची तावदाने फुटती
अन भितींना कंपही सुटतो
असतेस घरी तू जेव्हां ...../2/

येतात मुले दाराशी,
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून भैय्या
मग कपड्यांवाचून जातो
असतेस घरी तू जेव्हां ...../3/

तुज घाबरून घालविलेल्या
मज स्मरती लाखो वेळा
तव पैशांने घर हे चालते
म्हणूनच तुला ग झेलतो
असतेस घरी तू जेव्हां ...../4/

तू सांग बये मज काय
मी काय करू घरच्यांना
आईचा जीव उदास
बाबांनी अंथरूण धरले
असतेस घरी तू जेव्हां ...../5/

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजूनी झालो
खर्चाचा सगळा हिशोब
मला तुला द्यावाच लागतो
असतेस घरी तू जेव्हां ...../6/

Group content visibility: 
Use group defaults