Making of photo and status : ६. च्यामारी !!!

Submitted by सचिन काळे on 11 November, 2017 - 22:33

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

21761987_1644832735589205_268294796060116008_n.jpgच्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला ?

Disclaimer : सदर लेखामध्ये 'मॉर्डनआर्ट' कलेला कोणत्याही तऱ्हेनं कमी लेखण्याचे लेखकाचे प्रयोजन नाही.

Making of photo and status :
हा! हा!! हा!! ! नेटवर सर्फिंग करत असताना अचानक माझ्या नजरेस हे चित्र पडले. आणि मला खुद्कन हसू आले. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात येणारे विचार, आपली होणारी प्रतिक्रिया किती सुंदर तऱ्हेने ह्या चित्रात रेखाटलेय. जरा बारकाईने चित्रातल्या व्यक्तीकडे पहा बरं!, त्याने कसा हनुवटीवर हात ठेवलाय. त्या हाताला आधार द्यायला दुसरा हात पोटावर कसा आडवा ठेवलाय. त्याचे डोळे कसे गरगरल्यासारखे दिसताहेत. भुवया उंचावल्याहेत. आणि चित्र बघता बघता कसा तो उभ्याने मागच्या बाजूला इतका झुकलाय की आत्ता मागे पडेल की काय असं वाटतंय.

पण कशाने झालीय त्याची ही दारुण अवस्था? तर समोरच्या भिंतीवरील चित्र पाहून झालीय. कल्पना अशी आहे की ती व्यक्ती आर्ट गॅलरीत एक चित्र प्रदर्शन पहायला आलीय, आणि फिरता फिरता ती व्यक्ती अशा एका चित्रापुढे येऊन उभी रहाते, की ज्या चित्रामध्ये फक्त गोल गोल रेषा, वाकडे तिकडे आकार, रंग आणि मधोमध एक मोठ्ठा टपोरा डोळा चित्तारलेला आहे. बरं, चित्रामध्ये कशाचा कशाशी संबंधसुद्धा वाटत नाहीए. चित्रामध्ये फक्त एक डोळा सोडला तर तिच्या ओळखीचं असं काहीही दिसत नाहीए. आणि असं चित्र पाहून ती व्यक्ती पुरती हबकून गेलीय, निराश झालीय.

मॉर्डनआर्टसारखी काही चित्रे अशी असतात, जी समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असतात. ती समजायला दर्दी रसिक आणि त्यातील जाणकारच हवा. सामान्य व्यक्तीला असल्या चित्रात फक्त उभ्या आडव्या रेषा आणि रंग दिसतील. पण दर्दी आणि जाणकार व्यक्तीला त्यामध्ये जीवनाचे सार सापडेल. तर कधी त्यात त्याला विश्वरूपाचे दर्शनसुध्दा घडेल.

हे चित्र पाहिल्याबरोबर मलाही असं वाटलं होतं, की त्या चित्रातली व्यक्ती मीच आहे. आणि समोरील भिंतीवरील समजण्यापलीकडचं असे चित्र पाहून माझीसुद्धा त्या व्यक्तीसारखीच अवस्था झाली होती. ह्या चित्रावर काहीतरी स्टेटस लिहिण्याची उर्मी माझ्या मनात उसळून आली. आणि मग मी लिहिले "च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला!?"

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर भिंतीचा कलर आणि फोटोची फ्रेम सुंदर असेल तर आतले फालतू हुन फालतू चित्र पण सुंदर दिसते हे माझं मत !

जर भिंतीचा कलर आणि फोटोची फ्रेम सुंदर असेल तर आतले फालतू हुन फालतू चित्र पण सुंदर दिसते हे माझं मत !
>>>> माझेपण !
मस्त ☺