ती लाजवाब वाटते

Submitted by द्वैत on 10 November, 2017 - 23:04

ती लाजवाब वाटते

केवडा कधी कधी गुलाब वाटते
मेहफिलीत ती लाजवाब वाटते

हासुनी हे बोलणे लाघवी जरी
लाजताच ती जुनी शराब वाटते

भेटलो अनेकदा तरी कळे न ती
कधी सवाल तर कधी जवाब वाटते

ती परी तिच्यावरी फिदा कितीतरी
आपुलेच प्रेम बेहिसाब वाटते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेटलो अनेकदा तरी कळे न ती
कधी सवाल तर कधी जवाब वाटते

कायमचं भेटलं तरी असच वाटतं राव ?

अप्रतिम
हासुनी हे बोलणे लाघवी जरी
लाजताच ती जुनी शराब वाटते>>> व्वा लाजवाब Happy