सुख [शतशब्दकथा]

Submitted by र।हुल on 9 November, 2017 - 12:30

समीर तालुक्याच्या ठिकाणी कामाला लागला होता. एका प्रशस्त बंगल्याच्या आवारातील रूमवर त्याची राहण्याची सोय होती. गुलाबी थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली त्यात आज सुट्टी असल्याने तो सकाळपासून अंथरुणात लोळत पडलेला. अंग जडावून गेलेलं. इतक्यात त्याला रात्रीच्या मामाच्या फोनची आठवण झाली आणि आळस झटकून लगबगीने त्याने आवरायला घेतलं. उद्या तिला पाठवून देतो असं मामाने सांगितलेलं. तो तिच्या आठवणींत रमला; तिचा स्पर्श, रात्रभराची सुखाची सोबत.. आहाहा! गेल्या तिनचार महिन्यांपासून तो त्या सुखासाठी आसुसलेला. दिवसभर कष्टं केल्याने दमून जायचा; त्यात आख्खी रात्र कुढत काढायची म्हणजे? बरं झालं मामाने तिला पाठवायचं कबूल केलं. आज मस्तपैकी आकाशातल्या चांदण्या मोजत तो झोपणार होता; बाहेर झाडाखाली, बाजेवर!!!

―र।हुल/९.११.१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

गुड

छान. मी अर्ध्यावर थांबलो आणि विचार केला तेव्हा चादर, उशी, घोंगडी, गादी असेच काहीतरी डोळ्यासमोर आले. सध्या मी सुद्धा यांच्याच सोबतीने झोपतो ना Happy

छान.