एक नराधम बरा .....

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 10:02

एक नराधम बरा !

चंदनाचे उन पाणी
त्यात सुगंधीत वाळा
न्हाऊ-माखू घाली माय
डोळ्यामध्ये पावसाळा

मेंदी भरल्या हातात
किणकिणणारा चुडा
सांगे कोवळीशी कळी
जरा सबुरीने खुडा

घरादाराला रिझवी
छुम-छुम पैंजणाची
तिचा मागोवा घेण्याला
आहे भलती कामाची

पेंगुळल्या डोळ्यान्मधे
भरे स्वप्नांचे काजळ
चाली- रिती संस्कारांची
रिती करीत ओंजळ

रसरशीत ओठान्ना
देत मौनाचा मुलामा
माय सुखावे अंतरी
पुरा होता जामानिमा

काळजाच्या तुकड्याला
माय धाडी त्याच्या दारा
दहा कसायापरीस
एक नराधम बरा !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users