फांदी ....

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 09:52

ऐकतोयस ?

तुझ्या भरभक्कम रुंद पुरूषी खांद्यावर
डोके टेकवल्यावर
आजही प्रत्येकवेळी हेच जाणवते ...
.
.
.
स्वछंद वार्याच्या तालावर
झुलणारी डहाळी
कितीही लोभसवाणी दिसली
तरीही
आकाशाला गवसणी घालायचीच तर ..
भक्कम स्थितप्रद्न्य फांदीलाच
दोर बांधला जातो झोक्याचा

नाही ???
.
.

एकतोयस ना ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users