तो ..

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 09:43

तो ...

काळाच्या ओघात
वळीवाच्या गारांसम
क्षणात विरघळणारी
पोकळ वचने

वार्याच्या झोताने
पावसाच्या सरींप्रमाणे
मोर्चा बदलणार्या
तकलादू निष्ठा

गैरसमजाच्या धुक्यात
वाट हरवलेली
भरकटत गेलेली
अनाम नाती

आणि

ती ...!

.
.

तो ....???

तो नाही पडत ह्या फंदात !!!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users