ती तिथे पलिकडे

Submitted by द्वैत on 8 November, 2017 - 06:10

ती तिथे पलिकडे

ती तिथे पलिकडे दिसेल ही हसेल ही
ह्या मनास ओढ जी तिच्या मनी असेल ही

पाहण्यास मी तिलाच रोज वेळ पाळतो
ती ही थाम्बते तिथे तिला खबर असेल ही

मी सदैव गोन्धळात बोलुया न बोलुया
सुचविते ती हासूनी की ते तिला रुचेल ही

बोलते नजर तिची की साथ दे जरा मला
हात दे हातात बघ बळ तुला मिळेल ही

Group content visibility: 
Public - accessible to all site users