पतंग ३

Submitted by सुर्वेप्रतीक on 8 November, 2017 - 00:14

162199.gif
रिया आणि माझी ओळख शाळेत असताना झाली.ती आमच्या शेजारीच राहायला आली होती.आणि माझ्याच शाळेत तिने ऍडमिशन घेतल. हळू हळू आमच्यात चांगली मैत्री झाली .दरोरोज शाळेत एकत्र जायच ,अभ्यास पण एकत्र करायचा .शेजारीच असल्याने आम्ही खळायचो पण एकत्र . जणू काय आम्हा दोघांना एक मेकांची सवयच झाली. आमचा स्वभाव पण मिळत जुळता .तिला सुद्धा कविता करायला आवडतात . इनफॅक्ट ती माझ्या पेक्षाही सुंदरकविता करते. माझी काळजी घ्यायची , सतत माझ्या सोबत रहायचं , मला हवं नको ते बघायचं .हे काय होत आहे ते आम्हा दोघांना सुद्धा समजायचं नाही कारण आम्ही खूप लहान होतो . असच एकदा आम्ही बोलत बसलो होतो आणि तिने सहजच एक कविता म्हंटली
मनातले प्रेम चेहऱ्यावर
दिसू देत नाही ,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाही,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी
कसा ......!!
सांग ना रे सख्या तू असा कसा ......??
तुझ्यावर केलेली कविता हि तू
वाचून नुसता हसतोस ,
वाटलं काही तरी बोलशील पण ,
"छान" बोलून गप्प बसतोस
शांत तुझ वागणं तू romantic
होशीलाच कसा .......!!
सांग ना रे सख्या तू असा कसा ......??
रागावलीच मी तर
तुला मुळीच करमत नाही
माझ्याशी बोलल्याशिवाय
तुला राहवत नाही .
समजून घेते मी तुला
कारण मला हि तू आवडतोस आहे .
तिला मी आवडतो आणि मला ती आवडते .आम्हा दोघांना एक मेकांची सोबत आवडते .प्रेम म्हणजे काय हे माहीतच नव्हत त्या वयात. तिने सुद्धा ते कधी व्यक्त केलं नव्हत आणि मी सुद्धा . पुढे शाळेतलं शिक्षण पूर्ण झालं. आणि रिया पुण्याला शिफ्ट झाली कारण तिच्या बाबांची बदली पुण्याला झाली होती .आम्हा दोघांचा बोलणं आता फक्त फोन वरच होऊ लागल. आमच्यात अंतर जरी वाढल होत तरी आमच relation तसच राहिल होत .पुढे मी कॉलेज ला आलो .तिथे मला तू भेटलीस . तुला बघताच क्षणी मला काय झालं मलाच माहित नाय .तुझं ते माझ्याशी बोलणं, हसणं , मला चिडवणं, सगळं मला आवडू लागल. तुझा सहवास मला आवडू लागला .ह्यालाच प्रेम म्हणतात काय असं वाटू लागल. नक्की काय होतंय हे मलाच समजत नव्हत. जे मला वाटतं होत ते मला तुझ्या डोळ्यात सुद्धा दिसत होत. मग रिया आणि माझ्यात किंवा तुझ्या आणि माझ्यात काय आहे मैत्री का प्रेम ? हाच प्रश्न मला सतत खुणावत होता ? आणि त्या दिवशी अचानक तू Coffe शॉप मध्ये तुझ्या प्रेमाची कबुली दिली. मला समजतच नव्हत कि मी तुला काय उत्तर द्यावं .तेव्हाच रियाचा कॉल आला .आणि मी खूप गोंधळलो . तसाच फोन घेऊन तुझ्याशी उद्या बोलतो असं बोलून मी बाहेर आलो . रियाचा फोन घेतला. तिने सांगितलं कि ती मुंबई ला आली आहे. हीच वेळ आहे रिया ला पल्लवी बद्दल सांगण्याची असं ठरवून मी निघालो . आमची भेट माझ्या घरी झाली . तिच्या बरोबर तिचे बाबा सुद्धा आले होते .मला काहीच समजत नव्हतं कि ते अचानक कसे काय आले . रिया ला विचारल तर ती बोली कि .अरे आज काल माझी तब्येत बरी नसते . तुझ्या बाबांचे इथे ओळखीचे डॉक्टर आहेत ना त्यांना मला दाखवायचं आहे म्हणून आले .आणि सॉरी हा मी तुला येताना कॉल केला नाही .घाई गडबडीत विसरून गेली रे सोन्या .येतोस का रे माझ्या बरोबर उद्या .मला खूप भीती वाटतेय ? मी तिला कस नाही म्हणणार. ह्यात मला तिला जे सांगायचं आहे ते राहवूनच गेलं. उद्या सांगू असं ठरवलं पण नक्की तिला झालं काय आहे हा प्रश्न पडला मला . रिया माझ्या आई बाबाना सुद्धा खूप आवडायची .लहानपणी ती आमच्याकडेच असायची सारखी . त्यामुळे त्यांना तिची सवय झाली होती . दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे हॉस्पिटल ला गेलो . तीच चेकअप झालं . तिचे report आले . सगळे गप्प कोणच काही बोलत नव्हत . आम्ही घरी आलो. घरी आल्यावर समजल कि तू येऊन गेलीस . माझा फोन सुद्धा त्या दिवशी मी बंद करून ठेवला होता . मला माहित होत कि तू मला फोन करशील . पण मी त्या दिवशी खूप disturb होतो . काय चालय काहीच समजत नव्हत.घरी सगळे गप्प बसलेले . तिचे बाबा आतून रडत जरी असले तरी ते दाखवत नव्हते . आई ला विचारल्यावर समजल कि अरे रिया ला Blood cancer झालाय . काय !!!? मी चक्क ओरडलो . माझे बाबा लगेच आत धावत आले मला बोले कि अरे तिला एवढ्यात सांगू नकोस रे . मी तिच्या जवळ गेलो . तिची नजर माझ्यावरच खिळून राहिली होती .जशी काय ती मला काहीतरी विचारतेय . मला तिच्याकडे बघायची सुद्धा हिम्मत होत नव्हती .कसे बसे मी माझे अश्रू लपवत होतो. तेवढ्या तिने माझा हात हातात घेतला .मला माहितीय मला काय झालाय रे वेड्या . पण तू सोबत असताना मला कशाचीच भीती नाही . अशीच साथ देशील ना माझी शेवट पर्यंत ? तिच्या ह्या प्रश्नांनी मी स्वतःला आवरू शकलो नाही आणि मी तिला माझ्या मिठीत घेतल.काय सांगणार मी तिला ह्या वेळी. दुसऱ्या दिवशी ती पुण्याला निघून गेली .
कॉलेज ला आलो. तुझ्याशी काय बोलावं तेच मला समजत नव्ह्त. हळू हळू तुझं सुद्धा बोलणं कमी झालं .कधी कधी वाटलं कि सगळं सांगून टाकावं तुला .पण हिम्मत झाली नाही .काय सांगणार तुला मी ? कारण मलाच माहित नव्हत कि मी नक्की कुणावर प्रेम करतोय ते . पण ह्या मुळे एक मात्र नक्की कि प्रेम काय असत ते समजू लागल. दिवसेन दिवस माझं मन आतून मला खायला लागला . काय करतोयस तू हे ..जा तिला सांग कि तू सुद्धा तिच्यावर प्रेम करतोय . पण हिम्मतच झाली नाही .तुझ्या आठवणी शिवाय माझा एक दिवस हि गेला नाही .रिया आणि माझं phone वर बोलणं व्हायचं . पण तुझ्या बद्दल जे वाटायचं ना ते मला रिया बद्दल कधीच वाटलं नाही. मला समजल कि रिया हि फक्त माझी बेस्ट friend होऊ शकते .जरी तिला आता माझी सगळ्यात जास्त गरज असली तरी. आपलं कॉलेज संपल .मनाला सारखी भीती वाटायची कि तू आता दिसशील कि नाही.या विचाराने खूप अस्वस्थ वाटू लागल. एवढ्या दिवस तू डोळ्यासमोर तरी होती . आता ती हि नसणार. मला हि वेळ जाऊ द्यायची नव्हती .पण रिया ? शेवटी मी माझ्या मनाच ऐकलं . कारण ते तुझं कधीच झालं होत. रियाला हे सगळं सांगावस वाटलं पण तिच्या ह्या अवस्थेत सांगणं मला पटलं नाही.या वेळी मी तिला काहीच सांगू शकत नाही .पण तुला तरी सांगू शकतो माझ्या मनातलं. ठरवलं हि वेळ जाऊ द्यायची नाही .पार्टीत आलो . तुला बघताच क्षणी फक्त तू आणि तू माझ्या डोळ्यासमोर दिसत होती . अखेर मी माझ्या प्रेमाची कबुली दिली .एवढ्या दिवसापासून आतून कोंबून ठेवलेला हा श्वास मी आज अखेर मोकळा केला . हे सगळं ऐकून तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो .कारण आपण दोघे एक मेकांवर खूप प्रेम करतो.पण काही अशा गोष्टी असतात कि आपण त्या बदलू शकत नाही.तेवढ्यात रिया चा कॉल आला . मी कॉल लगेच घेतला.सॉरी मी मगाशी कॉल घेतला नाही .खरंच सॉरी मी म्हणालो .काही बोलू नकोस. माझं फक्त एक माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे .तिच्या आवाजात खूप दमछाक वाटत होती. मागून तिच्या बाबांचा आणि डॉक्टरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता..फोन ठेव तो येईल लगेच. तू आराम कर ..तेवढ्यात बाबांनी फोन घेतला . अरे मनोहर कुठे आहेस रिया ला पुण्यावरून direct हॉस्पिटल ला आणलं आहे . लवकर ये .आम्ही सुद्धा इथेच आहोत . आलो लगेच बाबा असं बोलून मी फोन ठेवला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.सरळ पळत सुटलो . थांब मनोहर "" मागून पल्लवीचा आवाज आला तिच्याहि डोळ्यात अश्रू होते . माझा हात पकडून चल लवकर मी पण येते . आम्ही सरळ दोघे टॅक्सी करून हॉस्पिटल ला पोचलो .तिला ICU मध्ये ठेवलं होत. माझी family आणि तिची family सगळे आले होते . मी नुसता गप्प बाहेरच्या लॉबी मधून आत बघत होतो . पल्लवी माझ्या बाजूलाच उभी होती . पण नियतीने ठरवून ठेवलं असेल तर त्याला कोण बदलणार . हळू हळू Heart Rate Monitor मशीन ची लाईन सरळ झाली . रिया ने ह्या जगाचा निरोप घेतला . माझ्या शरीरातला त्राणच गेला . मी खालीच कोसळलो .पल्लवीं मला सावरत होती . मी स्वतःला रियाचा अपराधी समजत होतो . तिच्या शेवटच्या क्षणाला मी तिच्या सोबत नव्हतो . मी तिचा फोन हि घेतला नाही .तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होत पण आता वेळ निघून गेली होती .
रियाला जाऊन वर्ष झालं. का असा मी त्या दिवशी वागलो ह्याचा अजून मला पश्चाताप होत होता . रिया हि पहिली मुलगी होती जी माझ्या आयुष्यात आलेली . आता पूर्वी सारखं काहीच ऱ्हायला नाही . पल्लवी आणि माझी शेवटची भेट hospital मधली झाली. नियतीने काय वाढून ठेवलेलं माझ्या पुढ्यात हे मलाच कळलं नाही . रियाचं माझ्यावर प्रेम होत हे मी ओळखू शकलो नाही का स्वतःच प्रेम ओळखू शकलो नाही . उगीच मी रिया , पल्लवी व स्वतःला झुरत ठेवलं . योग्य वेळी बोलो असतो तर आज हि वेळ आलीच नसती .शेवटी रिया हे जग आज ना उद्या सोडून गेलीच असती पण मनाला अशी चूर चूर लागली नसती . आजही मला पल्लवीच आवडते . पण रियाचं माझ्या आयुष्यात वेगळं स्थान होत .कधी कधी रियाची कवितेची डायरी सहज वाजतो . त्यात तिला मला काय सांगायचं होत ह्या प्रश्नाच उत्तर शोधतो . प्रेमा पेक्षा मैत्री बरी असं वाटू लागलं आहे .आजही मला त्या coffe शॉप मध्ये जाऊस वाटत . पल्लवी ला शोधूस वाटतं .पण पाय काय तिकडे वळत नाही .किती विचित्र आहे ना . रिया जेव्हा पुण्याला जात होती तेव्हा मला म्हणाली होती कि दोन माणसांना कधी कधी दूर व्हावं लागत स्वतःला शोधण्यासाठी .आयुष्य celebrate करण्यासाठी . माझ्या पतंगाचा दोर माझ्याच हातात होता पण मी तो सावरू शकलो नाही .आयुष्याच्या वाटेवर पल्लवी आणि माझी कधीतरी भेट होईल ह्याच आशेवर मी आता जगत आहे .
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...........!!

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तीच त्याच्यावर खूप प्रेम असत. आणि ती रिया आणि मनोहरच नातं सुद्धा समजते. आपण ह्या दोघांच्या नात्यामध्ये का आलो ? आपण अपराधी आहोत असं तिला वाटत जरी आता मनोहरच तिच्यावर प्रेम असलं तरी रिया ला जाताना मनोहरला काय सांगायचं होत ? हा प्रश्न तिला पडतो . आपण मनोहर ला त्यादिवशी भेटलोच नसतो तर .तो त्या क्षणी रियाबरोबर असता . ह्या गोष्टींचा तिला धक्का बसतो . आणि ती त्याच्या आयुष्यातून पुन्हा येत नाय .