८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून

Submitted by सिम्बा on 5 November, 2017 - 22:26

नाव वाचून घाबरू नका :), हा धागा डीमोनीटायझेशन विषयी आहे, पण डीमोनिटायझेशन बद्दल नाही.
निश्चलीकरणाचे फायदे, तोटे याची खच्चून चर्चा येत्या काही दिवसात मिडिया मध्ये होईलच.
खुद्द मायबोलीवर बऱ्याच धाग्यांवर निश्चलीकरणाच्या विविध पैलूंची विस्तृत चर्चा झाली आहे
पण इकडे आपण आपला स्वत: चा काय अनुभव होता हे लिहूया.
- आपल्याला बातमी कशी कळली
- आपली पहिली प्रतिक्रिया.
- लोकांच्या प्रतिक्रिया.
- या दिवसात लक्षात राहण्यासारखा एखादा चांगला/ वाईट/ फजितीचा प्रसंग.
- तुमचे या पूर्ण प्रोसेस वरचे भाष्य
या पैकी एक अनेक मुद्द्यांवर तुम्ही आपले म्हणणे मांडू शकता.

सर्वाना विनंती:- जी अस्मानी सुलतानी यायची ती येऊन गेली आहे, जरी काही ठिकाणी त्याचे हादरे अजूनही जाणवत असले तरी इकडे आपण कंठशोष करून ग्राउंड झीरोवर काही फरक पडणार नाही आहे.ज्याला निश्चलीकरण देवाची देणगी वाटते त्याचे मतपरिवर्तन कोणी करू शकत नाही हे गेल्या १ वर्षात बर्याच वेळा सिध्द झाले आहे. तेव्हा कृपया कोणाच्या अनुभावाला counter करू नये. आपण पुरेसे भाग्यवान नसल्याने आपल्याला चांगले अनुभव आले नाहीत असे म्हणून सोडून द्यावे.
दुसर्या बाजूलाही तीच विनंती, ज्याची या बाबतीत कडवट मते आहेत ती माणसे महापापी आहेत समजून सोडून द्यावे.
हा धाग्यात demon ची ह्युमन साइड यावी असा प्रयत्न आहे, म्हणून हा धागा राजकारण ग्रुप बाहेर काढला आहे, तो बाहेरच राहावा म्हणून सहकार्य करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी काही म्हणा, पण रुपे कार्डचा प्रसार आणि प्रचार करायला नोटाबंदी करणं म्हणजे blackmail सिनेमात टॉयलेट पेपरचा खप वाढवायला पाणीच बंद केलं, त्यातलाच प्रकार. ज्यांना टॉयलेट पेपर मिळत नाहीत, परवडत नाहीत त्यांनी काय केलं असेल?

नोटाबंदीमुळ सरकारला कररूपाने कल्पनाही करता येणार नाही, इतकी रक्कम मिळाली. या एवढ्या रकमेचं काय करावं असा प्रश्न पडला. पुतळे बनवून उरलेली रक्कम रिझर्व बँकेचे रिझर्व्स वाढवण्यासाठी वापरायचं ठरलं.
एलायसीकडे जमा झालेला प्रचंड पैसा बुडणाऱ्या बँका आणि वित्तसंस्थांना वर काढण्यासाठी उपयोगी पडला.
एन पीएज चं प्रमाण वाढायला नोटाबंदीने किती हातभार लावला असेल?

<< "नोट बंदी हा चुकीचा निर्णय होता हे कबूल करून मोदींनी देशाची माफी मागायला हवी।" इति मनमोहन सिंग। नोट बंदीचे फायदे ह्या महान अर्थ तज्ञाला नाही कळले, पण माझ्या सारख्या अर्थ व्यवस्थेच्या विद्यार्थ्याला कसे कळले पहा।>>

------ नोटबन्दीचे फायदे मनमोहन सिन्ग यान्च्या सोबत अजुन काही तज्ञ लोकान्ना कळलेले नाहीत. रघुराम राजन यान्चे कालचे वक्तव्य बघा.

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/indias-economic...

<<* नोट बंदीमुळे जरी 99% पैसा बँकेत जमा झाला असला तरी 23.22 लाख खात्यातील 3.68 लाख कोटी काळा पैसा आहे हे सरकार सांगत असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय। >>
-------- हे सर्वान्नाच माहित आहे, त्यात काय नवे? आपल्याकडे एव्हढा काळा पैसा आहे, त्यातला काही जरी परत मिळवला तरी पुढची ३० वर्षे कुणालाही टॅक्स भरावा लागणार नाही असे भले मोठे काळ्या पैशाच्या आकड्यान्चे email किव्वा WA यायचे. आता काळ्याचा रन्ग गोरा होत असेल आणि म्हणुन अशा प्रकारचे email किव्वा WA येणे स्थगित झाले.

<< 18 लाख खात्यात संशयासाद रक्कम जमा झालीय। यंत्रणा वर्षाला केवळ 3 लाख खात्यांची पडताळणी करू शकतेय याचा विरोधक गैर फायदा घेऊन अप प्रचार करताहेत। >>
-------- कुठेतरी गणिताचे आकडे चुकत आहे, पुढचे ३० वर्ष पुरेल एव्हढे मोठे हे काम आहे. पाच वर्षातच कसे नपटणार ? मला दुरुस्ती सुचवायची आहे, दोन पर्यात देतो.
* नोट बंदीमुळे जरी 99% पैसा बँकेत जमा झाला असला तरी 23.22 लाख खात्यातील 3.68 लाख कोटी काळा पैसा आहे हे सरकार सांगत असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय।
पर्याय १ - 18 लाख खात्यात संशयासाद रक्कम जमा झालीय। यंत्रणा वर्षाला केवळ ६०,००० खात्यांची पडताळणी करू शकतेय याचा विरोधक गैर फायदा घेऊन अप प्रचार करताहेत।
पर्याय २ - ९० लाख खात्यात संशयासाद रक्कम जमा झालीय। यंत्रणा वर्षाला केवळ ३ लाख खात्यांची पडताळणी करू शकतेय याचा विरोधक गैर फायदा घेऊन अप प्रचार करताहेत।

बघा कुठला पर्याय लोकान्च्या गळी उतरवणे सोपे पडेल. आकडे फेरफार करु शकता फक्त शेवटी ३० वर्षान्चे गणित बसायला हवे.

सामान्य माणसाने ५००० रुपयान्पेक्षाही जास्तीची खरेदी केल्यावरही त्याला पावती द्या म्हणुन दुकानदाराला विनवावे लागते. सामान्याला काय फरक पडतो आहे ?

भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर येण्यासाठीचा हा खटाटोप होता तर तो बाहेर काढण्याचा प्रत्येक पर्याय का नाही वापरला ? अगदी साधे साधे सहज करता येण्या जोगे पर्याय मला अपेक्षित आहेत. सर्वोच्च न्यायालय काळा पैसे धारकान्च्या नावाची (केन्द्र सरकार कडे असलेली) यादी मागते आहे. तेव्हा पहिल्याच मागण्यात का नाही मान्य केले ? नावाची यादी सादर केली नाही, फुसके कारणे सान्गत बसले. सरकार कुणाचे हित जपत आहे असा रास्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केल्यावरच यादी पुढे सरकवली.

भ्रष्टाचाराशीए लढण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती लागते. नुसत्या आकड्यान्ची (१५ लाख प्रत्येकाला, ३० वर्षे कुणालाही कर नाही, अजुन काही) फेर-फार करुन एक दोन वेळा सत्ता मिळवालही पण....

उदय,

निखालस खोटे बोलणार्‍यांचा एक मुकुटमणी तो अरूण जेटली नावाचा बिनडोक माणूस, या देशात १३० कोटी लोक आजकाल इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताहेत, अशी आकडेवारी देतो.

हा माणूस देशाचा अर्थमंत्री आहे.

या देशाची लोकसंख्या (त्यात स्त्रिया, लहान मुले इ. देखिल आलेत,) १३३ कोटीच्या आसपास आहे.

अन तुम्ही एका बिनडोक व्हॉट्सॅप फॉर्वर्डला लॉजिकल उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहात. Lol

Thug day!

Thugy chya diwashi relese jhalela picture pan tasach nighala mhantat. Muhurta pahanyavar vishvas basu lagalay. Wink

निखालस खोटे बोलणार्‍यांचा एक मुकुटमणी तो अरूण जेटली नावाचा बिनडोक माणूस, या देशात १३० कोटी लोक आजकाल इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताहेत, अशी आकडेवारी देतो
>>>
हे कुठल्या बातमीतून किंवा भाषणातून तुम्हाला मिळाले? एक देशाचा अर्थमंत्री इतके मूर्ख विधान करतोय ते वाचण्याची इच्छा आहे. मी नेटवर शोधले तर 2014मध्ये 3.8 कोटी करदाते होते आणि या सरकारच्या काळाच्या अखेरीस ती संख्या दुप्पट होऊन 7.6 कोटी होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवल्याचे दिसले.

https://www.financialexpress.com/money/income-tax/arun-jaitley-says-numb...

https://www.livemint.com/Industry/IdGVGpD2Y84k9Bx6XgXFzL/Tax-filers-shou...

https://twitter.com/arunjaitley/status/1035870055949582336?s=19

त्यानन्तर काही दिवसानी आम्ही दोघे मुम्बई विमानतळावर उतरलो. हातात काही रुपये होते परन्तु विमानतळावर ते बदलून देईनात त्यामुळे पुढले काही दिवस ओढाताण झाली कारण आमच्या ब्यान्केकडे पण द्यायला रुपये नव्हते.

आम्ही सत्तेवर आलो तेव्हा १३० करोड लोकसंख्येच्या देशात फक्त ३.८ करोड लोक रिटर्न्स फाइल करत होते, असे जेटलींचे विधान आहे.
१३० कोटींपैकी ४१% लोक १८च्या खालचे आहेत. २५-६५ या वयोगटात ४१% लोक आहेत. २२% जनता दारिद्र्यरेषेखाली राहते. अशावेळी करपरतावे दाखल करणार्‍यांच्या संख्येची तुलना एकूण जनसंख्येशी करण्याचं कारण तेच जाणोत.

नोटाबंदीनंतर परतावे दाखल करणार्‍यांचं प्रमाण वाढलंय, पण नक्की किती कर वसूल झाला किंवा किती डिपॉझिट्सची चौकशी करून किती कर वसूल केला, हे आकडे अंडर प्रोसेसच राहतील.

काळापैसावाले लोक आपल्याकडच्या नोटा जमाच करणार नाहीत, त्यामुळे अमुक इतक्या रकमेच्या नोटा परत येणारच नाहीत, असं पहिलं गृहितक होतं, हे जेटली कधी कबूल करतील काय?

नोतबंदी फसली तरी सरकारने निवडणुकांवर त्याचा परिणाम फार होउ दिला नाही. त्यांच्या प्रचार यंत्रणेला दाद देली पाहिजे.भाजपची निवडनुकांवर असलीली घट्ट द्पकड बघता विरोध्कांना बरेच पापड बेलावे लागणार आहेत असे दिअसते.

<< त्यांच्या प्रचार यंत्रणेला दाद देली पाहिजे.भाजपची निवडनुकांवर असलीली घट्ट द्पकड बघता विरोध्कांना बरेच पापड बेलावे लागणार आहेत असे दिअसते. >>
---------- प्रचार यन्त्रणेवरच सर्व भिस्त आहे. दाखवण्यासारखे काही कामे झालेली नाहीत. दिलेली आश्वासने आहे तिथेच आहेत. अर्थात भाजपाला काळजीचे कारण नाही कारण विरोधक हे एकत्र नाही आहेत. जरी आले तरी त्यान्च्यात प्रधान पदावरुन एकवाक्यता होणार नाही.

Pages