महाकाळेश्वर

Submitted by kokatay on 4 November, 2017 - 14:02

वाचकहो! मी इंदौर ची असुन मास्टर्स पदवी घ्यायला उज्जैन ला दोन वर्ष होते. ह्या काळात मला उज्जैन चा इतिहासाचा खोलात जाऊन अभ्यास करायला मिळाला, तेव्हा मी महाकाळेश्वर पासून सुरू करणार आणि पुढच्या लेखनामध्ये महाकवी श्री कालिदास बद्दल माहिती देणार आहे.
महाकालेश्वर देवस्थान हे उज्जैन मध्यप्रदेशात आहे . हे १२ ज्योतिर्लिंग पैकी एक आहे आणि मुख्य म्हणजे दक्षिणे कडे तोंड केलेलं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे . त्याच महत्व असं कि ह्या मंदिरात मृत्यू आणि आजार प्रवेश घेऊ शकत नाही आणि जो इथे दर्शन घेतो त्याला ह्या गोष्टिंच भय राहत नाही .
दर रोज सकाळी ४ वाजता मंदिरात भास्मारती केली जाते , ही आरती साधू करतात आणि ह्यात महिलांना प्रवेश नसतो. दररोज सकाळी ४ वाजता होणारी ही भस्मारती जग प्रसिद्ध आहे कारण तो भस्म स्मशानातून आणला जातो, आणि त्याचामुळेच भक्तांचा असा विश्वास आहे कि त्याना मृत्यू च भय राहत नाही . ह्या मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर “नाग्चन्द्रेश्वर” ची मूर्ती फार विशिष्ट मूर्ती आहे, हा मजला फक्त नागपंचमी च्या दिवशीच उघडला जातो आणि त्या दिवशीच पूजा करायची पद्धत आहे .
महाकालाच वैशिष्ट म्हणजे भस्मारती, तर त्याचा बद्दल बरंच संशोधन केलं आणि मला जी माहिती मिळाली कि अध्यात्मिक दृष्टी प्रमाणे शंकर हेच संसाराचे सृजन कर्ता आणि मृत्यू लोकाचे स्वामी आहे आणि ते काळाचे ही काळ आहे [ महाकाळ] तसेच सर्व सामान्य मनुष्याने पण आयुष्यातली दुखणी , रोग, संकट , मृत्यू भय इत्यादींवर काळ म्हणून प्रहार केलात तर संसारी जीवन सोपं होईल. आता इंग्रजी मध्ये पण म्हण आहे “ आय लाफ इन द फेस ऑफ डेंजर “ जेंव्हा आपण आपल्या जीवनातल्या विसंगती , विकृती , भय ह्यांना खंबीरपणे प्रतिसाद देतो तंव्हा आपण नकळत आपलं जगणं सोपं करतो .
अमेरिकेत कॅलिफोर्निया च्या “ सेंटा क्लारा” येथे शंकराचं देऊळ २०१० मध्ये उघडलं आहे त्याला ही “ महाकालेश्वर टेम्पल” असं नावं दिलं आहे अर्थातच ज्योतिर्लिंग महाकालेश्वर उज्जैन हे जगात एकच आहे, पण आता असं ऐकण्यात येतं कि भारतातले सगळे जागृत देवस्थानं आता भारताच्या बाहेर हि आणण्यात आले आहेत, पण त्या जागेचे positive vibrations कसे काय आणतात माहित नाही बाबा !
ह्या लिंक वर भस्मआरती बघू शकता : https://youtu.be/3iKCABvQojc
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
www.marathicultureandfestivals.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

याच मंदिरात एक खरे ज्योतिर्लिंग आणि एक पुजेचे/डमी ज्योतिर्लिंग असा प्रकार होता ना?

1998 च्या सुमारास आम्ही गेलेलो तेव्हा ग्राउंड फ्लोअर वर असलेल्या लिंगाचे दर्शन घेता यायचे, गाभाऱ्यात जाताना जमिनीत ठेवलेल्या फटीतून तळघरात ठेवलेले मुख्य लिंग दिसायचे. पण तिकडे पूर्ण दिवस भर आम जनतेला प्रवेश नव्हता.
मुघली आक्रमणापासून मूळ लजनग वाचवण्यासाठी अशी युक्ती केली आहे असे कोणीतरी सांगितलेले

या वेळी गेलो तेव्हा त्या जुन्या मंदीरा च्या बाजूने भव्य स्ट्रक्चर उभारून थेट तळघरात जायला रॅम्प केली आहे, आणि खालच्या लिंगासमोर मोठा हॉल, बॅरिकेड करून केलेली नागमोडी रांग असा सरंजाम दिसला.

आता वरच्या देवळांचा भाव अगदीच कमी झालाय.
सध्या इंदूर, उज्जैन मधले कुणी असेल तर जास्त डिटेल मध्ये सांगू शकेल