ऱिकामा वाटला रस्ता तुला सोडून आल्यावर

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 November, 2017 - 14:52

तुझ्यासोबत किती वर्दळ किती उत्साह रस्त्यावर
ऱिकामा वाटला रस्ता तुला सोडून आल्यावर

कितीदा टाकले पाउल
तुझ्या मी पावलांवरती
कितीदा राहिले मागे
पुढे तू धावल्यावरती

अता ना पाहणे वळुनी कुणी माझे न उरल्यावर
ऱिकामा वाटला रस्ता तुला सोडून आल्यावर

कितीदा मान झुकवूनी
तहाची बोलणी केली
कितीदा शस्त्र खुपसूनी
मनाची चाळणी केली

अता ना राहिले उद्विग्न हे काळीज थाऱ्यावर
ऱिकामा वाटला रस्ता तुला सोडून आल्यावर

कसे सांगू तुला हे की
तुझ्याविण मी कुणी नाही
कुणी म्हणती मला काही
कुणी म्हणती मला काही

हवेला वाट चुकलेल्या नको सोडूस वाऱ्यावर
ऱिकामा वाटला रस्ता तुला सोडून आल्यावर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users