एके दिनी सकाळी

Submitted by vijaya kelkar on 1 November, 2017 - 06:26

एके दिनी सकाळी ...........

एके दिनी सकाळी
अचानक एके दिनी सकाळी
अजून नव्हती संपली रात्र काळी
गर्दीच गर्दी जमली सगळी
त्या रूळा पल्याड ओसाड देऊळी
ट्रक मधून उड्या मारल्या करून आळीपाळी
माणसागणिक गाठोडी आली खाली
भांडीकुंडी पळती, आणिक पोरी बाळी
डबक्या तळ्यांना पडली खळी
पण घाबरली बेडकी,काय आले कपाळी
गुरे-वासरे रोजची नाही ढुंकली
पचकन् ती माणसे थुंकली
एकीनं इकडून तिकडं धाव घेतली
बलदंड वाळक्यानं तात्काळ धरली
मुक्त स्वच्छंद शृंगारछटा रंगली
खि खि हसून साऱ्यांनी दाद दिली
हा हा म्हणता आपापली राहुटी उभारली
आणि बसल्या तीन तीन दगडांच्या चुली
धुराच्या पडद्या आड धावपळ सुरु झाली
स्लीपर्स संगे लादून त्यांना छुक् छुक् निघाली
अशी ही सकाळ खूप काही शिकवून गेली __________
विजया केळकर __________

Group content visibility: 
Use group defaults