त्रिमिती ट्रस्ट ही मानसिक आरोग्यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था गेली २०१५ सालापासून मानसिक आरोग्याविषयी जागृती व्हावी, यासाठी पुणे आणि गोवा इथे चित्रपट-महोत्सवाचं आयोजन करते.
यंदाही हा चित्रपट-महोत्सव पुण्यात ५ नोव्हेंबर, २०१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात सुवर्णकमळ-प्राप्त 'कासव' या चित्रपटासह ऑस्कर-विजेता 'द फोन कॉल', 'हँगिंग', 'व्हॉट्स राँग', 'ओढ' आणि 'द बटरफ्लाय सर्कस' हे लघुचित्रपट दाखवण्यात येतील.
पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दु. ४ ते रात्री ८.३० या वेळेत चित्रपट दाखवण्यात येतील. चित्रपटांनंतर डॉ. मोहन आगाशे, डॉ. उल्हास लुकतुके आणि श्रिया पिळगावकर यांच्याबरोबर चर्चासत्र असेल.
महोत्सवास सर्वांना मोफत प्रवेश आहे.

मायबोली.कॉम या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत.
स्तुत्य उपक्रम आहे, इथे नाशिक
स्तुत्य उपक्रम आहे, इथे नाशिक मध्ये असता तर जात आले असते.
श्रिया पिळगावकर या विषयातली
श्रिया पिळगावकर या विषयातली तज्ञ वगैरे आहे का?
कळवल्याबद्दल धन्यवाद !
कळवल्याबद्दल धन्यवाद !
>श्रिया पिळगावकर या विषयातली
>श्रिया पिळगावकर या विषयातली तज्ञ वगैरे आहे का?<<< वर वाचताना अगदी हाच प्रश्न माझ्याही डोक्यात आला..
Shriya has acted in one of
Shriya has acted in one of the films. The organizers wanted a person with a non-clinical background to render a perspective along with Dr. Agashe and Dr. Luktuke who would back it from medical perspective more so.
So the idea is if she could share how she prepared for this role and her understanding about depression through the process. It will have a layman connect.