एक तुलना - जेएनयू आणि आयआयएससी, आणि विचारस्वातंत्र्य

Submitted by फारएण्ड on 29 October, 2017 - 13:54

हे पुढे जे काही लिहीले आहे ते Freedom of speech/expression या एकाच मुद्द्याबद्दल आहे: या घटनांच्या तपशीलातील गोष्टींना समर्थन्/विरोध जे काही आहे ते दुय्यम.

बंगलोर च्या Indian Institute of Science मधे तेथीलच माजी विद्यार्थ्यांनी ज्योतिषविषयक कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला वैज्ञानिक लोकांकडून प्रचंड विरोध झाल्याने ती रद्द केल्याची बातमी आज वाचली.

काही महिन्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काश्मीरमधल्या फुटीरवाद्यांच्या बद्दल काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कन्हैय्या कुमार व आरोप झाले तोच कार्यक्रम.

दोन्ही ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या मुख्य कामाशी संबंधित नसलेल्या गोष्टीबद्दल कार्यक्रम होते. जेएनयू च्या वेळेस विद्यार्थ्यांचे विचारस्वातंत्र्य वगैरे मुद्दे घेउन लोकांनी ते कार्यक्रम होउ देण्याचे समर्थन केले होते. मात्र या वेळेस ज्योतिष हे कसे शास्त्र नाही, आयआयएससी मधे ती कार्यशाळा होण्याने लोक कसे आपोआप ते "शास्त्र" आहे वगैरे समजतील असे मुद्दे घेउन एरव्ही स्वतःला लिबरल समजणार्‍यांनी त्याला विरोध केला.

इतकेच नव्हे तर तो आयोजित करणारे लोक आहेत त्यांच्या वैयक्तिक श्रद्धांवरून त्यांना झोडपणे वगैरे प्रकार झालेत. वैज्ञानिक कम्युनिटी मधे वैज्ञानिकांच्या त्यांच्या कामाबाहेर वैयक्तिक श्रद्धा सुद्धा असू नयेत असा हट्ट धरणारा एक कट्टर ग्रूप आहे. त्यांचे विचार साधारण असे असतात.

एका घटनेत हिंदुत्त्ववादी, भारतीय संस्कृतीमधल्या गोष्टी च्या बाबत सेन्सिटिव्ह असणारे, कसलीही शहानिशा करता ते "जगात भारी" आहे असा समज असणारे त्या घटने विरूद्ध होते, तर इथे त्याच्य उलट. ज्योतिष हे शास्त्र नाही, नसेल. पण जर विद्यापीठांत अतिरेक्यांबद्दल कार्यक्रम होउ शकतो, तर वैज्ञानिक संस्थेत ज्योतिषाबद्दल का नाही?

विचारस्वातंत्र्य हे आपल्या सोयीनुसार लागू करतात अशी हिंदुत्त्ववाद्यांवर कायम टीका होते. इथे त्यांच्या विरोधकांनी काय वेगळे केले आहे? जेएनयू च्या वेळेस (विकिसंदर्भावरून) पत्रकारांनी पत्रक काढून हे लिहीले होते - "Forty senior journalists from around the country, alumni of JNU, condemned the arrests stating that every University should protect dissenting members however unpalatable they may be to the mainstream opinion. " मग ही कर्टसी आता कोठे गेली?

या माझे मत - दोन्ही कार्यक्रमांना विचारस्वातंत्र्य लागू आहे (जेएनयू मधल्या भारतविरोधी घोषणा वगैरे वेगळे, त्याचे अजिबात समर्थन नाही).

किंबहुना ती चर्चा न होउ देउन एक मोठी संधी याच्या विरोधकांनी घालवली. त्या चर्चेत स्वतः भाग घेउन जे आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांनी सिद्ध झालेले नाही ते "शास्त्र" आहे असे समजण्यातील धोके वगैरे पुढे आणण्याची. इतक्या प्रचंड संख्येने लोकांमधे आणि असंख्य वैज्ञानिकांमधेही ज्या श्रद्धा आहेत त्याबद्दल, व "श्रद्धा आणि शास्त्रीय सत्य" यातील फरक दाखवून देण्याची हे एक संधी होती. कारण माजी विद्यार्थ्यांनीच आयोजित केलेला कार्यक्रम होता तो. सरकारी नव्हे. तेथे चर्चा होउ शकली असती. तुम्ही Scientific tool शब्द जेव्हा वापरता तेव्हा ते किती कठोरपणे पारखून घेतलेले असावे लागते हे सांगता आले असते. पण हे करायला आपल्या विरोधी विचार/समज असलेल्यांना तुच्छ न लेखता बरोबरीच्या नात्यातून त्यांच्याशी बोलावे लागते. ते सोपे नाही.

त्यापेक्षा असे उच्चासनावरून लेख लिहीणे सोपे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार स्वातंत्र्य आणी विज्ञान यात गल्लत होते आहे का? पृथ्वी सपाट आहे असे मानणारे काही लोक आहेत. देवीचा रोग लसीकरणा मुळे नव्हे तर देवीला कोंबडे कापल्याने बरा होतो असेही मनणारे लोक आहेत. दोघांचेही विचारस्वातंत्र्य मान्य आहे. त्यांना आपल्या विचारांचा प्रसार ( जोपर्यंत जीवित हानी होत नाही) करण्याचा हक्कही मान्य आहे. पण समजा सपाट पृथ्वी वाल्यानी "सपाट पृथ्वीचे भूगोल" अशी कार्यशाळा आय आय टी मध्ये आयोजित केली तर ? किंवा दुसर्‍या लोकांनी "देवी आल्यावर देवीला कोंबडे कापायाचा शास्त्रोक्त विधी व लसीशिवाय देवी बरी करणे" असा एक दिवसाचा कोर्स के ई एम रुग्णालयात के ई एम च्या बॅनर खाली आयोजित केला तर ?

वरील ज्ञोतिषाच्या कार्यशाळेला विरोध हा विचारांची गळचेपी करण्याच्या भूमिकेतून आलेला नाही "ज्योतिष हे विज्ञान आहे का?" असे चर्चासत्र असते तर कुणी विरोध केला नसता. हे चर्चासत्र नव्हते तर कोर्स होता.
झाकीर नाईक यांचेच एक विधान उध्धृत करायचे तर एखाद्या प्राथमीक शाळेत काही बाहेरिल व्यक्ती आल्या व लहान मुलांना एक दिवस आम्ही शिकवू असे म्हणले व २+२ = ५ असे शिकवायचा प्रयत्न केला तर मुख्याध्यापक त्याम्ना बाहेर काढतील व ते योग्य आहे.

फा,
तुलना चुकीची आहे. बायस सोडून परत एकदा दोन्ही प्रकरणे रिविजिट करा. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.

पहिला कार्यक्रम हा राजकिय मतांबद्दल आहे. राजकिय मते कधीही सार्वकालिक सत्ये प्रकारात नसतात. त्यामुळे वेगवेगळ्या राजकिय फोर्सेसचे पुशींग चालूच असते. त्या सर्वांना ग्राउंड देणे, मत मांडू देणे आणि ते खोडून काढणे हे झाले पाहिजे. हे खरे विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. हिंदुराष्ट्रची संकल्पना मांडणारे असो की फुटिरतावादी असो सगळ्यांनाच आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. ही लढाई राजकिय विचारांची आहे. ती निरंतर चालत राहणार आहेच.

ज्योतिष आणि छद्मविज्ञान, गुढशास्त्रे यांच्यासाठी मात्र तसे करु शकत नाही. त्याचे धोके जास्त भयंकर आहेत. आज सुशिक्षित व सुसंस्कृत, आधुनिक सिविलायजेशनच्या सूर्यप्रकाशात का होईना कट्टरधर्मीय-श्रेष्ठत्वप्रेमी-जादूटोणाप्रेमी झोंबीज जमीनीखालच्या तळघरांत लपून छ्पून वावरत आहेत. त्यांना आधुनिक विज्ञानाच्या विचारसरणीच्या सुर्याला खंडग्रास ग्रहण लागते आहे असे जरा जरी समजले तरी ते प्रचंड संख्येने बाहेर येऊन सत्यानाश करणार आहेत.

'अमूक तमूक युनिवर्सिटीने मान्य केले, अमेरिकेतले शास्त्रज्ञ येऊन तपासून गेले पण त्यांनीही हात टेकले' असल्या भाकडकथा भारतातल्या अनेक ठिकाणांबद्दल, व्यक्तींबद्दल, घटनांबद्दल जोरदार पसरवल्या जातात आणि मान्य सुद्धा केल्या जातात, अशा परिस्थितीत हात दाखवून अवलक्षण करणे योग्य ठरत नाही.

तुम्ही जेएनयुच्याच दुसर्‍या एका घटनेशी जिथे डाव्या विद्यार्थ्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्राध्यापकाचे भाषण होऊ दिले नाही तिथे तुलना करायला हवी होती. मग मुद्दा योग्य राहिला असता.

राइट नाउ, यु आर कंपेअरिंग अ‍ॅपल टू ऑरेण्जेस!

नाना - असेच आर्ग्युमेण्ट जे एन यू बद्दल दुसर्‍या बाजूने ऐकले आहे. काश्मीर मधे भारत अन्याय करत आहे असा समज पसरवला जात आहे त्याला अशा चर्चेने उगाच व्हॅलिडिटी मिळेल वगैरे वगैरे.

यातले धोके वगैरेशी पूर्ण सहमत असून सुद्धा असे कार्यक्रम त्या कारणाने नाकारले जाणे हे विचारस्वातंत्र्य दाबण्याचेच उदाहरण वाटते. विचारस्वातंत्र्य हे absolute आहे. त्याला ज्या अपवादात्मक परिस्थितीत मर्यादा येतात त्यातही हे बसत नाही.

विकु - तुमचे उदाहरण पटले नाही. शाळा वगैरे ठिकाणी उद्या फाशीची चर्चा कोणी आयोजित केली तर त्यांनाही हाकलून देतील. विद्यापीठे, संशोधन संस्था वगैरे ठिकाणी जर त्यांचे प्राथमिक काम सोडून इतर विषयांवर चर्चा व्हावी का याचे उत्तर जर होय असेल तर ते यालाही लागू असायला हवे. त्यातले धोके वगैरे वैयक्तिक मते आहेत. ती बहुसंख्यांची असली तरी त्यामुळे विचारस्वातंत्र्यावर निर्बंध येणे चुकीचे आहे.

मायलो यिनापुलिस, अ‍ॅन कुल्टर, बेन शपिरो, स्टीव्ह बॅनन हे सगळे अती कडवे उजवे लोक युनिवर्सिटी ऑफ कॅली. बर्कली ला गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपनी बोलावल्याने भाषण द्यायला येणार होते. त्या विरुद्ध डाव्या लोकांनी विरोध सुरु केला आणि ही भाषणे रद्द करा, यांच्या सिक्युरिटी साठी इतका खर्च येणारे इ. बातम्या येऊ लागल्या. मायलो यिनापुलिस ४-५ महिन्यांपुर्वी एकदा आलेला तर कॅम्पस मध्ये आगी लावणे, जमावाने जमून कार्यक्रम बंद पाडणे असले उद्योग केले गेलेले.
यावेळी युनि. च्या नव्या चॅन्सलरची मुलखत ऐकली (खाली लिंक मध्ये बरचसं तेच आहे) तिने या सर्वांच्या मताला माझा संपूर्ण विरोध आहे पण फ्री स्पीच हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते राखलं जाईलच अशी सुस्प्ष्ट भूमिका घेतली.
त्यातला हा एक प्रश्न आणि उत्तर.

What are alternative ways to protest?

When Ann Coulter spoke at Smith College some years ago, the faculty and students wanted me to disinvite her. And I said no. So she came and the students developed a brilliant protest. They filled the auditorium in which she was scheduled to speak – it seats 2,000 people – and every five minutes in her speech, a group of about 100 would stand up, turn their backs, stand silently for five minutes and leave. By the end there was almost nobody there. And that to me is so much more of an effective protest than shouting someone down. Shouting someone down or provoking a violent confrontation just plays into the narrative of the far right.
http://www.latimes.com/local/education/la-me-uc-berkeley-chancellor-free...

नाना, कोंबडं झाकलं की तांबडं फुटायचं राहिल अशा प्रकारचा प्रतिवाद वाटला. अमेरिकेने हात टेकले, आयआयएससी, आयआयटी हे पारित केलेले हे शास्त्र आहे यावर जे विश्वास ठेवतात त्यांचं जोपर्यंत 'शिक्षण' होत नाही तो पर्यंत काहीही करा ते लोकं तेच करणार. भारतीय लोक मूर्ख आहेत तर त्यांना शिकवलं पाहिजे. भाषण बंद करणे याने काहीही चांगलं होणार नाही. झालं तर फक्त नुकसान होईल असं मला वाटतं.
>>यातले धोके वगैरेशी पूर्ण सहमत असून सुद्धा असे कार्यक्रम त्या कारणाने नाकारले जाणे हे विचारस्वातंत्र्य दाबण्याचेच उदाहरण वाटते. विचारस्वातंत्र्य हे absolute आहे. त्याला ज्या अपवादात्मक परिस्थितीत मर्यादा येतात त्यातही हे बसत नाही.>> +१

>>पण समजा सपाट पृथ्वी वाल्यानी "सपाट पृथ्वीचे भूगोल" अशी कार्यशाळा आय आय टी मध्ये आयोजित केली तर ? किंवा दुसर्‍या लोकांनी "देवी आल्यावर देवीला कोंबडे कापायाचा शास्त्रोक्त विधी व लसीशिवाय देवी बरी करणे" असा एक दिवसाचा कोर्स के ई एम रुग्णालयात के ई एम च्या बॅनर खाली आयोजित केला तर ? >> पहिल्याला माझा टोटल पाठिंबा राहिल. सपाट पृथ्वी हे बटबटीत उदाहरण सोडून 'आईनस्टाईन च्या थेअरी मधील त्रुटी' असा आणखी एक स्फोटक विषय करा. आयआयटी मध्ये सभाग्रुह खच्चून भरेल आणि वक्त्याला प्रश्न विचारुन बेजारही करतील. याची खात्री वाटते. जो याला विरोध करत असेल तो विज्ञानवादी नक्कीच नसेल.
दुसर्‍यात केईएमचं बॅनर खाली हे कदापि होणार नाही. आणि माजी केईएम डॉ. नी केईएम च्या ऑडिटोरिअम मध्ये असं काही केलं तर अगेन पाठिंबा.
रादर आय डोंट केअर. त्या डॉ कडे मी जाणार नाही.
(जर)हे असं होऊ लागलं तर फारतर ते 'काही वेळा' बंद पाडता येईल. शिक्षण दिलं नाही तर लोकांच्या मनात तेच राहणार आहे.

अमितव, ज्योतिषाचेच कशाला, बाबा बंगाली, कालीजादू, बंगाली जादू, रावणसंहिता, नरबळी, कुमारीबळी, अर्भकबळी अशा सर्वांबद्दल कार्यशाळा होऊ द्यायला हव्यात. कशाला झाकायची कोंबडी? की सिलेक्टीव कोंबड्यांनाच राजमान्यता देऊन मागच्या दाराने सिंहासनावर बसवण्याचा खटाटोप चाललाय?

बाबा बंगाली, कालीजादू, बंगाली जादू, रावणसंहिता, नरबळी, कुमारीबळी, अर्भकबळी >> हे कायदेशीर असेल तर मग हो. नसावं असं वाटतं. ज्योतिष हे थोतांड आहे असा कायदा करणे शक्य नाही तर सोडून द्यावे असं खरचं वाटतं.
राजमान्यता देऊन मागच्या दाराने सिंहासनावर बसवण्याचा खटाटोप चाललाय?>> हे असू शकतं. पण जर असेल तर फार स्मार्ट विरोध करायला लागेल.

नाना, लिहा हो. तुमचे बरोबर असेल, तर लगेच पटले नाही तर नंतर आणखी विचार केल्यावर पटेल. नाहीतर अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री म्हणून सोडून द्या. बाकी तुम्हाला "बायस" कोठे दिसला त्याबद्दलही कुतूहल आहे Wink

अमित - टोटली सहमत. ही चांगली संधी होती. घमासान वादाची. आणि "आय आय एस सी च्या माजी विद्यार्थ्यांशी" वाद घालणे शक्य नसेल, तर बाकी जनतेचे सोडूनच द्या Happy

इथे दोन गोष्टींची गल्लत होउ नये म्हणून:

ज्योतिष हे शास्त्राने सिद्ध झालेले आहे वगैरे गोलमटोल घुमवणे हे आय आय एस सी च्या कॅम्पस मधे, ते ही माजी विद्यार्थ्यांकडून होणे योग्य आहे का?
- अजिबात नाही

पण ती चर्चा होउ न देणे हे त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आहे का?
- हो

ही डबल ढोलकी आहे का? तर नाही. मला जे मान्य नाही तो कार्यक्रम होउच न देणे हे ही मला मान्य नाही.

अमितव,
एखाद्या विषयावरील चर्चासत्र आणी त्या विषयाचा कोर्स यात गुणात्मक फरक आहे.
अशा कोणत्याही चर्चासत्राला विरोध नाही. कारण त्यात विरोधी मताला व्यक्त व्हायची संधी असते.
"पृथ्वी सपाट आहे" अशा विचाराचे मंडन व नंतर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे असा कार्यक्रम घेणे वेगळे व "पृथ्वी सपाट आहे" या ङ्रुहितकावर आधारीत कोर्स घेणे वेगळे.

देवीचा रोग सूक्ष्मजंतूने होणे, पृथ्वीचे गोलाकार असणे हे जितके निर्विवादपणे सिद्ध करता येते तितक्याच निर्विवादपणे एखाद्याचे लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल, आजार कधी बरा होईल (होईल का), स्वतःचे घर होईल का हे शुद्ध वैज्ञानिक कसोटीवर आजही सांगता येत नाही. त्यामुळे देवी आल्यावर कोंबडीचा बळी कसा द्यावा आणि ज्योतिषशास्त्राला विज्ञान मानणे हे एका पारड्याने तोलता येत नाही असे मला वाटते.

अर्थात ग्रहगोलांचा वा हस्तरेखांचा अभ्यास करुन एखादा असे सिद्ध करु शकतो की ह्या गोष्टींचा व्यक्तीच्या भविष्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि जर कुणी निर्विवाद पद्धतीने असे केले तर त्या शास्त्रज्ञाचा सिद्धांत ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिद्ध करायला वापरता येऊ शकेल.
ज्योतिषशास्त्र हे विज्ञानाच्या सूक्ष्मदर्शकाखाली आणून त्याचा कुणी अभ्यास करत असेल तर त्यात आक्षेपार्ह नाही. मात्र ह्या संस्था पदवीदान समारंभ, परीक्षा, नव्या वर्षाची सुरवात ह्यांच्या वेळा ग्रहगोलांच्या हालचाली वा कुण्या अधिकार्‍यांच्या हस्तरेषा तपासून ठरवू लागले ते नक्कीच चूक ठरेल. पण ज्योतिषावर कार्यशाळा घेतली म्हणून ती संस्था सर्वथा त्या प्रकाराच्या कच्छपी लागली असे म्हणवत नाही.

विज्ञानाच्या कसोटीवर अनेक विचार, सिद्धांत घासून पडताळून त्यातले अनेक चुकीचे असल्याचे सिद्ध केले गेले आहे. जसे इथर ह्या पदार्थाचे अस्तित्त्व नसणे, प्रकाश हा असंख्य कणांनी बनलेला असतो हा न्यूटनचा सिद्धांत ह्यूजन ह्या शास्त्रज्ञाने सप्रयोग खोडला होता. (नंतर आइनस्टाईनने विशिष्ट प्रयोगात प्रकाशाचे वागणे हे अनेक कण वागतात तसे असू शकते हे सप्रमाण सिद्ध केले. )

ही चांगली संधी होती. घमासान वादाची.
>> कशी काय?

सकाळ झाली की घाटपांडेसर सांगायला येतीलच. ज्योतिषांच्या संघटनेने कोणतेही शास्त्रीय चर्चेचे, वैज्ञानिक अभ्यासाचे आव्हान स्विकारलेले नसून फक्त पलायन केलेले आहे. तिथे आय आय एस सी मध्ये ते चर्चा-संवाद नव्हे तर कार्यशाळा घेणार होते असे समजते. कार्यशाळा आणि वादविवाद यात फरक असावा.

त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली कार्यशाळा होती. या लिन्क वर फ्लायर दिसेल.

वायर वाल्यांनी चतुराईने अनेक एसईओ "टर्म्स" गुंफल्या आहेत युआरएल मधे Happy

आणि माजी केईएम डॉ. नी केईएम च्या ऑडिटोरिअम मध्ये असं काही केलं तर अगेन पाठिंबा.

लेट मी गेट धिस स्ट्रेट, जर के ई एम च्या ऑडिटोरिअम मध्ये माजी डॉ नी "लसीकरण न वापरता केवळ अमक्या देवीला कोंबडे कापून देवी बरी करण्याचा विधी " असा एक दिवसाचा कोर्स के ई एम च्या डॉ साठी घेतला तर पाठिंबा आहे ? अशा डॉ नी विज्ञानाने सिद्ध झालेले लसीकरण वापरून रोग्यांवर उपचार करण्या ऐवजी असे भोंदु उपाय करून लोकांच्या जिवाशी खेळणे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मान्य आहे ?

Everyone is entitled for his opinion, no one is entitled to his facts.

पाठिंबा हा त्या विधीला नाही. फ्री स्पीचला आहे. ते केलं तर तिकडे जाऊन निदर्षने करणे, आपण जाउन त्यांना प्रश्न विचारणे, त्यातील सहभागी लोकांची वैद्यकीय लायसन्स रद्द करण्यास भाग पाडणे, त्यांना हे अस केलत तर जाब विचारणे, त्यांच्या कडे जाणार्‍या लोकांचे/ पेशंटचे प्रबोधन करणे हे ही सगळे फ्री स्पीचच आहे.
फ्री स्पीच आणि कंटेंट या वेगळ्या गोष्टी आहेत.

>>अशा डॉ नी विज्ञानाने सिद्ध झालेले लसीकरण वापरून रोग्यांवर उपचार करण्या ऐवजी असे भोंदु उपाय करून लोकांच्या जिवाशी खेळणे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मान्य आहे ? >> भोंदू उपाय केले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर जेलची हवा खावी लागेल. मेडिकल असो. ते कार्य करेल (करत नसेल तर केलं पाहिजे)

पाठिंबा हा त्या विधीला नाही. फ्री स्पीचला आहे. >>> एक्झॅक्टली. विकु - तुम्हाला जे मान्य नाही, ते मलाही मान्य नाही. पण unscientific आहे हे काही कारण नाही स्पीच बंद पाडण्याचे.

आणि "कोर्स" हे स्ट्रॉ मॅन आहे. आय आय सी एस असे रॅण्डम माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिक्युलम मधे भर घालू देइल का? हा स्वतंत्र इव्हेन्ट आहे. कोर्स मधे हे घालायचे तर त्याची मोठी प्रोसेस आहे. माजी विद्यार्थ्यांची एक संघटना असे अचानक ठरवून त्यात भर घालू शकत नाही. त्यामुळे ते उदाहरण गैरलागू आहे.

>>किंबहुना ती चर्चा न होउ देउन एक मोठी संधी याच्या विरोधकांनी घालवली. <<

सहमत. खरा विज्ञानवादि ओपन मायंडेड असतो, नविन विचार प्रवाहाकडे चिकित्सक बुद्धिने पहाण्याकडे त्याचा कल असतो, असायला हवा. तर ते असो.

ज्योतिष शास्त्र कि मिथ्या या विषयाचा माबोवर चावुन चोथा झालेला आहे. ज्योतिष क्षेत्रातहि हौसे-नौसे-गौसे शिरल्याने त्याची क्रेडिबिलिटी क्वेश्चनेबल झाली. पण आता नविन टेक्नॉलॉजी मुळे हे चित्र पालटण्याची संभावना निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने आयाय्टी/आयआयेससी सारख्या संस्थांनी यावर अभ्यास करुन आपलं मत मांडणं नुस्तच प्रुडंट नाहि तर अत्यंत गरजेचं आहे; त्यावर बंदि घालुन कपाळकरंटेपणा करण्या ऐवजी.

नजिकच्या भविष्यात बिग डेटाचा शिरकाव सगळ्या क्षेत्रात होणार आहे, ज्योतिष धरुन. संदर्भासाठी इच्छुकांनी "बिग डेटा अँड अ‍ॅस्ट्रॉलॉजी" गुगल करावे...

फा, लेख आणि दिलेल्या हायपरलिंक्स वरचे लेख पण वाचले. मुद्दा लक्षात आला.
माझ्यामते जे एन यु मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणा आणि आय आय एस सि मध्ये आयोजित केलेल्या ज्योतिष्यविद्येचे वर्कशॉप ह्यांची तुलना नाही होऊ शकत. खासकरुन फ्रिडम ऑफ स्पीच ह्या मुद्द्याला अनुसरुन किंवा त्या काँटेक्स्ट मध्ये दोन्ही घटनांची तुलना होऊ नाही शकत.
जे एन यु घटनेमध्ये, अफझल गुरु च्या फाशीच्या विरोधात आणि भारतविरोधी अशा घोषणा करण्यात आल्या. त्या विद्यार्थ्यांनी ज्या घोषणा दिल्या त्या भारतीय कॉन्स्टिट्युशन च्या नियमांनुसार खरच फ्री स्पीच होत्या की सेडिशन ह्या मुद्द्यावर बराच वाद झाला. शेवटी कोणाचं बरोबर आहे हा मुद्दा बाजूला ठेवून तो वाद फ्रिडम ऑफ स्पीच ह्याबद्दलच होता.
आता ह्या अ‍ॅस्ट्रॉलॉजीच्या वर्कशॉप बद्दल म्हणशील तर माझ्यामते पुर्णपणे वेगळा मुद्दा आहे. इथे फ्रिडम ऑफ स्पीच हा मुद्दा नसून आय आय एस सि सारख्या अ‍ॅडवान्स्ड सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल रिसर्च करणार्या संस्थेच्या अलम्नायनी, आय आय एस सि च्या कँपस मध्ये, ज्योतिषशास्त्रा ला सायंटिफिक टूल म्हणत (जे खरं तर एक सुडो सायन्स आहे) त्यावर वर्कशॉप ठेवावं हे कितपत बरोबर आहे हा मुद्दा आहे. म्हणजेच, इथे प्रश्न त्या अल्म्नायच्या फ्रिडम ऑफ स्पीचचा नसून आय आय एस सि हे नाव वापरुन आणि त्यांचा कॅंपस वापरुन हे वर्कशॉप ठेवावं की नाही हा आहे. मला नाही वाटत ह्या रमेशाय्यांनी किंवा त्या अख्ख्या अलमनाय्नी जर दुसर्‍या कुठल्या वेन्यु मध्ये हा कार्यक्रम ठेवला असता तर लोकांनी विरोध केला असता. किंवा विरोध केला असता पण तो कार्यक्रम होऊ देऊ नये त्या वेन्यु मध्ये ह्याचा आग्रह ते धरु शकले असते. हा तू म्हणतोस तसा लोकांच्या त्यांच्या प्रोफेशनशी संबंधित नसलेल्या गोष्टींबाबतीचा कार्यक्रम असं म्हणता आलं असतं आणि त्यांना ते स्वातंत्र्य (फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन अंतर्गत) आहेच.
(हां आता, सायंटिफिक कम्न्युनिटीनी त्यांची यथेच्य चेष्टा केली असती, क्रिटिसाईज केलच असतं, आणि ते सुद्धा फ्री स्पीच अंतर्गत आक्षेपार्ह नसलच असतं, ती गोष्ट वेगळी).
आता कार्यक्रम होऊ देऊ नये, किंवा झाला तर त्याचे काय नेमके दुष्परिणाम आहेत हे तू दिलेल्या त्या लेखा मध्ये लिहिलेलच आहे पण कॉमन सेन्स अनुसार, जी संस्था स्वतः सायंटिफिक रिसर्च बाबत प्रमाण ठरावे अशा कॅलिबरची आहे, त्या संस्थेनी एका सुडो सायन्स बद्दलचे कार्यक्रम ठेवणे म्हणजे नुसतं काँट्रॅडि़क्टरीच नाही पण अशा सायन्सेसना एन्डोर्स केल्यासारखेच आहे.

किंबहुना ती चर्चा न होउ देउन एक मोठी संधी याच्या विरोधकांनी घालवली. त्या चर्चेत स्वतः भाग घेउन जे आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांनी सिद्ध झालेले नाही ते "शास्त्र" आहे असे समजण्यातील धोके वगैरे पुढे आणण्याची. इतक्या प्रचंड संख्येने लोकांमधे आणि असंख्य वैज्ञानिकांमधेही ज्या श्रद्धा आहेत त्याबद्दल, व "श्रद्धा आणि शास्त्रीय सत्य" यातील फरक दाखवून देण्याची हे एक संधी होती.>>>>>>> हा विचार स्तुत्य जरी असला तरी युटोपियन आणि इंप्रॅक्टिकल आहे. मला नाही वाटत ह्या वर्क शॉप अरेंज करणार्‍या लोकांना ज्योतिषविद्या हे सायनस आहे की नाही ही चर्चा अपेक्षित आहे. किंबहुना, तशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा चुकीचे आहे. वर्कशॉपचा मुख्य हेतू तो नाहीचे.
वेन्यु दुसरा घेऊन, आय आय एस सि चे नाव न घेता त्यांनी खुशाल वर्क्शॉप घ्यावे. प्रश्न इन्डायरेक्टली मिळणार्या एंडोर्समेंटचा आहे. आणि नीट बघितलं तर त्या रमेशय्यांना ती एंडोर्समेंट हवीच आहे. लेखामध्ये त्यांचे वाक्य आहेत, की ३६ युनिवर्सिटींनी ज्योतिषविद्येबद्दल कोर्सेस दिले जातात.
त्यांनी भारत फ्री कंट्री आहे हा मुद्दा पण आणलाय. पण एखाद्या संस्थेच्या बाहेरच्या माणसानी येऊन ज्योतिषविद्येबाबत लेक्चर देणे, ज्यात पुढे इतर लोकांना तू म्हणत आहेस तसं डिबेट करायची संधी असणे असा कार्यक्रम करणे आणि संस्थेशी संबंधित असलेल्या लोकांनी सुडो सायन्स ला सायंटिफिक टूल म्हणून कार्यक्रम करत त्या सुडो सायन्सचा पुरस्कार करणे ह्यात खुप मोठा फरक आहे.

बुवांशी सहमत !

>>अमित - टोटली सहमत. ही चांगली संधी होती. घमासान वादाची. आणि "आय आय एस सी च्या माजी विद्यार्थ्यांशी" वाद घालणे शक्य नसेल, तर बाकी जनतेचे सोडूनच द्या Happy

तो कार्यक्रम चर्चासत्र नव्हे तर कार्यशाळा होता. या दोन्हीत फरक आहे. चर्चासत्रात मंडन खंडन, वाद प्रतिवाद वगैरे होत असतात. चर्चासत्र बाय डायरेक्शनल असते. कार्य शाळा म्हणजे ट्रेनिंग. तिथे प्रश्नोत्तराला जागा नसते. मूळ आक्षेप हाच आहे. आणी म्हणून तो कार्यक्रम रद्द झाला ते योग्य आहे.

ज्योतिष शास्त्राला आपण शास्त्र आहोत हे सिद्ध करायला तीनेकशे वर्षे तरी मिळाली आहेत. गेल्या तीनशे वर्शात जे भल्या भल्यांना जमले नाही ते काही माजी विद्यार्थी करतील हे हास्यास्पद आहे. त्यांना घाबरून हे बंद पाडले असे नव्हे. त्या विद्यार्थ्यांनी वा हे जे कोण रमेशय्या आहेत त्यांनी जेम्स रेंडी चे आव्हान स्विकारून एकदाचे दूध का दूध करून टाकावे. पण ते यांच्याने होणार नाही.

शिवाय हे आय आय एस सी च्या ब्रँड चा चतुर वापर करून घ्यायचा प्रयत्न होता. जसा श्री श्री आय आय टी चा करतात.

बुवा, पूर्ण प्रतिसादाशी सहमत.
हे म्हणजे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत, संस्थेच्या भूतपूर्व कमिटी मेम्बर्सनी "स्त्री शिक्षणाचे सामाजिक दुष्परिणाम" किंवा " विधवा विवाह, एक सामाजिक स्तोम" अशी व्याख्यानमाल आयोजित करण्यासारखे आहे.

त्यांना हवे ते बोलायचा पूर्ण अधिकार आहे, मात्र ज्या संस्थेचे ध्येयय त्यांच्या वैयक्तिक समजुतींपेक्षा पूर्ण वेगळे आहे (आणि संशयातीतपणे उदात्त आहे हे सिद्ध झाले आहे) , त्या संस्थेच्या सभागृहाचा आणि त्यांच्या संस्थेशी असणाऱ्या संबंधांचा उल्लेख केवळ त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यास मायलेज मीळावण्यासाठी करणे हे निषेधास पात्र आहे.

श्री श्री आयआयटीबी मध्ये आलेलं आठवतंय. लेक्चर थिएटरला हाऊस फुल कार्यक्रम झालेला. अनेक faculty ही गेलेल्या. रादर ऑर्गनाईझ करणाऱ्या अंतर्गत संस्थेतही faculty सहभाग होता. काँग्रेस सरकार ने नेमलेला डायरेक्टर आणि केंद्रात काँग्रेस सरकार होत. जराही विरोध झालेला आठवत नाही. असले कार्यक्रम करुन endorse होत असेल तर अगेन दुनिया झुक्तीहै आहे. फेक न्यूज करायला काही लागत नाही.
जे अशा endorsement वर विश्वास ठेवतात ते मूर्ख असतात. जे मूर्ख असतात ते कशावरही विश्वास ठेवतात.

अमित, श्री श्री ह्यांचा कुठल्या विषयावर कार्यक्रम होता आणि कसा फॉरमॅट होता?
श्री श्री आय आय टि स्टूडंट, अलमनाय वगैरे आहेत का? (माहिती करता विचारत आहे, सर्कास्टिकली नाही Happy )

आणि हो, विश्वास ठेवणारे मुर्ख वगैरे पुढचे मुद्दे आहेत. What absolutely doesn't make sense is, an institute that conducts scientific research doing a workshop for something that is not scientific at all. Why do that?
You are making it sound like, we, people who are saying that having that workshop is not a good idea are hindering freedom of speech. That is not the case.
If the format of this workshop was say something like an introduction to astrology where a healthy debate from both sides (people who think it's a valid science vs people who think it is not) was expected. It would've been a welcome move.
I don't understand how you do not find it absurd to use the name of IISC to hold a workshop that actually is going to show people to use astrology as a scientific tool. Mind well, the audience is not experts who could possibly challenge this but it's people who will totally gobble this bullshit up even more gladly as they will think it's endorsed by IISC. Why do that? Why allow false science to be propagated as true science and mislead people? This has nothing to do with freedom of speech.
वर विकु आणि सिम्बा ह्यांनी उदाहरणं दिली आहेत त्याच्या उत्तरादाखल तू बहुतेक, मी जाणार नाही, अन जाणारे मुर्ख आहेस असं म्हणालास बहुतेक. I think you are of the opinion that people can say whatever they want and other people can always choose not to listen/follow and use their common sense.
I agree in principle to a thinking like this but the question here is of propagating falsities. Freedom of speech comes later. If it is proven, the speech itself is an utter falsity, then there's no question of having the freedom to speak. If the falsities propagated had some direct dire consequences, it could possibly be considered as crime too. The thing with astrology is, it's hard to actually prove the negative effects it has on the society and that is why a lot of people not just get away with it, but they actually thrive in this business.
Astrology is not even an unproven science. It is absolutely proven that it is not a science at all.

दोन भिन्न घटना आहेत आणि त्यान्ची तुलना करता येणार नाही.

बंगलोर च्या Indian Institute of Science मधे तेथीलच माजी विद्यार्थ्यांनी ज्योतिषविषयक कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला वैज्ञानिक लोकांकडून प्रचंड विरोध झाल्याने ती रद्द केल्याची बातमी आज वाचली.
------ अगदी योग्य निर्णय आहे.

If it is proven, the speech itself is an utter falsity, then there's no question of having the freedom to speak.
>> + 1
वर विकू, नाना, सिम्बा यांना पण मम्!

Astrology is not even an unproven science. It is absolutely proven that it is not a science at all. >> याला आक्षेप घेणारे बरेच असतील. ते शास्त्र का आहे हे प्रुव नाही करता येणार त्यांना, अजून अभ्यास सुरू आहे नी काय काय कारणे देतील.

वैद्यबुवा+१.
सिंबा+१
<काही महिन्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काश्मीरमधल्या फुटीरवाद्यांच्या बद्दल काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.> कार्यक्रम अफझल गुरू आणि मकबूल भट यांना झालेल्या फाशीबद्दल होता.
तो विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. विद्यापीठाने नव्हे.
<दोन्ही ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या मुख्य कामाशी संबंधित नसलेल्या गोष्टीबद्दल कार्यक्रम होते.> असे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित करूच नयेत; विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा विचार करूच नये असं म्हणायचंय का?

IIScतला कार्यक्रम हा चर्चासत्र नसून कार्यशाळा होती. तिथे अशी कार्यशाळा होते, म्हणजे ज्योतिषावर विज्ञान असल्याचा शिक्का बसण्यासारखंच आहे.

कार्यक्रम बंद पडला म्हणजे नक्की काय केलं?

कोणत्याही कार्यक्रमाला सनदशीर मार्गाने विरोध करणं हे देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

चर्चा सत्र नसून तो एक कोर्स होता म्हणून न होऊ देणे योग्य, आयोजनाचे ठिकाण लक्षात घेता.
कोर्स मध्ये प्रश्ण विचारता येत नाहीत आणि म्हणणे चुकीचे असेल तर ते दुसऱ्याला पटवून किंवा समजावून देण्याची संधी मिळत नाही.

Scientific institute मध्ये scientifically prove न झालेल्या गोष्टींवर कोर्स ठेवणे हे endorse करण्या सारखे होईल.
आणि JNU सारख्या इन्स्टिट्युट मध्ये जिथे पोलिटिकल youth विंग्स आहेत आणि पोलिटिकल चर्चा, नारेबाजी आम आहे
ह्या दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही.

JNU चा incident, चर्चा होऊ देणे गरजेचे होते. काश्मीर बाबत त्यांचे जे म्हणणे आहे ते त्यांना मांडण्या पासून बंदी घालणे चुकीचे, त्यांच्या म्हणण्याला चर्चे थ्रू उत्तर देता आले असते.
भाषण आणि नारेबाजी हे चर्चा पेक्षा वेगळे, त्यात ही प्रश्ण विचारण्याचा scope नसतो, पण कोर्स पेक्षा better कारण तुम्ही ह्यात तुमचा विरोध नोंदवू शकता.नारेबाजी ला नारेबाजीनी काउंटर करता येते. भाषणाला ही स्मार्टली काउंटर करता येते.
शिवाय, भाषण आणि नारेबाजी हा ही फ्रीडम ऑफ स्पीच ह्यात येते, सो त्याला थांबवणे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चुकीचे आहे. भाषण आणि नारेबाजी मध्ये sedition कुठे स्टार्ट होते, where to draw the exact line हा वादातीत मुद्दा आहे.
आणि त्या बाबत सेलेक्टिव्ह असणे कितपत रास्त आहे? उदाहणार्थ निवडणुकांच्या वेळेस हे किती काटेकोर पणे पाळल्या जाते?

Pages