फास्टर फेणे ... टॉक्क ... मस्ट वॉच

Submitted by केदार जाधव on 29 October, 2017 - 06:03

ज्यानी लहानपणी फास्टर फेणेचे कारनामे वाचले आहेत त्याना नॉस्टेल्जिक करणारा अन ज्यानी हे नाव कधी ऐकल नाही त्याना वाचायला लावेल असा चित्रपट .
सुरूवातीला अमेय वाघ अन फाफे म्हटल्यावर कुछ जम्या नही अस वाटल होत , पण त्यान धमाल केलीय .
पण चित्रपटाचा खरा हिरो आहे तो "व्हिलन अप्पा" . गिरिश कुलकर्णीचा मी "य" काळापासून फॅन आहे , पण यात तो अफाट आहे . पर्ण पेठे , सिद्द्धार्थ जाधव ठीकठाक. भूभू टू गुड.
दिलिप प्रभावळकरांबद्द्ल तर काय बोलायच ?
थ्रिलर जॉनर असल्याने कथा लिहण चुकीच आहे , पण विषयही अगदी रिलेट करणारा निवडला आहे .
चित्रपटाचा वेन अन मांडणी अप्रतिम . काही पंचेस अन रेफरेन्सेसही सही .नवीन तंत्रज्ञानाचा ऑन स्क्रीन अन ऑफ स्क्रीन वापरही अगदी मस्त .:)
रितेश असल्यामुळे काय की पण पैसाही बराच खर्च करून फिनिशिंग अगदी हिंदी लेव्हलच जाणवत Wink

मराठी कळणार्या (अन न कळणार्यानीही) नक्की पहावा असा .
पिंपळे सौदागरला रविवार १२४५चा शो हाऊसफुल्ल पाहून तर अगदी भरून आल.

तेव्हा चुकवू नकाच .............................. टॉक्क Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे परीक्षण.

मला या चित्रपटात रस नव्हता कारण एक तर माझ्यासाठी फाफे हा sacred टॉपिक असल्याने त्यावर भारा भागवत सोडून कोणी लिहू नये, करू नये असं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे रितेश देशमुखचे मराठी चित्रपट म्हणजे नुसतीच हाईप आणि कंटेंट यथातथा असं मत आहे.
पण फाफे जर हिट झाला असेल आणि तरुण पिढी, अमराठी प्रेक्षक यांनाही आवडत असेल तर हे खूपच आशादायी चित्र आहे त्यासाठी या टीमचं कौतुक वाटतं. या निमीत्ताने फाफेचा पूर्ण २० २५ पुस्तकांचा संच १६०० वजा डिस्काउंट किंमतीत उपलब्ध झाला आहे व लोक नव्याने पुस्तकाकडे वळले आहेत अशीही छान बातमी वाचली.
केदार, जर गिकु फॅन असाल तर अनुराग कश्यपचा अग्ली नामक मुव्ही पाहिला असेलच, एक गिकु सीन आहे पोलीस स्टेशनचा जो जबरी आहे.

"मला या चित्रपटात रस नव्हता कारण एक तर माझ्यासाठी फाफे हा sacred टॉपिक असल्याने त्यावर भारा भागवत सोडून कोणी लिहू नये, करू नये असं वाटत होतं"
सेम हियर. पण या पिक्चर मध्ये चान्गल्या प्रकारे हे केल्याबद्दल आनंद आणि जीव भांड्यात(धपकन) आहे.

आणि दुसरं म्हणजे रितेश देशमुखचे मराठी चित्रपट म्हणजे नुसतीच हाईप आणि कंटेंट यथातथा असं मत आहे.
>>>>>>>

+ 786 फाफेच्या आधी
हे माझेही मत होते.
आणि ती मनाची तयारीसुद्धा करून गेलो होतो. पण सुखद धक्का आहे हा..

जान्देव भरतभाइ... लोगोंको कुछ पता-वता तो होता नै, बस बोल देते हैं.
रितेशभौ मराठी चित्रपटांसाठी लय भारी काम करु राहिलेत. कुणाकडे जबरा स्क्रिप्ट असेल तर घेऊन जावा. निराशा होणार नाही.

बालक पालक रितेशचा होता का? चांगला होता तो..
लय भारी मात्र लयं आचरट होता ..

फास्टर फेणे बघायच्या आधीच याबद्दल रितेशचे मी कौतुक केलेले की त्याला यावर पिक्चर काढावासा वाटला..
मात्र लय भारीचा अनुभव पाहता तश्याच स्टाईलने धंदेवाईक बनवला तर नाही ना याची भितीही वाटत होती.
चित्रपटाने मात्र ती खोटी ठरवली

मला या चित्रपटात रस नव्हता कारण एक तर माझ्यासाठी फाफे हा sacred टॉपिक असल्याने त्यावर भारा भागवत सोडून कोणी लिहू नये, करू नये असं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे रितेश देशमुखचे मराठी चित्रपट म्हणजे नुसतीच हाईप आणि कंटेंट यथातथा असं मत आहे.
Submitted by सनव

>>>>>>>>>

हे तुमच निरीक्षण योग्य आहे अस नाही वाटत...
त्यानी जे काही २ वा ३ चित्रपट काढले.. ते कंटेंट मध्ये त्या त्या सिनेमाच्या फॉरमेट प्रमाणे योग्यच होते..

यथातथा असा कोणता सिनेमा म्हणताय ते पण सांगाल का ?

केदार, जर गिकु फॅन असाल तर अनुराग कश्यपचा अग्ली नामक मुव्ही पाहिला असेलच, एक गिकु सीन आहे पोलीस स्टेशनचा जो जबरी आहे.
>> सनव , नाही पाहिला Sad त्याचे मराठी चित्रपट खूप पाहिलेत . पण हिंदीत गेल्यावर मराठी हिरोचे (लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ)जे होते , नोकर किंवा जास्तीत जास्त सेकंड हिरो, त्यामुळे बघावेच वाट्त नाही

यथातथा असा कोणता सिनेमा म्हणताय ते पण सांगाल का ?

मी माझं मत सांगितलं, ते सर्वांचं मत असावं असा आग्रह नाही!लय भारी तर जाऊ दे, फाफे बद्दल सुद्धा काहींना खूप आवडला आणि काहींना अजिबात नाही अशा प्रतिक्रिया आल्या आहेतच की!

आज पहिला पिक्चर,
अमेय वाघ अजिबात आवडत नाही, मात्र या पिक्चर मध्ये आवडला, इतका आवडला की त्याच्या जागी दुसरा कोणी असू शकत नाही इतका फिट्ट बसलाय तो बनेश म्हणून.

आजोबा, भु भु, अंबादास मस्त, त्यामानाने पर्ण च जरा कमी चमकदार वाटली.
गिकू बद्दल सगळ्यांनी लिहिले आहे त्याला अनुमोदन..

एरियल शॉट्स मध्ये पुणे आणि पर्वती जाम चिकणी दिसते.
BTW या चित्रपटाचा व्यापम scam बरोबर अजून कोणी संबंध कसा जोडला नाही?

स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर
स्पॉयलर

हा प्रतीसाद गि कु ला समर्पित
या पिक्चर मधला व्हिलन खूप चांगला रंगवला आहे.व्हिलन म्हणजे गालावर वण असलेला सॉलिड बॉडि असलेला, मोठ्या आवाजात बोलणारा, विचीत्र कॉस्च्युम्स घालणारा उठून दिसणारा माणूस ही छबी गिकुने जबरदस्त पुसलीय.
एन्ट्री ला कोणीतरी 'हे काय आप्पा' म्हणून लक्ष वेधून घेईपर्यंत कोणाच्या लक्षातही न येणारा, पैसे मागताना पूर्ण ग्राउंड स्टडी करुन समोरच्याची इस्टेट, पैसे जोखून मोठी किंमत लावणारा, 'उंची' नसणारा.ज्या थंडपणे १५ लाख मागेल तितक्याच कुल पणे बाप लेकाचा 'स्माईल....' म्हणून मोबाईल मध्ये फोटो घेणारा.फारशी हिंसा पडद्यावर न दाखवताही अंगावर शहारे आणणारा.
'यात काय आहे?'
'गांडूळ खत!!!!!!'
.
.
.
.
"असं वाटलं का तुम्हाला?"
"यांना धन्यवाद दे रे."
अशी थंड वाक्यं घाबरवून जातात.
बनेश च्या कुटूंबाची पूर्ण माहिती सांगणे, ते अर्धं घश्यात हसणं, शांतपणे क्वीझ सांगितल्याच्या स्वरुपात धमकी देणं.

गिकु छा गया है.

सर्वप्रथम रितेश चं अभिनंदन. सलग तीन सुंदर सिनेमांची निर्मिती केल्या बद्दल. (हो 'लय भारी' पण बर्‍यापैकी आवडला होता).

मी मस्कत मधे १० वर्षं राहतोय. या कालावधीत फक्त ३ मराठी सिनेमे इथल्या थिएटर मधे आले. पहिला 'देऊळबंद' - ज्याचे इथल्या मराठी मंडळाने खास दोन शो एका थिएटर मधे आणले होते.
दुसरा 'वेंटिलेटर' - ज्याचे आठवडाभर एकाच थिएटर मधे दर दिवशी दोन असे शो झाले. अर्थात या सिनेमा ला निर्माती म्हणून जगप्रसिद्ध प्रियांका चोप्राचे बॅकिंग होते.
आणि आता तिसरा 'फास्टर फेणे' - याला तीन थिएटर मधे आठवड्याभराचे शो मिळाले आहेत. पैकी २ मोठ्या थिएटर मधे दिवसाचा एकच शो. आणि तिसर्‍यात दिवसाचे दोन शो !
हे एवढं सगळं डिट्टेल्वार लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमाला चढत्या क्रमाने मिळत असलेले इथले यश ! मराठी सिनेमाची "पहुंच" वाढत असल्याचे पाहून बरं वाटलं.

आता सिनेमाबद्दल.
'य' आवडला !
टॉक्क !

प्रोमो पाहिल्यापासूनच सिनेमाबद्दल फार उत्सुकता होती. अमेय वाघ आवडत असला तरी, फाफे म्हणून कसा वाटेल अशी शंका होती. अनेकांनी वर म्हटल्याप्रमाणे फाफे म्हणून तो परफेक्ट वाटलाय ! त्याचे बटाटे, बेडूक डोळे फाफेच्या व्यक्तिरेखेला एकदम पुरक ठरलेत. नव्या युगाचा, ट्क्नोसॅवी, मेडिकलचा विद्यार्थी फाफे त्याने मस्त उभा केला आहे. अप्पा समोर घाबरलेला तरीही आपल्या मतांशी ठाम असलेला फाफे म्हणून शोभलाय.
फार कमी वेळा एखादा खलनायक सुरुवातीपासून शेवटपर्यंत तितकाच परिणामकारक राहतो. गिरीश कुलकर्णी त्याच्या इंट्रोच्या सिन पासून शेवट पर्यंत "आता काय करतो हा" अशी दहशत निर्माण करण्यात प्रचंड यशस्वी झाला आहे. थंड डोक्याचा, बेरकी, धूर्त, कावेबाज अप्पा गिकु ने त्याच्या बॉडी लँग्वेज, कपडे, संवाद यांच्यातून सॉलीड वठवलाय. बर्‍याच दिवसांनी मराठीत एवढ्या प्रभावीपणे कोणीतरी खलनायक साकारलाय.
बरेच लूपहोल्स आहेत, पण सिनेमा चा वेग ते झाकून ठेवण्यात यशस्वी होतो.
फ्रेश, चकचकीत, वेगवान, उगीचच अनावश्यक गाणी / प्रेमकहाणी न पेरलेला एक मराठी रहस्यपट म्हणून मस्ट वॉच !

'एखादं आयटम साँग येतय का काय ?' ह्या विचाराची 'अप्पा' एवढीच भीती वाटत होती. (केबल नसल्याने ट्रेलर्स, गाणी वगैरे फारशी कानांवर आणि मनावर आदळत नाहित. त्यामुळे ह्या सिनेमात गाणी आहेत की नाही हे माहित नव्हते.) but thanks to the team, तसलं काही नव्हतं.
बाकी सिनेमा मस्त. ज्याप्रकारे शारिरीक बळ न वापरता ( ते नव्हतंच म्हणा :डोमा:) फाफे आजुबाजूच्या हाताला येतील त्या वस्तू वापरुन फाईट करतो, ते छान आणि फाफे ह्या पात्राचा खरा essence दाखंवणारं होतं.

फास्टर फेणे एकंदर खूप चांगला वाटला. प्रेझेन्टेशनच्या बाबतीत चित्रपटाने आपला रिचनेस कुठेही खाली जाऊ दिलेला नाही हि सर्वात जमेची बाजू. बाकी प्लस मायनस सगळीकडे असतात तसे इथे पण आहेत. गिकु माझा मराठीतला अत्यंत आवडता अभिनेता. इथेही झकासच. पण काही प्रसंगात थोडा ओढूनताणून वाटतो. एक्शन्स सीन्स मध्ये हॅरी पॉटर सारखा वागणारा फेणे एरवी मात्र शामची आई मधल्या श्याम सारखा का दाखवलाय कळत नाही. असो. बाकी मूळ कथानक आणि कथानायक जुन्या काळातील असूनही त्याला आजच्या काळातील तंत्रज्ञानाचे वगैरे संदर्भ वापरून "आजचा फास्टर फेणे" म्हणून सादर केले गेले आहे हे खरेच वाखाणण्याजोगे आहे. एकुणात हा चित्रपट खरच पाहण्यासारखा आहे.
.
ता.क.: थिएटर मधून बाहेर आल्यावर माझ्या मुलाची प्रतिक्रिया: "छान आहे पण एकही गाणे नसलेला मराठी सिनेमा मी पहिल्यांदाच बघितला" Happy तोपर्यंत हा मुद्दा माझ्याही ध्यानात आला नव्हता Lol

या सिनेमाच बॉक्स ऑफीस कलेक्शन किती झालय (सहज उत्सुकता म्हणुन) .. कोणाला काही माहीती आहे का ?

या सिनेमाच बॉक्स ऑफीस कलेक्शन किती झालय >>> मलाही हाच प्रश्न हा धागा वर काढून विचारावा असे मनात आलेले. तरी माझ्या अंदाजापेक्षा कमी झाले असावे. म्हणावी तशी पहिल्या आठवड्यानंतर हवा झाली नाही..

मला वाटत फा फे मधे सिनेमाची एक यशस्वी सिरीज होण्याचे खुप मोठे पोटॅन्शीयल आहे..!!!

गिरिश कुलकर्णी एकमेव अप्रतीम ... अख्खा चित्रपट खाल्लाय ... दिलीप प्रभावळकर यांना जास्त काम नाहीये नाही तर त्यांची आणि आप्पाची जुगलबंदी बघायला मजा आली असती ... पर्ण पेठे ला आधी अभिनय शिकवा लागेल ... सिद्धार्थला काहीच रोल नाहीये ... त्याने इतका छोटा रोल का केला असेल ??

चित्रपटाचा वेन अन मांडणी अप्रतिम . काही पंचेस अन रेफरेन्सेसही सही .नवीन तंत्रज्ञानाचा ऑन स्क्रीन अन ऑफ स्क्रीन वापरही अगदी मस्त .:) >>> टोटली.

मस्त पिक्चर आहे. आवडला. फ्लॉज वगैरे आहेत पण टोटल एण्टरटेनमेण्ट. सर्वात भारी गिकु, मग -दिप्र-अवा-शुमो-सिजा-पपे या क्रमाने कामे आवडली Happy

आणखी एक भावलेली गोष्टः अवा कडे कसलेही शस्त्र नाही दाखवले आहे. कुठल्याही शस्त्राविना खलनिर्दालन करायचे म्हणजे केवळ शक्कल अन तंत्रज्ञान एवढेच साथीला. त्यामूळे लिमिट्स व्यवस्थित आखून खेळले आहेत मस्त. पुढच्या भागात देखिल हे कायम ठेवावे त्यांनी.

थॅन्क्स च्रप्स .... २५ Cr. पण छान बिजनेस आहे..
कारण एकतर ह्या प्रकारचा सिनेमा (कॉमिक्स सिरिज वर आधारीत) हे मराठी सिनेमा साठी नविन आहे..
आणि ह्यात गाणी पण नाहीत...

पंचवीस करोड, खरंच का.. ईतका झाला असेल तर खूपच भारी आहे.. चित्रपट मराठी आहे, लिमिटेड ऑडियन्स..

मला पण आवडला चित्रपट. पहिल्यांदा अमेय वाघ हा हिरो म्हणून पचायला कदाचित जड जाईल असं वाटलं होतं, पण त्याने चित्रपटात कमाल केली आहे. बाकीचे कलाकार पण मस्तच.
फाफेच्या पुस्तकांची पारायणे झाली असल्याने, अमेय फाफे म्हणून बघायला अवघड गेले नाही.

Pages