अग्निहोत्र व सत्यधर्म

Submitted by छाया देसाई on 16 March, 2009 - 02:49

भारतातील'' महानुभाव श्रीमाधवजी संस्थान'' माधवाश्रम ,सिहोर रोड बैरागढ ,भोपाल म.प्र.येथून प्रकाशित झालेल्या ''अग्निहोत्र''या हिंदी पुस्तकाच्या आधारे मी आपल्याला '' अग्निहोत्र व सत्यधर्म ''या विषयाची माहिती देत आहे.
सत्यधर्माचा अर्थ आहे अपरिवर्तनीय सिद्धांत जे कुठल्याही कसोटीवर पारखले असता सत्य सिद्ध होतात.
असे सत्य सिद्धांत सार्वभौमिक व सर्वकालिक असतात् म्हणून जाति ,उपजाति,वर्ग-वर्ण,खान-पान,देश
प्रदेश अशी कुठलिही कुंपण सत्य धर्माला अडवू शकत नाहीत.
मानवाला ज्ञात असा प्राचीनतम ज्ञानसंग्रह म्हणजे वेद.वेद शब्द हा ''विद्''धातुपासून बनला आहे. विद
म्हणजे जाणून घेणे.वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान.या ज्ञानावर मानवाचा अधिकार आहे्. हे ज्ञान एकदेशीय ,एकवर्गीय, एकजातीय अस होऊच शकत नाही .जस की पदार्थविज्ञान किंवा गणित्.वेदोक्त
सत्य धर्म हा संपूर्ण मानव जातिला एक आहे. याच्या आचरणाने सर्व मानव जातिला लाभ आहेत.
सृष्टिच्या निर्मिती बरोबर ईश्वराने सर्व मानवजातिला वेदांच्या माध्यमातून सत्यधर्माचे आदेश दिले.प्रचलित
सर्व धर्म बदलत्या काळानुरूप ईश्वरदूताकडून वेळोवेळी प्रतिपादित केले गेले पण ते नवीन धर्म नव्हेत.
भगवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी पुरातन काळापासून चालत आलेला योग तुला सांगतो.
''स एवायं मया तेद्द् प्रोक्त; पुरतन;''बायबल मध्ये ईसामसिह सांगतात ''मी प्रस्थापित धर्म तोडण्यासाठी
नव्हे तर प्रस्थापित धर्माची पुष्टि करण्यासाठी आलो आहे.पैगंबर मुहम्मद याच स्वरात म्हणतात ''और यह
कुरान ऐसा नही है की अल्लाह के सिवा कोई अपनी ओरसे गढ लाए, बल्कि यह तो जो कुछ इससे पहले
है उसीकी तसदीक और अल्लाह की किताब का विस्तार है.''
आता वास्तवात वर्तमान काळात मूळ प्रवर्तकानी ,प्रेशितानी जसा धर्म प्रतिपादीत केला त्या स्वरूपात धर्म
राहिला नाही.जेव्हा जेव्हा सत्य धर्मावर आपत्ती आली ,सत्य धर्माला ग्लानी आली तेव्हा ईश्वरप्रेषितानी
धर्मसंकट दूर करण्यासाठी मूळ धर्माच एखाद अंग किंवा एखादा अंश आपदधर्माच्या स्वरूपात उपदेशित
केला .आज मात्र मूळ धर्माच स्वरूप वाद्,मत,पंथ आणि संप्रदाय एवढच राहिल आहे.
श्रीकृष्ण्,ईसामसिह,महम्मद पैगंबर यांच्या वचनावरून हे स्पष्ट होत की ईश्वर प्रेषितांच्या उपदेशाचा मूळ
आधार वेदोक्त सत्य धर्मच आहे.म्हणून कुरूक्षेत्रावरचा उपदेश म्हणजे गीता,सारनाथ येथील गौतमबुद्धांची
प्रवचन ,पवित्र तूर पहाडीवर मूसाला झालेल अग्निदर्शन ,येसू ख्रिस्तांचे दहा आदेश तसेच मोहम्मद
पैगंबरांची धर्मगर्जना या सर्वांचा अर्थ सत्य धर्माच्या आचरणानेच स्पष्ट होउ शकतो.सत्यधर्माच्या आच्रणाने
प्रत्येक हिंदू ,मुसलमान,सिख,ईसाई,बौद्ध,पारसी,जैन,बहाई आपल्या आपल्या मतांचा आधिक निष्ठावंत अनुयायी होउ शकतो .

आपण स्वत्;ला आस्तिक ,नास्तिक अगदी संदेहवादी सुद्धा समजत असाल तरी सत्यधर्माच्या आचरणाने
आपण सर्वप्रथम समाजसंगठणाचे महत्वपूर्ण अंग होतो .उत्तम डॉक्टर ,उत्तम इंजिनियर्,उत्तम शिक्षक
होण्यासाठी सर्वप्रथम आपण उत्तम मनुष्य असण गरजेच आहे .सत्यधर्माच्या आचरणाने उत्तम मनुष्य
होण सहज शक्य आहे .
आज आपण प्रायोगिक विज्ञानाच्या युगात जगत आहोत्.याचा अर्थ आहे स्वतंत्र चिंतन,नवीन तथ्यांच निष्पक्ष
आकलन व सत्याच कठोरपणे केलेल परीक्षण .वैज्ञानिक युगात उत्पन्न झालेल्या नवीन चेतनेने मनुष्याला
सत्यान्वेषी बनवल आहे .कुठल्याही धर्मगुरूवर विष्वास करण्यापेक्षा आजचा मनुष्य एका वैज्ञानिकावर
विष्वास ठेवण जास्त सुरक्षित समजतो कारण वैज्ञानिक जे काही सांगतो तो ते निश्चितपणे जाणत असतो .
सत्यधर्म आज वैज्ञानिकांचा धर्म झाला आहे .वैज्ञानिक आज सत्यधर्माच्या सिद्धांताची पुष्टी करीत आहेत.
या सत्यधर्माला आपण पंचसाधनमार्ग अससुद्धा म्हणू शकतो. ही पंचसाधन आहेत यज्ञ,दान्,तप,कर्म व
स्वाध्याय .
यज्ञ हे वायुमंडल शुद्धीच माध्यम आहे .वायुमंडल शुद्धीमुळे मन्;शुद्धी होते .त्रिविध स्वास्थ्यासाठी यज्ञ हे
महत्वपूर्ण साधन आहे .
प्रेमाचा साम्यवाद म्हणजे दान .दानाच्या आचरणाने शेजारी ,समाजातील व्यक्ती ,जीव ,विश्व यांच्याबद्दल
प्रेम व आपलेपणाची भावना निर्माण होते .दानामुळे मनाला आसक्तीरहित अशी अवस्था प्राप्त होते .
कर्मक्षेत्रापासून पलायन न करता जीवनसंघर्षाला सामोर जाण्याच धैर्य तपाचरण देत .तपाचरणामुळे
शरीर मन व बुद्धी यांच्यात पवित्रता व दृढता प्राप्त होते .स्विकृत कार्य उत्तम रीतीने करण्याची शक्ती
मिळते.
करावे तसे भरावे असा नियम आहे .कर्माचरणामुळे योग्य व अयोग्याचा विवेक येतो .कर्माचरण आत्मशुद्धीच साधन आहे .
अनेक अनुत्तरीत प्रश्न ,समस्या ,जिज्ञासा यांच अंतिम समाधान स्वाध्यायाच्या आचरणाने शक्य होत .
म्हणून स्वाध्याय हे मुक्तीच साधन आहे.
वेदोक्त सत्यधर्माच्या आचरणाने आत्मविश्वास प्राप्त होतो .ज्या नियंत्याने आपली निर्मिती केली त्याच नित्य
स्मरण करण फार गरजेच आहे .आयुष्य मर्यादित आहे .आपल्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करण
श्रेयस्कर असत .वर्तमानकाळ आपल्या हातात असतो .भूतकाळ निघून गेला .भविष्यकाळ अज्ञात आहे .
वर्तमान काळातील मुल्यवान क्षणाना असच गमावण योग्य नाही .
पंच्साधनमार्ग ही एक जीवनप्रणाली आहे ,जी मनोकायिक प्रणालीवर आधारीत आहे .या प्राचीनतम ज्ञानावर
जी अजूनपर्यंत बंधन होती ती तोडून हे ज्ञान सामान्य माणसासाठी मोकळ केल आहे .आता हे ज्ञान वेदोक्त
प्राचीन सत्याला जाणण्यासाठी व सत्याचा अनुभव घेण्यासाठी मुक्त आहे .या सत्यधर्माच आचरण प्रत्येकाने
जरूर कराव .स्वत्;चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपल्याला एक उत्तम साधन प्राप्त झाल आहे .याचा
आपण जरूर अनुभव घेवू शकाल .परीक्षण केल्याशिवाय काही करण हे अंधश्रद्धेपेक्षा मूर्खपणाच आहे .आपल्याला केवळ पंचसाधन मार्गाच आचरण करण गरजेच आहे .ज्ञान आपल्याआप उदयाला येत .
सदोदित आपल्या स्वत्;च्या अनुभवावर विश्वास करण गरजेच आहे आणि हाच वैज्ञानीक दृष्टीकोन आहे .
या पंचसाधन मार्गात सर्वप्रथम स्थान यज्ञाला दिल गेल आहे .यज्ञ दोन प्रकारचे असतात ,नित्य व नैमितीक .यात नित्य यज्ञ अग्निहोत्र याचा आपण विशेषत्वाने विचार करू .
नित्य अग्निहोत्र या यज्ञात ठीक सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मंत्रोच्चारण करून अग्निला आहूति द्याव्यात .
सूर्योदयाच्या आहूतीचे दोन मंत्र असे-
''सूर्याय स्वाहा; सूर्याय इदम न मम
प्रजापतये स्वाहा; प्रजापतये इदम न मम ''
या दोन मंत्राबरोबर गाईच्या तुपाने माखलेल्या पंधरा वीस तांदळाच्या दाण्यांच्या ,पिर्‍यामिडच्या आकाराच्या
तांब्याच्या पात्रात ,गाईच्या गोवर्‍यानी जळवलेल्या अग्नित दोन आहूति द्याव्यात व सकाळच अग्निहोत्र कराव.
अशाच प्रमाणे सूर्यास्ताच्यावेळी सूर्यास्ताचे मंत्र म्हणून अग्निहोत्र करावे .सूर्यास्ताचे मंत्र असे
''अग्नये स्वाहा; अग्नये इदम न मम
प्रजापतये स्वाहा;प्रजापतये इदम न मम ''
आहूति दिल्यावर जोपर्यंत ती जळत रहाते तोपर्यंत स्थिरपणे अग्निपात्राजवळ बसाव .या क्षणांचा जरूर
अनुभव घ्यावा .या क्षणी अपूर्व मानसिक शांती आणि आनंदाची अनुभूती होते .दुसर्‍या अग्निहोत्रापर्यंत
आपण प्रसन्न राहू शकतो .सूर्योदयाअगोदर स्नान करण्याची जर आपल्याला सवय असेल तर उत्तम
अन्यथा हात पाय धुऊन सुद्धा अग्निहोत्र करू शकतो .
अग्निहोत्रासाठी रोजची काही मिनीटच लागतात .कुटुंबातील एकाच सदस्याने आहूति द्याव्यात व बाकी
सर्वानी त्या स्थानी स्वस्थ चित्त बसाव .अग्निहोत्रातून उत्पन्न होणारी सर्व तत्व वातावरण प्रदूषण दूर
करतात .अग्निहोत्राचा शुभ परीणाम घरातील प्रत्येक सदस्याच्या शरीर ,मन व बुद्धीवर होतो .परीवारात
शांती ,सामंजस्य व अनुशासनाच साम्राज्य रहात .वायुमंडल तुष्टि-पुष्टिदायक तत्वानी परीपूर्ण व सुगंधित
होत .
गीतेच्या तीसर्‍या अध्यायात यज्ञावर भर दिला आहे .सत्य धर्माच महत्व सांगताना गीता म्हणते
''यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्य मेव तत
यज्ञो दानं तश्चैव पावनानी मनीषिणाम ''

गुलमोहर: