पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....

Submitted by निर्झरा on 26 October, 2017 - 06:04

पुर्वी पासपोर्ट काढणे अवघड होते असे ऐकून होते. अलीकडच्या काळात ही प्रक्रिया विना एजंट सहज करता येते. अट फक्त एकच, तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा. आमचे पासपोर्ट काढून झाले होते तेव्हा ईतका त्रास झाला नाही, पण काही दिवसांपुर्वी माझ्या आईचा पासपोर्ट काढायचे ठरले. तस जेष्ठ नागरीकांसाठी काय काय लागत हे साईटवर बघून झाल. त्यांच्या मागणीनुसारा 'अ' आणि 'ब' दोन गटांतील यादीतील कुठलही एक -एक डॉक्युमेंट पुरेस होत. यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे तर आमच्याकडे होत. आम्ही लगेच कामाला लागलो. फॉर्म भरला, या दोन डॉक्स व्यतिरिक्त लाईटबिल, गॅस कार्ड, पासबूक असे ईतरही कागद ज्यात तिच नाव असेल असे जवळ ठेवले. आमचा अपॉईंटमेंटचा दिवस आला. आई आणि कागद पत्रांसकट आम्ही पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. पहिली फेरी झाली. मला हुश्श वाटल. पुढे दुसरी फेरी झाली तस अजून हायस वाटल. आता आम्ही शेवटच्या फेरीत आलो आणि आमचा नंबर आला होता त्या बाईसमोर बसलो. तिने सगळी कागदपत्र तपासली. काही क्षण पॉज घेतला आणि विचारल.... " ह्यांच लग्ना आधीच नाव वेगळ होत का?" झाल, आमची पंचाईत झाली. खरं बोलाव की वेळ मारून न्यावी अस झाल. पण आम्ही हरिशचंद्रांच्या घराण्यातले असल्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणून गेलो की लग्ना आधीच नाव वेगळ होत. मग तिचा पुढचा प्रश्न " ते नाव फॉर्म मधे टाकल नाही? काय बोलावे ते कळेना. तस सांगीतल की पासपोर्ट सासरच्या नावानेच हवाय. हे नाव टाकायच असत हे माहीत न्हवत. तस तिने परत सांगीतल... " पेपर आउट करा" या वाक्याचा बराच वेळ काही संदर्भच लागेना. तिला परत विचारल नेमक काय. तस तिने सांगीतल..." दोन न्युज पेपर मधे यांची अ‍ॅड द्या नाव बदल्याची. एवढ बोलून ती तिच्या पुढच्या कामाला लागली आणि आम्हाला पुढची अपॉईंटमेंट दिली.
आम्ही घरी आलो. अ‍ॅड एजन्सीला फोन केला तेव्हा कळाले की अशी अ‍ॅड देण्यासाठी एफिडेवीट लागत. मग आम्ही तेही करून घेतल. अ‍ॅड पाठवली. परंतू पेपरला सुट्टी आल्याने आमची अ‍ॅड एक दिवस उशीरा येणार होती. तरीही ती अपॉईंटमेंटच्या एक दिवस आधी येणार होती. अचानक अ‍ॅड येणार त्याच्या एक दिवस आधी त्या एजंसी मधुन फोन आला. तिच्या मते आमची अ‍ॅड दिल्या तारखेला येऊ शकत न्हवती. हे ऐकल्यावर मला तर काहीच सूचेना. म्हणजे पुन्हा नविन तारखेची अपॉईट्मेट घ्या, मी तिला खडसावल तरीही ती अ‍ॅड द्यायला तयार होईना. शेवटी ज्या पेपरमधे अ‍ॅड येणार होती तिथे फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगीतली. आम्ही नियमाप्रमाणे चार दिवस आधी अ‍ॅड दिली होती. तरीही ती हवी त्या तारखेला येणार न्हवती. मग तो माणूस अ‍ॅड द्यायला तयार झाला. हो नाई करता ज्या दिवशी अपॉईंटमेंट होती त्या दिवशी अ‍ॅड येईल असे सांगीतले. मनात धाकधूक होत होती. पेपरवाल्याला सकाळीच पेपर टाकायला सांगीतला. त्या दिवशी सकाळी पेपर येताच पहिले पान हे अ‍ॅडचे बघितले, आईचे नाव...... दिसले, सापडले, अ‍ॅड आली. लगेच तिला घेउन परत पासपोर्ट ऑफिस गाठले. शेवटची फेरी पार पडली. हुश्श् करून बाहेर पडलो.
आता पोलीस व्हेरीफिकेशन. रोज आईचा फोन चेक करायचा. काही मेसेज आलाय का ते पहायला. आमचे पासपोर्ट काढले तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण आइच्या वेळेस चक्क तो पोलीस घरी येतो म्हणाला. तस आईला घेऊन तिच्या घरी पोहोचलो. घरात झाडु मारला. खुर्च्या टाकल्या. ( वडील गेल्या पासून आई माझ्याकडे आणि बहीणिकडे थोडे थोडे दिवस राहते. त्यामुळे तिच घर बंदच असते. घरातील सामान नुकतेच पॅक करून एका खोलीत टाकून ठेवले.) पोलीस आले, त्यांच्या शोधक नजरेने त्यांनी लगेच ओळखले की या घरात कोणी राहात नाही. तस त्यांनी प्रश्न केला.
" तुम्ही ईथे रहात नाही का?", झालं..... आता काय बोलाव. तस त्यांना सांगीतल की मुलाच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे आईला माझ्याकडे नेले आहे. तरीही हे उत्तर त्यांना पटले नाही. दोनचार वाकडे प्रश्न केलेच. मग आईचे अजून काही डॉक्स त्यांनी मागीतले. शाळ सोडल्याचा दाखला. आता तो काही आईकडे न्हवता. मग जन्म दाखला. तो होता पण त्यावर तिच नावच न्हवत. त्यात फक्त जन्म तारीख आणि आई वडिलांचे नाव एवढच होत. तो ही त्यांना पटला नाही. हो नाई करता. त्याने सांगीतले कि तुम्ही तुमच्या मुलिंच्या घराचे पत्ते यात का टाकले नाहीत. तुम्ही तिथे राहता तर ते टाकायला हवे. अरे देवा.... आता हे काय..... या सगळ्यातून एक लक्षात आले की एजंट का हवा.
आता तो पोलीस सांगून गेला आहे की फॉर्म मधे दोघी मुलींचे पत्ते घाला.
आता हे सगळ जवळ जवळ महिनाभर चालु आहे. अजूनही काम अर्धवटच आहे. बघूया पुढे काय होतय.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एजन्टथ्रू पासपोर्ट जो काढला जातो त्यात त्या संबंधित व्यक्तीचे डोळे , हाताचे ठसे वगैरे कसे तपासले गेले ?>> तेव्हा तशी काही तपासणी झालीच नाही. मला जर सांगितले असते कि तुम्हाला पासपोर्ट काचेरीत जावे लागेल तर मी गेले असते. पण तसे काहीही करावे लागले नाही.

सोनाली, आपण काही जणांनी पासपोर्ट २०१० च्या आधी काढले आहेत आणि काही जणांनी नंतर .. त्यामुळे हा सगळा गोंधळ चालू आहे.
त्यातही बीफोर २०१० च्या टीममधून या धाग्यावर पहिली पोस्ट टाकणारा ऋन्मेष असल्याने त्याच्या इमेजला अनुसरून त्याच्या अनुभवावर शंका घेतली गेली ईतकेच Happy

यासंदर्भात सोनू यांची पोस्टही उपयुक्त.
मला वाटते आता बरेच गोंधळ क्लीअर झाले असतील., तेव्हा पासपोर्ट ऑफिसला न जाणेही चालून जायचे, तसेच डोळ्याहातांचे ठसे वगैरे झेंगाटही नव्हते त्यामुळे आमचे काम असे घरबसल्या झाले. अर्थात पोस्टेला जावे लागले, पण ते देखील एकदाच !

अवांतर - लहान वयात, म्हणजे शिकताना पासपोर्ट काढणारा मी एकटाच आहे वाटते ईथे Happy

Sonalisl , ओके
इथे २०१० ला एजन्टथ्रू पासपोर्ट काढणारे दिसत आहेत तसेच २००८ साली विना एंजट पासपोर्ट काढणारेही आहेत . चंपानी २०१० सालीच विना एजन्ट पासपोर्ट काढलाय . गंमत आहे .

Sonalisl ,अजून एक शंका आहे .साहिल शहा म्हणत आहेत तस एजन्टने काढलेल्या पासपोर्टद्वारे नजीकच्या काळात परदेशी प्रवास करताना एअरपोर्टवर काही अडचण आली का ?

माझा पासपोर्ट 2005 साली काढला होता.
तेव्हा एजंट दोन प्रकारचे चार्जेस लावत
१. फक्त फॉर्म भरून देणे आणि सर्व कागदपत्रे शहानिशा करून जोडून देणे. मग आपलं आपण जाऊन अपॉइंटमेंट घेऊन फॉर्म सबमिट करणे
२. सगळं एजंट करणार आणि आपण अपॉइंटमेंटच्या दिवशी फक्त छान छान कपडे घालून पासपोर्ट ऑफिस ला जायचे.

ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये भयानक वेळ जायचा. हाताने लिहून फॉर्म भरणे, सगळी कागदपत्रे अट्टेस्टेड करणे, अपॉइंटमेंट घेणे, पासपोर्ट ऑफिस ला जाऊन रांगेत थांबणे वगैरे वगैरे.

मी पासपोर्ट काढायच्या वेळेस पासपोर्ट ऑफिस ने चेंबूर पोलीस स्टेशनला तात्पुरते एक नवीन केंद्र चालू केले होते. तिथे मी सकाळी जाऊन थांबलो आणि दोन तासात फॉर्म सबमिट करून बाहेर पडलो. पोलीस व्हेरिफिकेशनला पोलीस घरी आला 200 रु चहापाणी घेऊन गेला. 15 दिवसाने पासपोर्ट आला होता.

पुण्याच्या पासपोर्ट ऑफिसचे एक दोन निगेटिव्ह किस्से वर वाचले.

मी मागच्या 3 वर्षात माझा पासपोर्ट रिन्युअल, बायकोचा मूळ पासपोर्ट काढणे नंतर परत नाव बदलून नवीन पासपोर्ट घेणे, मुलाचा नवीन पासपोर्ट, आई वडिलांचा पासपोर्ट रिन्युअल इतके सर्व केले आणि प्रत्येक वेळेस मी पासपोर्ट ऑफिसला 5 स्टार देईन. अतिशय व्यवस्थित आणि प्रोफेशनल.

वेबसाईट वर सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे. कोणत्या केसेस मध्ये कोणती डॉक्युमेंट लागतात याची यादी सुद्धा आहे. मला तिथे गेल्यावर त्यांनी मी लावलेली डॉक्युमेंट सोडून एकही डॉक्युमेंट मागितले नाही. प्रत्येक वेळेस मी पासपोर्ट ऑफिसला पोचल्यापासून 2 ते अडीच तासात बाहेर पडलो आहे.

पुण्याचे नवीन ऑफिस चालू करताना त्यांना बहुतेक इतके लोक येतील हा अंदाज नसावा कारण शेवटी जिथे डॉक्युइमेन्ट व्हेरिफिकेशन होते तिथे बसायला जागा कमी आहे. लोकांना बाहेरच्या सिटिंग एरिया मध्ये पण डिस्प्ले बोर्ड आहे हेच माहीत नसते त्यामुळे तिथे कायम गर्दी असते.

पोलीस व्हेरिफिकेशनला थोडेफार चायपाणी द्यावे लागले होते.

बाकी पुणे पासपोर्ट ऑफिस एकदम फास्ट आणि एफिशिएन्ट....

वेबसाईट वर सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे. कोणत्या केसेस मध्ये कोणती डॉक्युमेंट लागतात याची यादी सुद्धा आहे. मला तिथे गेल्यावर त्यांनी मी लावलेली डॉक्युमेंट सोडून एकही डॉक्युमेंट मागितले नाही.>>>> सहमत . पूर्ण वेबसाइट नीट वाचली आणि कागदपत्र नीट असली तर अजिबात एजन्टची गरज लागत नाही

ही विनोदी व्यथा कशी?
आईचा पासपोर्ट काढताना ज्या अडचणी येत आहेत त्या कडे त्रास म्हणून न बघता त्या गोष्टींकडे विनोद म्हणून बघत आहे.
जसे.. आईचे लग्नापुर्वीचे नाव, उतार वयात तरी तिला या नावाची काही गरज नाही आणि पासपोर्टवरही कुठेही किंवा अन्य कुठेही तिचे हे नाव येणार नाही मग यात पासपोर्ट अडवून ठेवण्यासारखे काय होते ते माहीत नाही. पण त्या साठी करावी लागणारी जाहीरातिची गडबड त्यात झालेला त्रास, तसेच पोलीस प्रकरण, या वेळेस चक्क चिरीमिरी(चहापाणी) घेण्यास मिळालेला नकार हाच एक मोठा विनोद होता माझ्यासाठी.(यात कुठल्याही पोलीसाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
हे सगळ केल्या नंतर ह्या गोष्टी आठवून मला खरच हसू येत होत.

Sonalisl ,अजून एक शंका आहे .साहिल शहा म्हणत आहेत तस एजन्टने काढलेल्या पासपोर्टद्वारे नजीकच्या काळात परदेशी प्रवास करताना एअरपोर्टवर काही अडचण आली का ?>> नाही. गेल्या १० वर्षात एकदाही अडचण आली नाही.

"प्रत्येक वेळेस मी पासपोर्ट ऑफिसला पोचल्यापासून 2 ते अडीच तासात बाहेर पडलो आहे." - Uhoh
so much for online work and efficiency!
अतरंगी, ही प्रतिक्रिया वैय्यक्तिक तुम्हाला नसून, त्या process ला आहे.

फेरफटका,

फॉर्म ऑनलाईन भरून तिथली सगळी प्रोसेस मॅन्युअल आहे.
जितकी आणि ज्या प्रकारची गर्दी ते पासपोर्ट ऑफिस हाताळते आहे त्याच्यावरून मी तरी दोन तासात बाहेर पडण्याला मी तरी efficiency म्हणेन.

जुन्या पासपोर्ट ला अडचण येणार नाही. कारण त्यावेळी पासपोर्ट ऑफीस मध्ये बायोमॅट्रीक घेत न्हवते. त्यामुळे जे ईमिग्रशन मध्ये पहिल्यादा बायोमॅट्रीक घेतात ते तुमचे रे़ओर्डेड बायोमेट्रिक होतात. ६ वर्शापुर्वी माझे पण बायोमेट्रीक घेतले न्हवते त्यामुळे जर तो पासपोर्ट एजन्टने काढला असता तरी काही ईश्यु न्हवता.
ह्या वर्षी (कदाचित मागच्या वर्षी पण झाले असेल , नक्की कट ऑफ माहित नाही). पासपोर्ट काढताना सगळे बायोमॅट्रीक गेतात. अश्या वेळी जर एजन्टने जर स्वताचे किंवा आजुन कोणाचे बायोमॅट्रीक दिले तर रेकॉर्ड मॅच होणार नाही. मुद्दा असा आहे की जरे नवीन पासपोर्ट काढताना जर भारतात पासपोर्ट ऑफीस मध्ये गेला नाहीत तर कदाचित बाहेर जाताना एअर पोर्टवर अडवले जाउ शकते. ५ -१० वर्षापुर्वी च्या पासपोर्टला मात्र अडवणुक होणार नाही. हा नियम आजुनतरी परदेशात भारतीय पासपोर्ट काढणार्याला लागु झाला नाही.

जुन्या पासपोर्ट ला अडचण येणार नाही. कारण त्यावेळी पासपोर्ट ऑफीस मध्ये बायोमॅट्रीक घेत न्हवते. त्यामुळे जे ईमिग्रशन मध्ये पहिल्यादा बायोमॅट्रीक घेतात ते तुमचे रे़ओर्डेड बायोमेट्रिक होतात.>> तसेच असेल.
माझा पासपोर्ट मी २ वर्षापुर्वी New York मध्ये renew केला. तेव्हा सुद्धा काही अडचण आली नाही.

आता तो पोलीस सांगून गेला आहे की फॉर्म मधे दोघी मुलींचे पत्ते घाला.
आता हे सगळ जवळ जवळ महिनाभर चालु आहे. अजूनही काम अर्धवटच आहे. बघूया पुढे काय होतय.......

वर लिहल्याप्रमाणे पत्ते देण्यासाठी माझा नवरा पासपोर्ट ऑफिसला गेला. पोलिसाने सांगितले की आईला न्यायची गरज नाही. त्याप्रमाणे नवरा एकटाच गेला. तिथे गेल्यावर काळाले की आईला नेणे गरजेचे होते. तस काही दिवसांनी परत आई सकट मोर्चा ऑफिसमधे पोचला. तिथे सांगण्यात आले की आमचे पत्ते टाकण्यासाठी दंड भरावा लागेल आणि तोही केवळ पाच हजार रुपये फक्त...... तस त्यांना विचारल कि दंड न भरता दुसरा काय ऊपाय आहे का. तर त्यांनी सांगितले की परत पोलिस व्हेरिफिकशनची रिक्वेस्ट टाका आणि त्यांना स्टेटमेंट बदलायला सांगा. तस आम्ही केल. दोन दिवस वाट पाहूनही व्हेरिफिकेशनसाठी फोन आला नाही. मग आम्हीच त्या पोलिसाला फोन केला तस त्याने तो काहीही करू शकत नाही म्हनून सांगीतले.
आता काय करावे कळत नाहीये. पोलिस ऐकायला तयार नाही.
या स्थितित ही अपॉईंटमेंट बाद होऊन नविन फॉर्म भरता येऊ शक्तो का? माहीती असल्यास सांगावे.

या स्थितित ही अपॉईंटमेंट बाद होऊन नविन फॉर्म भरता येऊ शक्तो का? माहीती असल्यास सांगावे. >>
माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जुने अ‍ॅपलिकेशन क्लोज करावे लागेल..डी.पी.ओ. असतात त्यांच्याकडुन क्लोज लेटर आणावे लागेल..त्यासाठी काहीतरी प्रोसेस असते.मला नेमके माहिती नाहीये.तुम्हाला पासपोर्ट च्या वेबसाईट्वर मिळते का पहा.
मग तुम्हाला क्लोजिंग नंबर मिळेल..तो नव्या अ‍ॅपलिकेशन मद्धे टाकावा लागेल.
तुम्ही आत्ता तसच नवीन अ‍ॅपलिकेशन केलं तर तुमच्या नावे जुनं अ‍ॅपलिकेशन पेण्डींग दिसेल त्याम्च्या सिस्टीम मद्धे सो ते प्रोसेस करणार नाहीत.

पासपोर्ट ची सगळी सिस्टीम जेव्हा ऑन्लाईन झाली नव्हती तेव्हा म्हणजे सेनापती बापट रोड वर ऑफिस असताना मी एका एजंट तर्फे पासपोर्ट रीन्युअल साठी अर्ज केला होता ( पासपोर्ट एक्स्पायर व्हायला ४-५ महिने बाकी होते )...त्या महान माणसाने माझा फॉर्म भरताना माझ्या अ‍ॅड्रेस्स वर काहीतरी चुक केली....काय ते माहित नाही....फॉर्म भरला ,अपॉईंटमेंट मिळाली असा मला त्याने फोन केला त्यानुसार माझा नवरा सगळी कागदपत्रे घेउन तिकडे गेला. ( त्यावेळी तुम्ही प्रत्यक्श नसलात तरी चालत होतं सो मी नाही गेले.) नवर्याच्या पासपोर्ट च पण रीन्युअल होतं.त्याचं काम झालं त्याच्या आणि माझ्या जुन्या पासपोर्ट वर पासपोर्ट ऑफिस मधल्या ईसमाने "डीलीटेड" असा शिक्का मारला आणि मग अचानक त्याला असं लक्षात आलं की माझं अ‍ॅप्लिकेशन त्याच्या मशीन वर डीटेक्ट झालच नाहिये.नवर्याचं झालं न माझं नाही असं का हा शोध लावताना त्याने कारण दिलं की माझ्या अ‍ॅप्लिकेशन मद्धे पत्ता देताना काहितरी चुक झाली आहे सो माझं अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस होणार नाही असं म्हणुन त्याने दोघांचे पासपोर्ट परत केले.माझ्या पासपोर्ट च्या २र्या पानावर त्याने ऑलरेडी "डीलीटेड" शिक्का मारलाय हे गडबडीत त्याच्या न नवर्याच्या दोघांच्या लक्षात आले नाही.अशा रितीने त्यांच्या ऑफिस साठी माझा पासपोर्ट अस्तित्वात होता आणि माझ्या हातातला पासपोर्ट डीलीटेड होता...
त्यानंतर काही ना काही कारणाने मी पासपोर्ट रीन्यु केलाच नाही.गेलया वर्षी पासपोर्ट रीन्यु करायचा म्हणुन काढला तेव्हा सुद्धा "डीलीटेड" शिक्का ही गोष्ट मी अज्जिबात विसरुन गेले..
ऑन्लाईन फॉर्म भरला आणि अपॉईंटमेंट घेतली.तिकडे पोचले तेव्हा टोकन अलॉट करताना "डीलीटेड" शिक्का दिसला त्या लोकांना आणि मग मी ऑफिसर च्या पुढे पोचले.त्या बाईला सगळी जुनी स्टोरी सांगितली पण तिने काहीही सहकार्य न करता मला काहीही करा न जुन्या आप्लिकेशन चं क्लोज लेटर आणा म्हणुन जुन्या ऑफिस ला पाठवले.
आता माझं जुनं आप्लिकेशन सिस्ट्म वर डीटेक्ट न झाल्यामुळेच तर हा सगळा घोळ झालाय हे सांगायचा त्यांना खुप प्रयत्न केला पण त्यांनी काहीच ऐकुन नाही घेतलं.
शेवटी जुन्या ऑफिस मद्धे पोचले.
तिथे ३ तास लाईन मद्धे वाट बघुन शेवटी पासपोर्ट ऑफिसर च्या समोर परत सगळं गाणं गायलं.
तो बराच शांत आणि सहकार्य करणारा भला माणुन निघाला हे माझं नशीब.
त्याने त्याच्या सीस्टीम मद्धे शोधलं पण माझं जुनं आप्लिकेशन त्याला मिळालच नाही मग तो क्लोज लेटर तरी कसं देणार.
माझी केस ऐकुन तो हसायलाच लागला...असं कसं आप्लिकेशन प्रोसेस करायच्या आधी शिक्का मारला "डीलीटेड" चा असं म्हणाला..मी म्हटलं बघा आता तुम्हीच ईथलीच माणसं Wink
पण तरी त्या भल्या माणसाने स्वतः च्या जबाबदारी वर मला exceptional case म्हणुन त्याच्या सही न शिक्क्याचे पत्र दिले व परत नवीन अ‍ॅप्लिकेशन न करता सेम अ‍ॅप्लिकेशन साठी दुसरी अपॉईंट्मेंट घेउन माझं काम झालं.)

ईति माझी पासपोर्ट कथा...

( पोलीस व्हेरीफिकेशन ची वेगळी स्टोरी आहे पण ती परत कधीतरी नंतर ) :ड)

Pages