पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....

Submitted by निर्झरा on 26 October, 2017 - 06:04

पुर्वी पासपोर्ट काढणे अवघड होते असे ऐकून होते. अलीकडच्या काळात ही प्रक्रिया विना एजंट सहज करता येते. अट फक्त एकच, तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा. आमचे पासपोर्ट काढून झाले होते तेव्हा ईतका त्रास झाला नाही, पण काही दिवसांपुर्वी माझ्या आईचा पासपोर्ट काढायचे ठरले. तस जेष्ठ नागरीकांसाठी काय काय लागत हे साईटवर बघून झाल. त्यांच्या मागणीनुसारा 'अ' आणि 'ब' दोन गटांतील यादीतील कुठलही एक -एक डॉक्युमेंट पुरेस होत. यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे तर आमच्याकडे होत. आम्ही लगेच कामाला लागलो. फॉर्म भरला, या दोन डॉक्स व्यतिरिक्त लाईटबिल, गॅस कार्ड, पासबूक असे ईतरही कागद ज्यात तिच नाव असेल असे जवळ ठेवले. आमचा अपॉईंटमेंटचा दिवस आला. आई आणि कागद पत्रांसकट आम्ही पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. पहिली फेरी झाली. मला हुश्श वाटल. पुढे दुसरी फेरी झाली तस अजून हायस वाटल. आता आम्ही शेवटच्या फेरीत आलो आणि आमचा नंबर आला होता त्या बाईसमोर बसलो. तिने सगळी कागदपत्र तपासली. काही क्षण पॉज घेतला आणि विचारल.... " ह्यांच लग्ना आधीच नाव वेगळ होत का?" झाल, आमची पंचाईत झाली. खरं बोलाव की वेळ मारून न्यावी अस झाल. पण आम्ही हरिशचंद्रांच्या घराण्यातले असल्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणून गेलो की लग्ना आधीच नाव वेगळ होत. मग तिचा पुढचा प्रश्न " ते नाव फॉर्म मधे टाकल नाही? काय बोलावे ते कळेना. तस सांगीतल की पासपोर्ट सासरच्या नावानेच हवाय. हे नाव टाकायच असत हे माहीत न्हवत. तस तिने परत सांगीतल... " पेपर आउट करा" या वाक्याचा बराच वेळ काही संदर्भच लागेना. तिला परत विचारल नेमक काय. तस तिने सांगीतल..." दोन न्युज पेपर मधे यांची अ‍ॅड द्या नाव बदल्याची. एवढ बोलून ती तिच्या पुढच्या कामाला लागली आणि आम्हाला पुढची अपॉईंटमेंट दिली.
आम्ही घरी आलो. अ‍ॅड एजन्सीला फोन केला तेव्हा कळाले की अशी अ‍ॅड देण्यासाठी एफिडेवीट लागत. मग आम्ही तेही करून घेतल. अ‍ॅड पाठवली. परंतू पेपरला सुट्टी आल्याने आमची अ‍ॅड एक दिवस उशीरा येणार होती. तरीही ती अपॉईंटमेंटच्या एक दिवस आधी येणार होती. अचानक अ‍ॅड येणार त्याच्या एक दिवस आधी त्या एजंसी मधुन फोन आला. तिच्या मते आमची अ‍ॅड दिल्या तारखेला येऊ शकत न्हवती. हे ऐकल्यावर मला तर काहीच सूचेना. म्हणजे पुन्हा नविन तारखेची अपॉईट्मेट घ्या, मी तिला खडसावल तरीही ती अ‍ॅड द्यायला तयार होईना. शेवटी ज्या पेपरमधे अ‍ॅड येणार होती तिथे फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगीतली. आम्ही नियमाप्रमाणे चार दिवस आधी अ‍ॅड दिली होती. तरीही ती हवी त्या तारखेला येणार न्हवती. मग तो माणूस अ‍ॅड द्यायला तयार झाला. हो नाई करता ज्या दिवशी अपॉईंटमेंट होती त्या दिवशी अ‍ॅड येईल असे सांगीतले. मनात धाकधूक होत होती. पेपरवाल्याला सकाळीच पेपर टाकायला सांगीतला. त्या दिवशी सकाळी पेपर येताच पहिले पान हे अ‍ॅडचे बघितले, आईचे नाव...... दिसले, सापडले, अ‍ॅड आली. लगेच तिला घेउन परत पासपोर्ट ऑफिस गाठले. शेवटची फेरी पार पडली. हुश्श् करून बाहेर पडलो.
आता पोलीस व्हेरीफिकेशन. रोज आईचा फोन चेक करायचा. काही मेसेज आलाय का ते पहायला. आमचे पासपोर्ट काढले तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण आइच्या वेळेस चक्क तो पोलीस घरी येतो म्हणाला. तस आईला घेऊन तिच्या घरी पोहोचलो. घरात झाडु मारला. खुर्च्या टाकल्या. ( वडील गेल्या पासून आई माझ्याकडे आणि बहीणिकडे थोडे थोडे दिवस राहते. त्यामुळे तिच घर बंदच असते. घरातील सामान नुकतेच पॅक करून एका खोलीत टाकून ठेवले.) पोलीस आले, त्यांच्या शोधक नजरेने त्यांनी लगेच ओळखले की या घरात कोणी राहात नाही. तस त्यांनी प्रश्न केला.
" तुम्ही ईथे रहात नाही का?", झालं..... आता काय बोलाव. तस त्यांना सांगीतल की मुलाच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे आईला माझ्याकडे नेले आहे. तरीही हे उत्तर त्यांना पटले नाही. दोनचार वाकडे प्रश्न केलेच. मग आईचे अजून काही डॉक्स त्यांनी मागीतले. शाळ सोडल्याचा दाखला. आता तो काही आईकडे न्हवता. मग जन्म दाखला. तो होता पण त्यावर तिच नावच न्हवत. त्यात फक्त जन्म तारीख आणि आई वडिलांचे नाव एवढच होत. तो ही त्यांना पटला नाही. हो नाई करता. त्याने सांगीतले कि तुम्ही तुमच्या मुलिंच्या घराचे पत्ते यात का टाकले नाहीत. तुम्ही तिथे राहता तर ते टाकायला हवे. अरे देवा.... आता हे काय..... या सगळ्यातून एक लक्षात आले की एजंट का हवा.
आता तो पोलीस सांगून गेला आहे की फॉर्म मधे दोघी मुलींचे पत्ते घाला.
आता हे सगळ जवळ जवळ महिनाभर चालु आहे. अजूनही काम अर्धवटच आहे. बघूया पुढे काय होतय.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी पासपोर्ट 2008 साली काढलाय.<<

ऋन्म्या अधुन-मधुन अशा प्रकारचे बेट (आमिष - गळाला लावतात ते) मुद्दाम टाकत असतो अशी मला दाट शंका आहे... Proud

ओके! पण ह्यात एजंट काही करु शकत नाहीत असाही अनुभव आहे.
<<
एजंट असला की विचित्र कागदांच्या मागण्या होत नाहीत असे असावे कदाचित.

मी २००५ साली पुण्यातून पासपोर्ट काढला आहे. आणि रुन्मेष म्हणतो तसे मी सुद्धा पासपोर्ट ऑफीसला गेले नव्हते. अगदी खरे सांगते. मला फक्त पोलिस स्टेशन मध्ये एकदा जावे लागले होते. नंतर पोस्टाने पासपोर्ट घरी आला.
एजंटचे नावही लक्षात आहे. ते सदाशिव पेठेत राहत होते. (आता माहित नाही) लक्षात रहायचे कारण ते 'श्वास' या मराठी चित्रपटातील अश्विन चितळेचे बाबा आहेत.

सोनाली आपल्या पोस्टबद्दल धन्यवाद. मला खरेखोटे केले म्हणून नाही तर यासाठी की सर्वांनीच जर नकारघण्टा वाजवली असती तर मी टेंशनमध्ये आलो असतो की माझा पासपोर्ट काही बेकायदेशीर पद्धतीने तर नाही ना काढला गेलाय Happy
बाकी आपल्याप्रमाणे मी सुद्धा एकदाच पोलिस स्टेशनला गेलेलो. त्यातही मी लहान असल्याने (आईवडिलांच्या नजरेत जरा जास्तच लहान असल्याने) आधी माझे वडील पोलिस स्टेशनला जाऊन आलेले. तिथे चौकशी करून, ओळख काढून आले. मग मलाच पर्सनली जावे लागणार हे कळल्यावर मला पाठवले. तिथे काय केले हे मात्र आता आठवत नाही. अन्यथा माझा पोलिसस्टेशनातील अनुभव असा स्वतंत्र लेख पाडला असता Happy

@ श्री, ओके.
कागदोपत्री तसा नियम असूही शकेल किंवा तुम्हाला तसे तुमच्या एजंटने सांगितले असावे.
अर्थात जर एजंट केला नसेल तर अर्थात कोणाला तरी म्हणजे तुम्हाला स्वताला जाणे भाग असणारच. पण ज्या अर्थी मुंबईतून माझे (आम्हा पंधरा जणांचे) आणि पुण्यातून सोनाली यांचे काम पासपोर्ट ऑफिसला न जाता झाले त्या अर्थी कंपलसरी आलेच पाहिजे असा नियम नसावा. एजंट किती मुरलेला आहे वा त्याची किती वट आहे यावरही अवलंबून असावे.

ऋ, असावे-नसावे या तरजर मध्ये खेळून उपयोग नाही. स्वतः न जाता एजंटमार्फत कसे काय पसपोर्ट होतात हे स्पष्ट झालेच पाहिजे.
पासपोर्ट ऑफिस ही पद्धत मान्य करते व तसे काही कायदेशीर आहे ह्याबद्दल स्पष्ट माहिती द्या.

ऋन्मेऽऽष आणि सोनाली सहमत आहे. माझा आणि बायकोचा पासपोर्ट आम्ही कार्यालयात न जाताच झाला आहे. २००६ किंवा ०७ मधे.
एजंट माझेच एक सेवानिवृत शिक्षक होते.
पासपोर्ट खोटा असू शकेल का .... तर त्या पासपोर्टावर शिक्केही मारून घेतले आहेत. बँकॉक ,कौलांलपूर आणि सिंगापूरातून.

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आणी अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नानुसार "पोलिसाला चहा पाणि दिले का?
हा प्रयत्न करून झाला, त्याच बरोबर काही प्रतिष्ठित व्यंक्तिंच्या ओळखिही सांगून झाल्या. आई जेष्ठ नागरीक आहे, केवळ परदेश फिरण्यासाठी एकदाच जायचे आहे. असे सर्व काही सांगून झाले, पण या वेळेस त्याने काही ऐकले नाही.
माझ्या पासपोर्ट्च्या वेळेला जरा वेगळा अनुभव होता पोलिसाचा. पोलिस व्हेरीफिकेशन साठी मला पोस्टे ला बोलावल होत. नेहमीप्रमाणे हे लोक चहापाणि मागतात हे माहित होत म्हणुन मी पर्स मधे फक्त दहा रुपयेची नोट ठेवून गेले होते आणि नवर्‍याला बाहेरच लांब थांबवल होत. माझ्या आधी जाऊन आलेल्यांना चहापाण्याबद्दलच काय विचारल, तर सर्वांकडून जवळ- जवळ ३००रु घेतले होते. माझा नंबर आला. पोलिसाने एक दोन प्रश्न केले आणि थांबला, मी विचारल झाल का काम पुर्ण जाउ का? तस मला म्हणाला," अहो तुमचा फोर्म अजुन पुढे जायचा आहे.." मी मुद्दाम कळून न कळाल्या सारख केल आणि विचारल काही राहिल आहे का? तस मला त्यान थांबवल. पुढचा नंबर घेतला, त्याची चौकशी झाल्यावर त्याने ही विचारल जाऊ का? तस त्यालाही तेच उत्तर दिल, " अहो तुमचा फोर्म अजुन पुढे जायचा आहे.." मग त्या व्यक्तीने किती एवढच विचारल. ह्याने हाताची तीन बोट दाखवली. नोटा घेतल्या आणि माझ्याकडे वळून परत म्हणाला " तुमचा फॉर्म पुढे पाठवायचा आहे ना.." मी सांगीतल की माझ्या कडे आता फक्त दहा रू आहेत. तर मला म्हणे घेऊन या. तस मी घरी जाऊन परत येण शक्य नाही सांगीतल. तर म्हणे ठिक आहे तुम्ही याल त्या नंतर फॉर्म पुढे जाईल. काही केल्या तो पैश्याला ऐकेना. मी विचारल कमी दिले तर चालतील का? जवळ नाते वाईक आहेत तिथून आणते. नवर्‍याला आवडणार नाही, पण दिडशे आणु शकेन. थोडा वेळ विचार केला आणि "म्हनाला की तुम्ही नंतरच या." कस बस करत दोनशे वर आणल. बाहेर येउन नवर्‍याकडून दोनशे रू घेतले आणि दिले.

पासपोर्ट ऑफिस ही पद्धत मान्य करते व तसे काही कायदेशीर आहे ह्याबद्दल स्पष्ट माहिती द्या.
>>>>

ही माहीती तो एजंटच देऊ शकेल नानाकळा.

मला एजंटने सांगितले होते कि पोलिसाची काही फी असेल ती द्या. फॉर्मचे काम झाल्यावर पोलिसाने विचारले कि एजंटने काही सांगितले का? त्यावर मी काही नाही असे उत्तर दिले. मग तो जा म्हटला.

सपोर्ट मध्ये चेंज ऑफ ऑड्रेस करायचे आहे..काय काय करावे लागेल? कुणी जाणकार सांगु शकेल का?>>>

नविन पासपोर्ट apply करावे लागेल आणि नवीन पासपोर्ट आजपसुन १० वर्ष मिळेल....

हल्ली पोलिस पोलिस स्टेशन मध्ये काही चहा पाणि घेत नाहीत. मुम्बईत तर नाहीच घेत. . बाहेर मात्र घेतात. Happy

२००७/८ साली डिस्ट्रिक्ट पोलिस हेडक्वार्टर मधून पासपोर्ट अर्ज भरता येत होते फोटो/डॉक्युमेन्ट्स सर्व तिथेच दाखवायचे.. त्यासाठी पासपोर्ट ऑफिसला जाण्याची आवश्यकता नसे . फक्त महिन्याभराने पोलिस व्हेरिफिकेशन ला जावे लागायचे, दीडदोन महिन्यानी पासपोर्ट स्पीडपोस्ट ने घरी यायचा ...

पासपोर्टवर हा आयडेंंटिटी सांगतो वास्तव्याविषयी काहीही नाही. पण भारतात तो अ‍ॅडरेस प्रुफ म्हणूनही चालतो आणि त्यावरचा पत्ता बदलूनही मिळतो हे नेहेमी प्रमाने भोंगळ आणि विनोदी आहे.

मीही दहा वर्षापूर्वीच काढला होता वरळीच्या हापिसात जाऊन, बिना एजंट, एका फेरीत काम झालं होतं, पोलिसांना काही पैसे द्यावे लागले नाहीत पण पोलिस फार उद्धटपणे वागत होते सगळ्यांंशी. आता रिन्यू करायचं पण तसंच आहे का, फाॅर्म डाऊनलोड करा वगैरे, वगैरे.

आता रिन्यू करायचं पण तसंच आहे का, फाॅर्म डाऊनलोड करा वगैरे, वगैरे. >> रिन्युला काही अडचण येणार नाही. ऑनलाईन आहे सर्व. एजंटची
अजिबात गरज नाही. लगेच होइल काम . फार तर आठ्वड्यात येईल पापो इंटर्व्ह्यु झाल्यावर. परत पोलिस वेरिफिकेशन नाही लागत जर पत्ता जुनाच असेल तर किंवा साधारण तोच एरिआ असेल तर. पुण्यात तरी हल्ली बरेच सुरळीत झाले आहे. खूपच उत्तम अनुभव होता.

आशू. अरे फेकनेवाला कभीबी फेकेगाइच. जान्देव.

मला पण पोलिस व्हेरीफिकेशला खूप त्रास झाला. पोलिस येउन घरी बघून गेला. मी व मुलगीच. मग मला म्हणे कसे तुम्ही सर्व एक्ट्याने करता. मग स्टेशनला गेल्लो. तिथे खूप वेळ बसवून ठेवले व शेव्टी अपेक्षा व्यक्त केल्या. नाहीतरे खुसपटे काढून दूर ठेवले. ह्यामुळे मुलगी माझ्यावर भयंकर वैतागली. एजंट बाईने पर्मनंट व करंट अ‍ॅड्रेस सेम लिहीला होता त्यामुळे अ‍ॅप्लि केशन नाकारले होते. मग एक दिवस बुधवारी गेलो तिथे नेमकी पासपोर्ट अदालत होती
त्यात हाताने लिहून दिले पर्मनंट अ‍ॅड्रेस व दोन दिवसात पासपोर्ट घरी आले.
काम झाले सुद्धा.

आजकी ताजा खबर. Happy

माझा पहिला पासपोर्ट जुन्या काळात प्रचंड चॅलेंजिंग स्थितीत १५ दिवसात मिळाला होता. त्याचे स्टोरी एक मोठा लेख होउ शकेल. दुसरा पासपोर्ट एजंट मार्फत काढला होता (वेळ नव्हता म्हणून) तोही पटकन मिळाला. मुलांच्या पासपोर्ट्ला व मंडळींच्या पासपोर्टला काहीच वेळ लागला नाही. एकदम सुपरफास्ट नेट अ‍ॅप्लिकेशन वगैरे. आठ दिवसात घरी.

पण आज आमची दांडी उडाली. पासपोर्ट संपत आला होता. सगळ्यांच्या चांगल्या अनुभवामुळे स्वतःच नेट अर्ज भरला. (नीट नाही, हे नंतर कळाले) डॉक्युमेंट व्यवस्थित होती. पण सध्याचा पासपोर्ट संपायला दोन महिने आहेत. अशा वेळी नविन पासपोर्ट पाहिजे असेल तर त्याला reissue या प्रकारात अर्ज करावा लागतो. आम्ही fresh प्रकारात भरला. हा गुन्हा आहे हे आज कळाले. त्यास २००० रु. दंडही आहे. शिवाय पासपोर्ट मिळाला नाहीच. आता RPO ला भेटायला सांगितले आहे.

तरी जनहो काळजी घ्या.

शिवाय आज सर्व्हर डाउन असल्याने एक तास उगाचच थांबायला लागले. मग अगदी टाटा वाले असले तरी त्यांना भूक लागणारच. त्यात अर्धा तास गेला. मग रांगा , लाईनितली भांडण वगैरे. अगदी एसीतला यश्टी स्टँड . शिवाय आमची केस नॉर्मल नसल्याने सरकारी कार्यालयाप्रमाणे नियमानुसार निर्णय वर ढकलला गेला. अशा रितीने पुनः जुन्या दिवसांची आठवण आली. मजा आली. एक अनुभव. Happy

हा गुन्हा आहे हे आज कळाले. त्यास २००० रु. दंडही आहे. शिवाय पासपोर्ट मिळाला नाहीच. आता RPO ला भेटायला सांगितले आहे.
अरे बापरे ! असे पण काही असते का.

मी पण २००८ साली पासपोर्ट काढलाय एजंट कडूनच . मला पण पासपोर्ट ऑफिस मध्ये जावं लागलं नव्हतं . फक्त पोलीस व्हॅरिफिकेशनचा अनुभव सांगते सगळे त्यांनी जे जे कागपत्र मागितले होते ते घेऊन गेलो तरी हे नाही आणलं . ते नाही आणलं करत दोन चार खेपा मारायला लावल्याच . सगळ्यात शेवटी सोसायटीचं सर्टिफिकेट आणायला सांगितलं कि या या मॅडम या सोसायटीत इतके इतके वर्ष राहत आहेत असं सोसायटीच्या लेटरहेड वर सेक्रेटरीच्या सही निशी लिहून आणा . त्याचवेळी सोसायटीचे सेक्रेटरी गावाला गेले होते आणि बरेच दिवस येणार नव्हते . ( मुलांच्या परीक्षा संपल्यावर एप्रिल- मे महिन्याची सुटी होती ) मी सोसायटीच्या ऑफिस मध्ये गेल्यावर हे समजलं . आता काय करायचं ?इतर कोणाची सही आणली तर चालेल का? असं विचारूया का ? पण मग नंतर विचार केला राहू दे. सेक्रेटरीला गावावरून येऊ दे . यातच बरेच दिवस गेले . वाजवीपेक्षा जास्तच . अशातच एक दिवशी पोलीस स्टेशन मधून च फोन आला . "अरे तुम्हाला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हवाय का नकोय ?" . पण तुम्हीच तर म्हणालात ना. असं अस सोसायटीच्या लेटरहेड वर सेक्रेटरीच्या सहीनिशी लिहून आणा म्हणून . आता सेक्रेटरी बरेच दिवस बाहेर गावी आहेत तर काय करू ? तर ते इन्स्पेक्टर म्हणतात " राहू दे त्यांना गावीच . तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट घेऊन जा बघू " Proud

सुजा, हाहा बरे झाले हा अनुभव सांगितलात. म्हणजे त्यांनाही उगाच पिडत राहायचे असते, जो काही हेतू असेल तो असेल, पण प्रत्यक्षात त्यांनाही स्वतःच्या अंगावर ती जबाबदारी जास्त काळ ठेवायची नसते.

@ लोकहो, ज्यांना विश्वास बसत नव्हता, बघा चार लोकं इथे आपला अनुभव सांगत आले ज्यांना पासपोर्ट ऑफिसला जावे लागले नव्हते. आता बोला. जग हे फार अफाट आहे आणि काळ हा अनंत. आपल्याला माहीत नाहीत अश्याही गोष्टी ईथे असतात आणि घडतात Happy

तरी कोणीही कोणत्या नियमात हे बसते व कायद्याने हे होऊ शकते ह्याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. केवळ एजंटने आणून दिला व तो पापो काही बेकायदेशीर नाही ह्यावर सुटका तर होणार नाही ना?

ज्या व्यक्तीचा पापो आहे त्याने स्वतः न जाता तिसर्‍यामार्फत पापो मॅनेज होणे हे कायदेशीर आहे की नाही इतकं मला विचारायचं आहे. जग गोल आहे, चपटं आहे, अफाट आहे की छोटं आहे ह्याने काही फरक पडत नाही. मला जे माहित नाही, त्या गोष्टी कशा घडतात याचे कुतूहल आहे व तेवढेच विचारत आहे. पण का कुणास ठावूक कोणी सांगतच नाहीये.

पण का कुणास ठावूक कोणी सांगतच नाहीये.
>>>>
हे एजंटच सांगू शकेल. कारण माझ्यावतीने एजंट पापोऑफिस मध्ये गेला होता.
मायबोलीच्या लाखो वाचकात एकही पापोएजंट नसावा... काय हे

मी आता जुलै मध्ये पासपोर्ट काढला. कागदपत्रे अगदी बरोबर होती . त्यामुळेच कि काय पण माझा पासपोर्ट अक्षरश १५ दिवसात आला . १ जुलैला online प्रोसिजर सुरु केली आणि १५ जुलैला पासपोर्ट रजिस्टर्ड पोस्टने घरी . सरकारी कामात एवढी एफिशिएनसी दिसल्यामुळे मला एकदम टडोपा झालं .
सुषमा स्वराजना धन्यवाद म्हणून ट्विट करायचंही मनात आलेलं .पण ते राहून गेलं Lol
काही मुद्दे
१) मुंबईतलं अंधेरीतील केंद्र टीसीएस चालवत . आऊटसोर्सिंगच्या कामामुळेच कि खाजगी सहभाग असल्यामुळे (!) पटापट काम होताना दिसली
२) पासपोर्ट ऑफिस अगदी अद्यावयत आहे .टिपिकल सरकारी लुक नाही .मोठे मोठे कियोस्क /बहुतांश कामाचे संगणकीकरण / भली मोठी जागा आहे .
३) सर्वप्रथम टोकन दिली गेलं.टोकन नंबर नुसार कागदपत्र तपासली गेली .त्यानंतर व्हेरिफिकेशन झालं .नंतर डोळे , हाताचे ठसे, जन्मखुण वगैरे घेतले गेले आणि फायनल स्टेजला परत काहीतरी विचारलं ते मला आठवत नाहीये .
४) सगळ्या प्रोसेसला दीड तास लागला .
५) पोलीस स्टेशनच व्हेरिफिकेशनही १ तासात झालं .त्यांच्याकडून मेसेज आल्यावर गेले होते . त्यांनी काही प्रश्न विचारून परत चेक केलं
६) पोलीस घरी आले होते पण तेव्हा मी ऑफिसात होते. .शेजाऱ्याकडून चौकशी केली . आणि निघून गेले .काका घरी होते . चहा पाणी(!) वगैरे काही विचारलं नाही ।१५ मिनिटात गेले असं काका म्हणाले .
७) १५ जुलैला पासपोर्ट हजर आणि मी युरेका मोडात

एजन्टथ्रू पासपोर्ट जो काढला जातो त्यात त्या संबंधित व्यक्तीचे डोळे , हाताचे ठसे वगैरे कसे तपासले गेले ?कुतूहल आहे. एजन्ट जर एवढ्या गोष्टी मॅनेज करत असतील तर नक्की काहीतरी चुकत आहे सिस्टीममध्ये .

एजन्टथ्रू पासपोर्ट जो काढला जातो त्यात त्या संबंधित व्यक्तीचे डोळे , हाताचे ठसे वगैरे कसे तपासले गेले ?
>>>>>
बहुतेक हे गेल्या काही वर्षात सुरू झाले असावे. त्या आधी डोळे हात ठसे वगैरे एवढे प्रगत तंत्रज्ञान भारतात अश्या कामांसाठी वापरत नसावेत.

जाई>> +१
माझ्या मुलीने अंधेरीचे , सिंगापुर आणि अमेरिकेच्या आम्ही जिथे राहात होतो त्या गावतले पासपोर्ट ऑफीस (अमेरिकेत पोस्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट अर्ज दाखल करावा लागतो) मध्ये अंधेरीचे पासपोर्ट ऑफीस लुक मध्ये नंबर वन आहे असा रिमार्क दिला . (मी गेलो न्हवतो)
जर कागद पत्र आणि फोर्म बरोबर असेल तर भारतात पासपोर्ट काढायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ अमेरिका, ईग्लंड, स्विस चा विसा काढायला लगतो

मला नाही वाटत ह्या वर्षात कुणी एजन्टथ्रू पासपोर्ट काढला असेल. आणि जरी काढला असेल तर काही एअरपोर्ट (मुम्बई) वर बोटाचे ठसे घेतले , बाकीच्या एअरपोर्ट वर कॅमेरॅने डोळे टिपले जातात त्यात पकडले जाउ शकतात.

२०१० नंतर टीसीएस ने पासपोर्ट सर्वीस सुरू केली नी सोने केले. त्याआधी एजंट लोक रु म्हणतात तसे हातात पासपोर्ट आणून देत. मला स्वतःलाच काढायचा होता त्यामुळे मी काढला होता २००२ ला. रिन्यू करताना ऑनलाइन पद्धतीने झाला.

http://www.hindustantimes.com/business/tcs-to-pay-penalty-for-passport-p...

Once fully implemented, it will take three days to issue passports after police verification and just one day under the tatkal (instant) scheme.

The government has sent a notice to Tata Consultancy Services (TCS), asking the company to pay Rs 2 lakh as penalty for every week of delay in the Passport Seva Project.

Pages