काॅलसेंटर (भयकथा) भाग अंतिम

Submitted by अजय चव्हाण on 23 October, 2017 - 03:30

काॅलसेंटर

भाग 2

मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी माझ्याच घरातल्या बेडवर होतो..डोक खुप जड झाल्यासारखं वाटतं होतं..
माझ्या बाजुलाच माझ्या ऑफिसमधला मित्र आणि रूममेट चिन्मय होता...
चिन्मयने ऑलरेडी चहा बनवला होता..
माझ्यापुढे चहाचा कप पुढे करत मी काय बोलणार आहे ते ऐकण्यासाठी तो मुकाटपणे बसला..
मी जे काही घडलं होतं ते ते सगळं त्याला सांगितले...
पण चिन्मयच्या चेहर्‍यावर अविश्वासाचे भाव स्पष्ट मला दिसत होते...

"आय कान्ट बिलिव्ह ऑन दिझ.."
चिन्मय चहाचा कप बाजुच्याच टिपाॅयवर ठेवत म्हणाला..

मी एकवार त्याच्याकडे बघितले..

"अरे यार ट्रस्ट मी.. मी खरं सांगतोय" - मी...

"चल मान्य करतो की, तु बोलतोय ते सगळं खरं आहे..
पण सकाळी जेव्हा मी शिफ्टला आलो तेव्हा दार ईझी उघडलं गेलं तेव्हा तु दरवाज्यातच बेशुद्ध पडला होता असं मला दिसल आणि ऑफिसमधलं सगळं काही व्यवस्थित होतं..ईनफॅक्ट तुझा लास्ट काॅल क्क्वालिटी पर्पोजसाठी पण बार्ज झालाय त्यात असं काहीच आढळले नाही..
मीच तुला अगोदर डाॅक्टरकडे घेऊन गेलो डाॅक्टर फक्त इतकंच म्हणाले की, तुला मायनर फीट आलीय थोड्या वेळाने येईल शुद्धीवर आणि डाॅक्टरांच्या परवानगीनंतरच तुला मी घरी आणले...
बहुतेक तुला भास झाला असावा" - चिन्मय..

हम्मम सगळं कसं काय व्यवस्थित होतं?? मग मी जे पीसीचे स्फोट होताना पाहीले होते ते सगळं काय होतं तो खरंच आभास होता की, हकीकत...मला काहीच कळत नव्हतं...
मी मनातल्या मनात विचार करत होतो...

"हे बघ जोसेफ... मी तुला अगोदरही सांगितलं होतं की, तु त्या हाॅरर फिल्म बघण, स्टोरीज वाचण बंद कर..
हे सगळं आपण काय बघतो, वाचतो ना त्याचा मनावर खोल कुठेतरी परिणाम होतो..मग त्याच गोष्टीचा मनात विचार आणि भीती निर्माण होते...त्यामुळेच असे आभास वैगेरे होऊ लागतात..आणि तुझ्याबाबतीत जे काय घडलं तो सगळा आभास होता तुझा..
मी ऑफिस सूरू झाल्यापासुन तिथे काम करतोय मी ही एकदा दोनदा तिथे नाईट केली होती ..
मला तर कधी तिथे असा अनुभव आला नाही..
टेक ईट ईझी डूड आणि गेट वेल सुन ..तु थोडा आराम कर मी निघतो आता" चिन्मय आपली बॅग सावरत खुर्चीतून उठत म्हणाला..

"एक मिनिट चिन्मय माझा लास्ट काॅल जो बार्ज झालाय त्याचा टाईमिंग काय आहे सांगशील का??" मी चिन्मयला थांबवत विचारलं..

"हेच काहीतरी 1 किंवा दिड वाजताच आहे" चिन्मय आठवत म्हणाला..

"अरे पण मी लास्ट काॅल दोनच्या नंतर घेतलाय आणि तो काॅल एका मुलीचा होता आय थिंक ती तेलगु बोलत होती मला कळले नाही म्हणून मी ते सगळं माझ्या नाॅटपॅडमध्ये लिहलं होत" बॅगतला नाॅटपॅड काढत मी म्हणालो..

चिन्मयने नाॅटपॅड उघडलं आणि ते तो वाचू लागला..

"Nenu ninnu vadhla
Naku nyayam kavali
Ettiparsisthiti lo naina thisukone unta..."

हयाचा अर्थ काय रे?? चिन्मयने नाॅटपॅड परत देत विचारलं

मलाही नाही माहीत यार..- मी..

आण बघू माझी एक तेलगू मैत्रीण आहे तिला विचारूया..
लगेच चिन्मयने तिला व्हाॅटसअपवर विचारलं ..

एक दोन मिनिटे तिचा काहीच रिप्लाय आला नाही आम्हा दोघांनाही त्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती..

आणि क्षणभरातच चिन्मयच्या मोबाईलची बीप वाजली...

आम्ही दोघही तो मॅसेज वाचू लागलो..

"मै तुम्हे नही छोडूगी..
मुझे इन्साफ चाहीये..
और वो मै लेकरही रहूॅगी.."

मॅसेज वाचल्यानंतर आम्हां दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला..

चिन्मय ट्रस्ट मी यार . तो माझा आभास नव्हता ती सारखे सारखे हेच बोलत होती...
तुला चांगल माहीतेय मला तेलगू येत नाही मग हे शब्द मी स्वतःहून कुठे लिहणार..

ठीक आहे ...तु आराम कर तसे पण आज शुक्रवार आहे..
उद्या आणि परवा सुट्टीच असेल..सोमवारपासून मी येतो नाईटला तुझ्याबरोबर...आज बाॅसला विचारतो...
मग बघू आपण काय होतंय ते..चिन्मय समजावणीच्या सुरात बोलत होता...

सारखा सारखा तो प्रसंग आठवला की, अंगावर काटा येई..
हे विश्व हेच एक खुप मोठ कोडं आहे त्यात कित्येक गुपिते लपलेली आहे..
आपण कोण ?? आपण तर ह्या भुतलावरचे साधारणं जीव, अणू रेणूने हे जग कित्येक गोष्टित गुंफलेले आहेत..काही ज्ञात आहेत तर काही अजूनही अज्ञात आहे...प्रकाश- अंधार, धवल- कृष्ण,
चांगलं- वाईट, देव- दानव, मानव- अमानव प्रत्येक गोष्टीच्या काही ना काही विरोध आहे....आज परत एकदा जीवनातल्या चिवट तत्वज्ञानाशी माझं मन तुलना करू लागलं होतं
प्रत्येक गोष्टीला अंत असतो तसा ह्याही गोष्टीला असेल..

..........................................................................................................................................................

नेहमीप्रमाणे आज शिफ्ट सुरू झाली..जाॅनच्या जागेवर चिन्मय माझ्याबरोबर शिफ्टला होता...आणि सुट्टीवर गेलेल्या सुशिलची अजुन सुट्टी संपली नव्हती..
म्हणजे आज आम्ही दोघंच होतो..
नेहमीप्रमाणे काॅल येणं सुरूच होतं..
काॅल घेता घेता कधी एक वाजला हे कळलंच नाही...
जशी जशी रात्र सरत होती...भीतीही हळूहळू वाढत होती..
एव्हाना काॅल येणं अगदी बंद झालं होतं आम्ही दोघंही अशाच एका वेगळ्या ( नाॅनवेज) विषयावर गप्पा मारत होतो..

अखेर तो क्षण आलाच ज्याची मला भिती वाटत होती...
पण ह्यावेळी तो काॅल चिन्मयला आला होता..
तोच खोलवरून उच्च श्वासोच्छवासात मिसळलेला लांबून कुठुनतरी येत असलेला आवाज चिन्मयला ऐकू येत होता..
चिन्मयच्या चेहर्‍यावर भितीचे,
अपराधीपणाचे, पश्चतापाचे मिश्र भाव मला स्पष्ट दिसत होते..
काॅल बंद झाला तसा चिन्मय लगेचच घाई करत आपल्याला इथून निघायला हवं..असं म्हणून भराभर आवरू लागला मी ही सगळं लगेच आवरून घेतलं..
आम्ही बॅगा घेऊन दरवाजाजवळ पोहचणार इतक्यातच खट्ट असा उजवीकडच्या भिंतीकडून आवाज आला..
आम्ही तिकडे पाहीलं तर.
रक्ताचे काही थेंब त्या काचेच्या भिंतीवरून घरंगळत खाली येत होते ..तिची माया सुरू झाली होती तर...
चिन्मय चपळाईने पुढे झाला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला...पण आता हा दरवाजा उघडणार नव्हता हे मलाही माहीत होतं आणि चिन्मयलाही तरीही आम्ही उघडण्याचा प्रयत्न करत होतो..माणूस काय नि प्राणी काय सगळ्यानाच आपला जीव प्यारा असतो तोच वाचवण्याची निरर्थक धडधड आम्ही करत होतो..
दोघंचेही चेहरे घामाने चिंब भिजले होते..पाठीच्या मणक्यातून भितीचा काटा सरसरून जात होत होता...तेवढ्यातच तीच बेसूर गडगडाटी हसणं ऐकू आलं...
काहीतरी पुटपटतं होती ती..पण ह्या वेळी नक्कीच ती दुसरं काहीतरी पुटपुटत होती..
शिकारीला सावज सापडल्याच्या असुरी आनंदाचे भाव, कुठेतरी मनात खदखदत असलेले सुडाचे भाव, क्रोधाची परिसीमा गाठल्याचे भाव..सगळेच भाव तिच्या छद्मी हसण्यातून तिच्या पुटपुटण्यातून जाणवत होते....
ते हसणं इतकं बेसूर आणि लाऊड होतं की कानठळ्या बसण्याचच बाकी उरलं होतं..
जोराचा वारा दोघांभोवती गरगरं फिरत होता..
त्या वारयात एक प्रकारचा अनैसर्गिकपणा जाणवत होता..
त्याचबरोबरं तो वाहणारा दुर्गधं संपुर्ण वातावरणात पसरू पाहत होता...
मी आणि चिन्मय आम्ही दोघांनीही एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं होतं..
लाईट चालू बंद होऊ लागल्या तशा दोघांचेही धडधड इतकी वाढली होती की, ती आम्ही ऐकू शकत होतो..
इतक्यातच ती आकृती आमच्यासमोर प्रकट झाली...तेच भयानक रूप.. पण ह्यावेळी तिच्यालेखी मी तिथे नव्हतोच..तिचं सारं लक्ष चिन्मयवर खिळलं होतं....
ती हळूहळू पुढे सरकत होती..तिचं बिकट हास्य अजुनच ह्रदयात धडकी भरत होतं... ती अगदी आमच्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावरती होती....मी भितीने डोळे गच्च मिटून घेतले...गच्च मिटलेल्या डोळ्यात माझ्या बुब्बुळांची अस्वस्थ हालचाल मला जाणवत होती...एक एक क्षण युगासारखा वाटत होता..
आता काय होईल ?? ह्याची कल्पनाच मला असह्य होत होती..
एक..दोन...तीन..चार...............दहा......पंधरा सेकंदात मला काहीच जाणवलं नाही फक्त थोडसं सैल झाल्यासारखं वाटत होतं..
आणि अचानक चिन्मयची भयानक किंकाळी ह्रदय चिरत गेली मी खाडकान डोळे उघडले...समोर बघतो तर.. चिन्मय मधल्या पिल्लरवर हवेत लटकत होता...त्याच्या पोटातल्या आतड्या बाहेर लटकत होत्या ..पुर्ण शर्ट रक्ताने माखला होता..
त्याचा तो तडफणारा करूण आवाज आणि त्याची ती अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले...एखादा बर्फ गोठावा तसा मी जागीच गोठल्यासारखा उभा होतो..
आणि ती आकृती मला कुठेच दिसेनाशी झाली...
एकच तो क्षण आणि परत तोच गडगडाटीच्या हसण्याने माझं लक्ष वेधलं गेलं..ती आकृती एखाद्या कट्ट्यावर बसावं तसे खाली पाय सोडून चिन्मय जिथे लटकला होता त्याच्या वरती बसली होती ..तिच्या तोंडातून रक्त पाझरत होतं...
ती अजुनही काहीतरी पुटपुटत होती..
एकाकी त्या आकृतीने उग्र रूप धारण केलं..
आणि जोरजोरात आपल्या उलट्या पायाने चिन्मयच्या छाताड्यावर लाथा मारत होती....
धाप..धाप .धाप...असा आवाज सगळीकडे घुमत राहीला त्याचबरोबर चिन्मयचा कण्हण्याचा आवाज हळूहळू होतं कायमचा बंद झाला...
आणि धापकान त्याचा तो निष्प्राण देह जमिनीवर आदळला..
एकाकी ती आकृती विशिप्तपणे हसू लागली...
हसता हसता ती रडू लागली...कदाचित तिच इस्पित साध्य झालं होतं..आणि अगदी त्याच क्षणी मी बेशुद्ध झालो...

.........................................................................................................................................................

जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा डोक पुन्हा एकदा जड झाल्यासारखं वाटत होतं..सारं काही धुसर धुसर दिसत होतं..
हळू हळू डोळे उघडले आणि पहिल्याच क्षणी चिन्मयऽऽऽऽऽ....
अशी हलकीशी किंकाळी माझ्या तोंडातून बाहेर पडली..
आणि पुन्हा एकदा मी बेशुद्ध झालो...
माझं शरीर जरी बेशुद्ध झालं असलं
तरी कुठेतरी मनाच्या तळाशी एक जागृत अवस्था होती....माझ्यातला अंतरात्मा जागा होता...बंद डोळ्याच्या पापण्यात मला एक अलौकीक चेतना जाणवत होती..
तीच चेतना जणू काही माझ्या अंतरात्माल्या काहीतरी दाखवू पाहत होती..एखादा सिनेमा दिसावा तसं सारं काही मला दिसत होतं..

" सर सर.. कुणीतरी एखाद्या मुलीला दुर घनदाट जंगलात फरफरटत नेतय..तिच्या संपुर्ण विवस्त्र झालेल्या शरीरावर कसलातरी लाल रंग फासला होता...ती ओरडत होती, किंचाळत होती.. पण तो जो कुणी आहे त्याला काहीच वाटत नसाव बहुतेक..उलट तो तिच्या प्रत्येक किंचाळीबरोबर विक्षिप्तपणे हसत होता...एकाकी तो कुठेतरी थांबला..त्याने चहूबाजाला नजर फिरवली..कदाचित त्याला जे अपेक्षित होतं ते तिथे होतं..
त्याने हळूच शिटी मारून इशारा दिला...
झपझप उडणार्या पालापाचोळ्यातून त्याच्या चालण्याचा आवाज येत होता..हळूहळू तो जवळ आला तसा त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसला..चिन्मय होता तो..
"ऐ बाबा तुझं काम केलं मी..हिला तुला मिळवून दिलं चल आता माझे पैसे काढ.."
चिन्मय त्या बाबाला बोलत होता

" बाबा ने एक विचित्र कटाक्ष त्यावर टाकला..अलबत.. अलबत.. असं काहीतरी म्हणून बाबा काहीतरी पुटपुटला...आणि त्याचबरोबर चिन्मय सगळं काही विसरला.." आणि तो गोंधळल्यासारखा इथे तिथे पाहत..परत निघून गेला..

तो निघून गेल्यानंतर बाबाने खास मंत्र उच्चारायला सुरूवात केली...मंत्र उच्चारताना कसलीतरी भुट्टी तो तिच्या कपाळावर लावत होता..

इतक्यात त्याने तिला उचलून जवळच असलेल्या लाल पिवळ्या पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवल...बुडबुड..बुडबुड..
आणि ह्या वेळी तिचा चेहरा मला स्पष्ट दिसला....

मग क्षणभरच नजरेसमोर माझ्या काळोख पसरला..
सिनेमा सुरू झाल्यानंतर थिएटरमध्ये कसा किंचित प्रकाश पडतो..तसाच प्रकाश आता मला दिसू लागला...
त्या प्रकाशात एक निरागस मुलगी होती..
तिने पांढरे कपडे घातले होते .
हा तोच चेहरा होता जो काही वेळापूर्वी मी पाहीला होता..
पण तो चेहरा आता भयानक नव्हता..
त्या चेहर्‍यावर शांतीचे, निरागसतेचे भाव होते..
तिच्या डोळ्याच्या कडयात अश्रू जमा झाले होते...

त्या अलैकीक शक्तीला जे काही दाखवायच होतं...
ते ते सारं मी बघितलं होतं..

हळूहळू मला शुद्ध आली..सहज लक्ष हातातल्या धाग्याकडे गेलं..आणि सारं काही मला आठवत गेलं..

ती:
ऑफिसच्याच बाहेर असलेल्या चायवाल्याची मुलगी..
नुकतीच तिच्या गावावरून ( आंध्र प्रदेश) वरून आलेली..
हुशार, चुणचुणीत..मी नेहमी तिकडे चहा प्यायला जात असे..
काय मस्त चहा करायची ती..चहा प्यावा तर तिच्याच हातचा..
आमच्यात फारसं बोलण कधीच झालं नाही..ना तिला माझी भाषा कळत होती ना तिची मला..तरीही आमच्यात भाऊ बहिणीच नातं होतं..रक्षाबंधनला पहिल्यांदाच तिने मला राखी बांधलेली..माझ्या डोळ्याच्या कड्यात तिच्या आठवणीने अश्रू जमा झाले होते...हाच धाग्यामुळे कदाचित ती गेल्यानंतरही तिच्यातलं नि माझं बंध कायम होतं...

पुढे कुठेतरी त्या काळा जादु करणार्याबद्दल कळलं.. खुप
भयानक रितीने त्याचा मृत्यू झाला होता .त्याचीच विद्या त्याच्यावर उलटली होती..
आता बहुतेक तिला मुक्ती मिळाली असेल ...
मिस यु लिटल सिस्टर .असं म्हणून नकळत माझ्या डोळ्यातून अश्रु बाहेर पडले ....

समाप्त. .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users