वैदिक कालगणना

Submitted by अविनाश जोशी on 21 October, 2017 - 02:12

वैदिक कालगणना

वैदिक कालगणनाचे अनेक धारा आहेत. वेदातील विविध शास्त्रे सूक्ष्म कालगणना आपल्या पद्धतीने करतात, पण सर्वांचे एकवाक्य होते ते १ सौर वर्ष = ३६५ सौर लग्नांना दिवस. हि कालगणना काही मायक्रोसेकंद ते १ वर २२ शून्य एवढी पसरली आहे,
सौर कालगणना
त्रुति t ≈ 0.031 µs
रेणु 60 त्रुति ≈ 1.86 µs
लव 60 रेणू ≈ 0.11 ms
लीक्षक 60 लाव ≈ 6.696 ms
लिप्ता 60 लेक्षक≈ 0.401 से
विघटि 60 लिप्ता ≈ 24.१०५६से
नाडी / घटी 60 विघटी ≈ 24 मिन
मुहूर्त 2 घंटी ≈ 48 min
नक्षत्र अहोरात्रम् 60 घंटी ≈ 24 h
30 मुहूर्त ≈ 24 h = १ दिवस
१ सौरवर्ष = ३६५ दिवस
सौर दिवस हा सूर्योदया पासून दुसऱ्या सूर्योदया पर्यंत असतो.

चंद्रीय कालगणना
दोन्ही पद्धतीचा मेळ असलेली हि एकुलती एक गणना आहे
तिथी किंवा चंद्र दिवस हा सूर्य आणि चंद्र ह्यांच्या स्थितीवर बदलतो दोघाम्च्या रेखांशाच्या कोनात १२ डिग ने वाढ झाली कि तिथी बदलते . अमावस्येला कोन ० असतो तर पूर्णिमेला १८० असतो . चंद्र दिवस कधीहि सुरु होऊ शकतो [ सौर रात्री सुद्धा ] आणि तो अंदाजे १९ ते २६ तासाचा असू शकतो.
१५ चंद्र दिवसाचा एक पक्ष होतो आणि २ पक्षाचा [ शुद्ध आणि कृष्ण ] एक चंद्रमास होतो. तो अंदाजे २९.५ सौर दिवसाएवढा असतो. ३६५ दिवस आणि ३५४ दिवस मधील फरक अधिक मांसाने भरून निघतो.
ऋतू = २ चंद्रमास
अयन = ३ ऋतू
चांद्रवर्ष = २ अयन .

पितर वर्ष
पितरांचे १ वर्ष ३० सौर वर्ष एवढे असते. त्याचे आयुर्मान १०० वर्ष = ३००० सौर वर्ष मानले
गेले आहे

दैवी वर्ष आणि युग
१ सौर वर्ष = देवाचा १ दिवस देवांना १२००० दैवी वर्ष आयुर्मान आहे
४००० + ४०० + 400 = ४८०० दैवी वर्ष = १७२८००० सौर वर्ष = 1 सत्य युग
३००० + ३०० + ३०० = 3600 दैवी वर्ष = १२९६००० सौर वर्ष = 1 त्रेता युग
२००० + २०० + २०० = २४०० दैवी वर्ष = ८६४००० सौर वर्ष= 1 द्वापार युग
१००० + १०० + १०० = १२०० दैवी वर्ष = ४३२००० सौर वर्ष = 1 कली युग
१२००० दैवी वर्ष = ४ युग = ४३२०००० सौर वर्ष = 1 महा युग = दैवी आयुर्मान

ब्रम्हाचे आयुर्मान
१००० महा युग = १ कल्प
२ कल्प = ब्रह्मा १ दिवस = ८,६४,००.००.००० सौर वर्ष
ब्रह्मा १ वर्ष = ३१.१०.४०,००,००,००० सौर वर्ष
ब्रह्मा ५० वर्ष = १ परार्ध
२ परार्ध = १०० ब्रह्मा वर्ष = १ महा कल्प = ब्रह्मच आयुर्मान = ३१.३५,२८,३२,०० ,००,००० सौर वर्ष
मन्वंतर = 71 महा युग ३०,६७२० ,००० सौर वर्ष = सूर्याचे एक परिभ्रमण

सद्य काळ
सध्या, ब्रह्माचे 50 वर्षे संपली आहेत. आपण सध्या 51 व्या वर्षाच्या पहिल्या दिवसात आहोत. [ या ब्रह्माचा दिवस, कल्प, याचे नाव श्वेता-वरहा कल्प असे आहे. या दिवसात सहा मन्वंतर झाली आहेत आणि हे सातवा मन्वंतर आहे, याचे नाव - वैवस्वथ मन्वंतर आहे. या मन्वंतर मधील 27 महायुग आणि 28 व्या महायुगाच्या कलियुगा हे कलियुग वर्ष ख्रिस्तपूर्व 3102 साली सुरू झाले .गणिताने आजचा काळ येतो ;
१५५५२०००००००००० + १८५२४१६००० + ११६६४०००० + ३८८८००० + ५११९ .
=काही खुलासे
१.वरील सर्व आकडेवारी कडे गणित म्हणून पाहू नये
२. एक ब्रम्हानंतर दुसरा ब्रह्मा येऊन चक्र परत सुरु होते. मी तरी याला अनंत काळ म्हणतो.
माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात एका विद्वान पण संकुचित आक्षेप घेतला होता.
https://www.maayboli.com/node/64186?page=1
त्याच्या मते <<<भाऊ ह्याचा नक्की अर्थ काय आहे? इथे वेळ हीच अनंत नाहीये असा एक विचार प्रवाह आहे आणि हे लोक ती वेळ मोजायची पद्धत अनंत काळापासून चालू आहे असे बिनधास्त लिहितात. >>>
मला वाटते त्यांना आता अर्थ सर मजला असावा.
काळ साक्षेप असतो. तो वस्तू वेग व गुरुत्वाकर्षणावर अवलंबुन असतो. कृष्णविवर व प्रकाश वेगाने जाणारी वस्तू यावर शून्य असतो

त्यांच्या बाकी प्रतिसादाबद्दल परत कधीतरी .... १५,५५,२१ ,९७,२९,४९ ,११९ सौर वर्ष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ सेकंद मोजायचे काहीही साधन नसताना,
0.031 मायक्रो सेकंड वगैरे राशी कशा quantify केल्या>>>> मला वाटते ते संकल्पना याच पातळीवर असाव.

0.031 मिक्रोसेकंड हे संकल्पना पातळीवर असू शकत नाही,
It is very specific.

ऐतिहासिक काळातील सगळे व्यवहार घटिका पळे या मिनिमम युनिट वर होत असताना, आणि पौराणिक काळात सुक्ष्म "काल" राशी मापनाचा काही संदर्भ नसताना(मोठ्या कालमापनाचे जसे युग, कल्पांत संदर्भ बरेच वाचलेत)
त्रुती, रेणू अशा संकल्पना वापरून काय मोजले जात होते?

अनेक उपयोग सांगितले आहेत
रक म्हणजे शास्त्रीय संगीत
तंतुवाद्यांत ट्युनिंग समजा खालील प्रमाणे आहे
तारा स्वर Sa K.Re Re Ga K.Ga Ma T.Ma Pa K.Dha Dha K.Ni Ni
सप्तक फ्रे .Hz. 740 784 831 880 932 988 1047 1109 1175 1245 1319 1397
i have done lot of experiments in anechoic chamber on Human Auditory Memory and concluded that for tuning tambura most expert’s c could differentiate beyween 1397 hz within 0.5 hz accuracy. That is difference of 0.256 microsec

हा ऐकणाऱ्यांच्या कानाचा फ्रेक्वेन्सी रिस्पॉन्स झाला,
शास्त्रिय संगीत गाताना किंवा वाद्य ट्युन करताना टाइम चा वापर होतो , की आपल्या संवेदनांचा होतो?

त्याचे पृथक्करण करताना फ्रेक्वेन्सी, wavelength, time या सगळ्याचा वापर होईल

फ्रेक्वेन्सी, wavelength, time >>>
time js same
and wavelength = 1/f
think why and how such frequencies were chosen?
सप्तक फ्रे .Hz. 740 784 831 880 932 988 1047 1109 1175 1245 1319 1397

कानाला फ्रिक्वेन्सी वेगळी ओळखता येते म्हणजे घड्याळाला वेळ मोजता येतच असणार हा भौतिक शास्त्रांच्या नोबेल दर्जाचा शोध आहे. यावर तुम्ही कुठे पेपर पब्लिश केला असेल तर लिंक द्या. वाचायला आवडेल.
बाकी आपल्या वेदात स्फटिकाचा उल्लेख असला तर क्रिस्टल ओसीलेटर आपलाच शोध आहे, पूर्वजांना ऐकू येत होते म्हणजे ध्वनीचा वेग माहीत असणार, दिसत होते म्हणजे प्रकाशाचा वेग ही माहीत होता. त्यामुळे मायक्रो नॅनो सगळ्या वेळा बरमदेवाच्या रिष्ट वाचाचा काटा (हो पायात काटा ही जायचा सो तो ही माहीत होताच) दाखवत असणारच.

dear amitji
i do not believe everything blindly but have enough experience and knowledge to verify claims. Please refer theory of sound, anatomy of hearing system and u will realise how u hear and how brain processes . negative comments, jokes, diversions are accepted but being sarcaStic shows both immaturity and lack of proper .knowledge

भारी धागे सुरू केलेत आपण एकेक.
मायबोलीवर आजवर अश्या विषयांवर फार चर्चा वाचनात आल्या नव्हत्या.
माझ्यासारख्यांना वेगळी माहिती मिळते आपल्या धाग्यातून आणि त्याखालील प्रतिसादातून.
धन्यवाद Happy

Perception is not measurements.>>>
ln physics many measurements are perceptions. take optics , in concave / convex mirror parameters u perceive image location.

Joshi saheb ,
ती प्रतिमा तिकडे आहे ,हे प्रयोग करून सिद्ध करता येते,
निदान मला तरी नववी दहावीत मध्ये हे प्रयोग केलेले आठवतात.

माझा मूळ प्रश्न मी थोडा रिफ्रेज करतो.
या लिप्ता, लेक्षक, विघटि वगैरे कोणत्या उपकरणाने मोजले जात?
या एकका मध्ये मोजावी अशी कोणती राशी तेव्हा रूढ होती, ज्या साठी त्यांना सेकंदाचे इतके छोटे भाग करणे आवश्यक वाटले

संगीताचे तुम्ही दिलेले उदाहरण तितकेसे पटले नाही,
संगीत रचताना कोणी अमुक फ्रिक्वेन्सी चे सप्तक बनवूया म्हणून सुरवात केली नसेल, त्यांना जे गोड वाटले ते ते गायले, कित्येक शतकानंतर ते गायलेले का गोड वाटतेय याचे अनलिसिस झाले तेव्हा फ्रिक्वेन्सी पॅटर्न समोर आला असे मला वाटते.

(कृपया , मी टिंगल करत नाहीये. प्रश्न जेनुईन आहे, मी तुम्ही दिलेली माहिती खोटी आहे असे म्हणत नाहीये, पण तेव्हा तिचे application काय असावे, असा विचार करतोय)

@Simba
yes i know your responses. i have enjoyed them.
All of you have to excuse use of English
Though I can write fluently in Marathi , typing in Myboli software is not my forte.
i will try to answer as my abiliTy as they are pertinent points
few years back dr used his fingers on your wrist ti measure pulse rate. he wasC measuring frequency . modern pulse meters measure time between to bits and interpolate it in frequecy
i am going to answer in bits and bytes.
Ciao!!!

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ....

ह्यातील २८ युगे कशी आली असावीत? वरील लेखात लिहिल्याप्रमाणे चालू वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या महायुगातील कलियुग आत्ता चालू आहे. ह्या २८ शी काही संबंध आहे का?

तसेच एक कल्प म्हणजे आपल्याला माहित असलेली सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही युगं मिळूनचा कालावधी ना? वर तुम्ही १००० महायुगं म्हणजे एक कल्प लिहिलं आहे. ह्या दोन्हीची सांगड कशी असावी?

अश्विनीजी,
महाभारतात पण असे काहीतरी युगांचे घोळ आहेत,
जे काही आठवतंय त्याचा आशय असा होता की खरे तर 12 वर्षांचे एक युग म्हणून धरले आहे. मला आत्ता आठवत नाहीये फारसे,
कोणाला काही या धर्तीवर वाचलेले आठवतेय का?

सौर लग्नांना दिवस यामध्ये लग्न या शब्दाचा अर्थ काय?

वेदांच्या कोणकोणत्या शास्त्रांमध्ये सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते असे सांगितले आहे? एकवाक्यता म्हणजे कमीत कमी दोन वेगवेगळे संदर्भ नक्कीच असावेत.

लव की लाव? लीक्षक की लेक्षक? घटी की घंटी? तुम्ही देत असलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे. त्या माहितीचा उपयोग करण्यासाठी मला स्वतःला योग्य संज्ञा माहीत असणे गरजेचे वाटते.

>>दोन्ही पद्धतीचा मेळ असलेली हि एकुलती एक गणना आहे
चंद्रावर आधारित इतर कालगणना (इजिप्शियन, इस्लामिक इ.) सूर्य आणि चंद्र ह्यांच्या स्थितीवर बदलणाऱ्या कलांचा वापर करतात की नाही? मग आपली कालगणना एकुलती कशी ठरते?

सत्य, त्रेता, द्वापार व केली युग हि चार युगे मिळून १ नाहायुग व १००० महा युगाचा एक कल्प. २
कल्पांतर ब्रम्हाचे आयुष्य संपून नवीन ब्रह्मा येऊन नवीन चक्र सुरु होते. आजपर्यत ६ ब्रह्म झाले असून त्या.ची नवे खालील
विरींची
पद्मभू
स्वयंभू
परमेष्ठी .
सुराज्येष्ठ
हेमगर्भ
सद्य ७व्या चे ५१ वे वर्ष सुरु आहे. ७ व्याच नाव
शतानंद .
युगे २८ सम्बद्ध माहित नाही

वैदिक कालगणना प्रथम कुठल्या वैदिक ग्रंथात स्पष्टपणे व्याख्येसकट आढळते?
त्याच्या विविध धारा कुठकुठल्या आहेत?
वेदात विविध म्हणजे नक्की कोणती शास्त्रे आहेत?
तुम्ही वरील माहितीसाठी नेमके कुठले संदर्भग्रंथ वापरले आहेत?

अविनाशजी उत्तम माहिती. परंतु दैवी वर्ष, युग आणि ब्रह्माचे आयुर्मान याच्या आकडेवारीबद्दल एक मोठा गैरसमज आहे जो दूर करू इच्छितो. प्रस्तुत माहिती हि ब्रह्मज्ञानी संत श्री युक्तेश्वर गिरी (जे Autobiography of a Yogi या पुस्तकाचे लेखक परमहंस योगानंद यांचे गुरु आहेत) यांच्या 'The Holy Science' या पुस्तकातून घेतली आहे. योगानंदांनी Autobiography of a Yogi मध्ये देखील याचा उल्लेख केला आहे.
The Holy Science' या पुस्तकात युगाच्या आकडेवारीवर एक संपूर्ण प्रकरण आहे. पुस्तकात जरी याचे खुलासेवार स्पष्टीकरण दिले असले तरी मी थोडक्यात सांगतो.
युक्तेश्वरांनी आकडेवारी मांडताना मनुसंहिता चा उल्लेख केला आहे ज्यामध्ये याबद्दल एक श्लोक आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास युगांची आकडेवारी करताना दैवी वर्षाचे मानवी वर्षात रूपांतर केले जाते (१ दैवी वर्ष =360 मानवी वर्ष) जे अयोग्य आहे. मनुसंहिता, ज्याचा संदर्भ घेऊन हि आकडेवारी केली जाते, त्यात १ दैवी वर्ष म्हणजे ३६० मानवी वर्ष असा उल्लेख नाही. म्हणजेच कलियुग हे १२०० दैवी वर्षांचे किंवा ४३२००० मानवी वर्षांचे नसून ते केवळ १२०० वर्षांचेच आहे. आणि १ चतुर्युग (सत्य, द्वापर, त्रेता आणि कली) हे 1२००० मानवी वर्षांचे आहे.. दैवी वर्षांचे नाही.
अजून एक मनोरंजक माहिती म्हणजे साधारण २००+ वर्षांपूर्वीच कलियुग संपून सध्या द्वापरयुग सुरु झाले आहे (आरोह चक्र). या युगाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी बुद्धीचा विकास हा atom and electricity यांचे वैशिष्ट्य जाणून घेण्याइतपत होतो. साधारण १९ व्या शतकात लागलेले शोध याला पुष्टी देतात. जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे. आपले मूळ, आपण कोठून व कसे आलो याची खूप छान माहिती पुस्तकात दिली आहे.
खाली पुस्तकातील श्लोकाचा काही भाग देत आहे (संपूर्ण पुस्तक जालावर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. खालील चित्र जालावरील पुस्तकातून साभार)
Age.png

अजून एक मनोरंजक माहिती म्हणजे साधारण २००+ वर्षांपूर्वीच कलियुग संपून सध्या द्वापरयुग सुरु झाले आहे
>>
कलीयुग संपून द्वापारयुग? सत्ययुग सुरु व्हायला पाहिजे ना?

कलीयुगात कल्की अवतार होणार आहे ना? कलीयुग संपले म्हणजे हा अवतार झाला पण?
आता द्वापारयुग चालू आहे म्हणजे कृष्ण अवतार होणार की काय?

राहुलजी, युगांचे चक्र आरोह आणि अवरोह असे २ प्रकारचे असते. आरोह म्हणजे चढत्या क्रमाने आणि अवरोह म्हणजे उतरत्या क्रमाने.. उतरत्या क्रमाने घेतल्यास सत्य-त्रेता-द्वापर-कली युग येते. आणि काली युग संपताच पुन्हा आरोह चक्र चढत्या क्रमाने सुरु होते म्हणजेच कली - द्वापर- त्रेता - सत्य. सत्ययुगाकडून कलियुगाकडे येताना जसा धर्माचा हळूहळू ऱ्हास होत जातो तसेच कलियुगाकडून सत्ययुगाकडे जाताना उन्नती देखील हळूहळू होते. त्यामुळे कलीयुगानंतर एक्दम सत्ययुग येणे संभवत नाही. खाली दिलेले चित्र याचा थोडा खुलासा करेल. आपण सध्या ज्या काळात आहोत ते बाणाने दाखवले आहे.
yug.png

<--कलीयुगात कल्की अवतार होणार आहे ना? कलीयुग संपले म्हणजे हा अवतार झाला पण?---> कलियुगात जरी कल्की अवतार होणार असला तरी चक्रामधील कोणत्या कलियुगात होणार हे कुठे ठळकपणे सांगितले नाही..त्यामुळे आता पुढच्याच कलियुगाची वाट पाहावी लागेल Happy

<--आता द्वापारयुग चालू आहे म्हणजे कृष्ण अवतार होणार की काय?--> हेपण सांगता येणे अवघड आहे. जर काळाची गरज असेल तरी होईलही एखाद्या वेळेस किंवा नाही लागल्यास होणारही नाही...

thanks for info
will revert after reading book. have read Autobio of Yogi but not other one
1. what abt brahma life
2. independent sources have accepted epic war/krishna death abt 5000 years ago. as per book kyug is 12000 yrs i.e 7000 remaining,?? ycle?why next cycle??

अविनाशजी, पुस्तकाप्रमाणे १२००० वर्षांचे आरोह चक्र आणि तेवढ्याच वर्षांचे अवरोह चक्र आहे. थोडक्यात १ संपूर्ण चक्र २४००० वर्षांचे ज्यात २ चतुर्युग (महायुग) येतात. ब्रह्मदेवाची आर्युमर्यादा म्हणजेच ब्रह्माचा संपूर्ण १ दिवस = ८,६४,००.००.०००/३६० = २४,००,००,०० सौर वर्ष.पुढचे गणित तुम्ही वर दिले तसेच.
कलियुगाची मर्यादा हि १२०० वर्षांची आहे...१२००० नव्हे... १२००० मध्ये १ चतुर्युग येते. अगदी अचूकपणे मांडायचे झाल्यास १७९४ साली कलियुग समाप्त झाले आहे आणि सध्याचा द्वापर काळ हा AD १७०० ला सुरु झालेला आहे. त्यामुळे आपण सध्या ३१७ द्वापर मध्ये आहोत. आता हे इ सन १७०० कसे आले त्याचे स्पष्टीकरण खूप मोठे आहे ज्यासाठी पुस्तक वाचणे योग्य ठरेल.

चंद्रावर आधारित इतर कालगणना (इजिप्शियन, इस्लामिक इ.) सू>>>>
islamic calender actual darshan of new moon syncs calendar.Akbar tried to rectify it but in vain. Egypt has been Solar calendar.

<<चित्रामध्ये राशींचा उल्लेख का केलाय म्हणे?>>ती सूर्याची अवकाशस्थ गती किंवा परिभ्रमण दर्शवण्यासाठी आहे.

Pages