साचा

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 October, 2017 - 13:01

ऐकतोयस ??

लेटेस्ट डिझाईनचे
कमी वजनाचे चकाकणारे दागिने
आकर्षीत करणार ...!
हे स्वाभाविक असल तरी
जुने बावन्नकशी
वजनदार दागिने
मोडीस काढण्याचा घाट घालू नकोस
भट्टीत वितळवलेस तरी सोनच देतील
मात्र ...
पुन्हा तसेच दागिने घडवण्यासाठी
तसाच साचा उपलब्ध नसेल
.
.
.
एवढच !

बाकी काही नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users