माझ्या मनातले काही

Submitted by bnlele on 16 October, 2017 - 23:36

अंश मनी

पल्याड ओढा आटलाए,
काठावर वृक्ष करपलाए,
नाही पालवी शेंड्याला,
कुणी न येती पाण्याला ,
कुणी न येती छायेला !
पुन्हा भरावी किलबिल शाळा,

आणि गुरे यावी छायेला,
तुरे कोवळे अन टोकाला
गीत स्फुरावे ओठांना--
स्वप्न पडावे दृष्टीला ---
हसू आले वृक्षाला –- अन
पान गळले साक्षीला !!
भाऊ लेले

---------------------------------
आठवणींचे मोती

[17/10, 08:55] ‪+91 866 966 6150‬: ओघळले आज आठवणींचे मोती,
बालपणी दिवाळी कशी होती
कलचर्ड नाही खरेखुरे मोती
वसु बारसला दुधाला लागत नव्हते पैसे,
धनत्रयोदशीला चांदीसोन नाही, एखाद गाळण येत असे
पाडव्याला आईला घराखर्चाला पाचदहा जास्तीचे मिळत असे,
लक्ष्मी पुजनाला बंदा पंचंमजॉर्ज असे
भाऊबीजला तर गम्मत अशी
बहिणींना त्यांच्याच वस्तू ओवाळणीत ,
वापरलेल्या वहीच्या कव्हर मधे ठेवत असे
द्यायला मात्र टांगवत टाळटाळ असे
दिवे विजेचे नाही मातीची पणती असे
[17/10, 08:55] ‪+91 866 966 6150‬: फटाके खरेदी वर्ज, वडिलांचे हिंदी शिष्य त्यांच्या न कळत
काही द्यायचे, वरच्या फळीवर
सुपात ठेवायचे, टिकल्या, साप सुरळी, फुलझडी , मूक
असले तरी आमच्याशी बोलायचे.
लड नाही किल्ली मधे अगपेटीच्या काड्यांचे गुल , ती दांडूच्या टोकाला मग
त्यात खिळा हलका रोवून
खिळा दांडूच दुसर टोक धरून जमिनीवर आपटून
धमाका व्हायचा तो आमचा एटम बॉम्ब असायचा.
नरक चथुर्दशीला पहाटे अंधारात दुलारे उठवायचा
आम्ही गुंगीत तो तेल उटणे
लावायचा,
भाऊसाहेब, अण्णा अप्पा नरकात नई पडायचा, परीट घडीचे कपदें चढवून फुलझडी द्यायचा
आई ताई फराळ देऊन खेळू म्हणायच्या
ओघळले हे मोती जपल्या आठवणी
भाऊ लेले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आठवणी भाऊकाका..
अजून लिहित राहा म्हंजे तुला तिकडे एकटं वाटत नाही राहणार.

खूप सुंदर लिहिलेय भाऊकाका. किलबिल शाळा आता इथे भरेल ना, तुमची कविता वाचून.

अजून काही लिहिले असेल तर इथे जरूर शेअर करा. वाट पाहतेय.

<<<कलचर्ड नाही खरेखुरे मोती>>> क्या बात है! खूप छान लिहिलंय. दिवाळीचा माहोल डोळ्यासमोर उभा राहिला.
<<<गीत स्फुरावे ओठांना--
स्वप्न पडावे दृष्टीला ---
हसू आले वृक्षाला –- अन
पान गळले साक्षीला !!>> मस्तंच. चित्रदर्शी.

मस्त कविता
खूप सुंदर लिहिलेय भाऊकाका. किलबिल शाळा आता इथे भरेल ना, तुमची कविता वाचून.
अजून काही लिहिले असेल तर इथे जरूर शेअर करा >> +1111

लहानपणी। पाहिइलेली अनेक कघरातून पाहिलेल्या दृष्यात लढाईच्या काळात अशी दिवाळी आणि मनात उमटले हे भाव . अटलेला ओढा , करपलेला वृक्ष आमच्या निमशहरी त्याच वेळी होता. युध्द संपेल आणि जीवन चैतन्यमय होईल ही आशा प्रबळ होती.