दिवाळी

Submitted by मी मीरा on 16 October, 2017 - 02:21

दिवाळी
कधी थोडा गारवा कधी थोडी उन कोवळी
हसते आंगण घरचे सोबतीला रंगीत रांगोळी
सजावटीचे महत्व या सणाखेरीज नाही कश्यातच
करू या न साजरी दिवाळी पुन्हा अश्यातच

चिवडा, लाडू, चकली जरी नेहमीचाच बेत
स्मरण सणाचे खरे हेच तर करून देत
जुन्या परंपरेची सर नाही अजून कश्यातच
करू या न साजरी दिवाळी पुन्हा अश्यातच

सख्खा नात्याचा व्हावा मेळ
गप्पाचा मजेत रंगावा खेळ
गोडवा भेटीगाठीचा नाही अजून कश्यातच
करू या न साजरी दिवाळी पुन्हा अश्यातच

पाच दिवसांचा सोहळा समजून चालू
नको दाग-दागिने नको भरजरी शालू
फक्त साध्या आठवणी साठवून घेऊ मनातच
करू या न साजरी दिवाळी पुन्हा अश्यातच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सख्खा नात्याचा व्हावा मेळ
गप्पाचा मजेत रंगावा खेळ
गोडवा भेटीगाठीचा नाही अजून कश्यातच
करू या न साजरी दिवाळी पुन्हा अश्यातच>>> chhan..