सारेच भग्न येथे

Submitted by द्वैत on 15 October, 2017 - 14:03

सारेच भग्न येथे

का झाकशी स्वतःला सारेच नग्न येथे
समजावशी कुणाला सारेच रुग्ण येथे

अखंड एकसंघ कोणीच सापडेना
ऐसे ना तैसे असती सारेच भग्न येथे

तू चालशील जेव्हा रस्ता तुझा स्वतंत्र
रस्त्यात हर ठिकाणी असतेच विघ्न येथे

तु हाक दे कितीही मिळणार साद नाही
आपुल्या जगात असती सारेच मग्न येथे

Group content visibility: 
Use group defaults