तू आहे माझे मन ...

Submitted by satish_choudhari on 12 October, 2017 - 13:38

Dedicated to all those who have been in love truly from heart at least once in the life ....

" तू आहे माझे मन...!! "

तू अशी चालली ...जीव माझा जणु चालला ....
..…....…..................

तू जशी थांबलि ..जीवात जीव माझा आला ....

….........................…..

तू आहे आहे माझे मन
हृदयाची तू आहे धड़कन
झाले आहे आता हे जीवन
प्रेमासाठी तुझ्या अर्पण....

सकाळी सकाळी दिसतेस तु
दिवसभर डोळ्यात असतेस तु
संध्येची रजनी भासतेस तू
रात्रीला ही सजनी असतेस तु
मी काय करू सांग आता तु
प्रत्येकक्षणी असते तुझी आठवण

फुलाला कळीला विचार तू
खरा साथी कोणता जाण तु
फूल म्हणती भवरा जातो उडून
काटाच असतो हाथ धरून
फूल काट्याची आपली सोबत ग
समझेल तुला कधी हे बंधन

जगाला कुणाला भितेस तु
जाणून घे स्वतालाच भितेस तु
भीती नाही वाटणार कधी तुला
दे हातात माझ्या हात तु
मी दिवा माझी वात आहे तु
तू आहे तोवर मी जळन ...

तू आहे आहे माझे मन
हृदयाची तू आहे धड़कन
.......

-- सतिश चौधरी

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे

फुलाला कळीला विचार तू
खरा साथी कोणता जाण तु
फूल म्हणती भवरा जातो उडून
काटाच असतो हाथ धरून
फूल काट्याची आपली सोबत ग
समझेल तुला कधी हे बंधन >>>> हे जास्त आवडले