Submitted by vijaya kelkar on 12 October, 2017 - 04:36
चंदेरी दुनिया
चल चल जाऊया चंदेरी दुनियेत
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना घेऊ ओंजळीत
एखादा लबाड ढग येईल अवचित
चांदोबास लपवेल काळ्या चादरीत
अरे! तो तर बसला हरणांच्या गाडीत
आणि लागलाय हसायला गालात
भाग घेऊया या का लपंडावात
गाडीवान होऊ वा शिरुया ढगात
आता तो पोहू लागलाय आकाश गंगेत
आनंद लहरींवर नक्षत्र लेण्यात
जांभाई सांगते झोप भरलीय डोळ्यात
आईनं थोपटता बाळ रमलाय स्वप्नात
विजया केळकर ___
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गोड दुनिया !
गोड दुनिया !
खुप छान
खुप छान
गोड कविता
गोड कविता
राहुल , अम्बज्ञ आणि अक्षय
राहुल , अम्बज्ञ आणि अक्षय दुधाळ सर्वांचे आभार .
sorry , उत्तरास उशीर झाल्या बद्दल....
खुपच गोड कविता!
खुपच गोड कविता!
धन्यवाद सायु ,तुला भेटून छान
धन्यवाद सायु ,तुला भेटून छान वाटले