दुरावा

Submitted by वैभव जगदाळे. on 11 October, 2017 - 03:53

माझं मन आजकाल तुझी जरा जास्तच वाट पाहतयं
तुझ्या दुराव्याच्या जाणिवेनं एकटंच रडत राहतयं

जेव्हा डोळ्यांच्या बंद पापण्यांमध्ये तुझा चेहरा दिसतो
तेव्हा मी कल्पनेच्या जगात जाऊन तुलाच पाहत असतो

माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर येत आहे तुझीच आठवण
ह्रदयात मात्र झाली आहे जगभरातल्या दुःखांची साठवण

असच सतावशील आयुष्यभर की माझं प्रेमही समजून घेशील
आता तुच सांग ना माझ्या प्रश्नांची तु कधी उत्तरे देशील

तुझा होकार असो वा नकार मान्य आहे इच्छा तुझी
कारण तुझ्या इच्छेपुढे तुच्छ आहे प्रीती माझी

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!!!
मीरा बावनकर आणि mr.pandit