रिटा

Submitted by अविनाश जोशी on 10 October, 2017 - 01:52

रिटा
रिटा एक आगाऊ मुलगी होती. लातूरसारख्या छोट्या शहरात शाळेत जाणारी सातवी आठवीतच होती. घरची श्रीमंती, मूळची हुशारी यामुळे ती शाळेत कशीबशी वेळ मारून न्यायची. शाळेत जायला तिला फार आवडायचे. परत यायलाही फार आवडायचे फक्त मधला वेळ तिला नकोस वाटायचा.
रिटा शाळेत कधीही वेळेवर पोहचायची नाही म्हणजे घरून निघायची वेळेवर आणि शाळा हि तशी वीस मिनिटाच्या अंतरावर पण तिला लागायचा तासभर. वाटेत कुठे डोंबाऱ्याचा खेळ बघ, कुत्र्याला दगड मार, कुणाला रास्ता ओलांडायला मदत कर, रस्त्यावर पडलेला वस्तूंशी फुटबॉल खेळ अशा गोष्टीत तिचा मस्त वेळ जायचा मग काय शाळेत जायला उशीर व्हायचाच, बाई ही शिक्षा द्यायचाच. तरी दुसऱ्यादिवशी येरे माझ्या मागल्या.
बाईनी दिलेल्या गृहपाठाचे ही असेच व्हायचे. अभ्यास हा घरात करण्यासाठी नसतोच अशी तिची ठाम समजूत होती.
अशाच एका दिवशी सॅक खांद्यावर लटकावून रिटा शाळेत निघाली. वाटेत दोन सायकली एकमेकांवर आदळल्यामुळे झालेले भांडण बघण्यात तिचा बऱ्यापैकी वेळ गेला. अचानक तिला शाळेची आठवण झाली आणि ती झटझट चालू लागली. वाटेत तिला एक कॅन दिसला त्याला तिने फुटबॉल सारखी किक मारली.
पण तो कॅन नव्हताच तो होता एक धातूचा दिवा. रिटाच्या किक मुले तो रस्त्यातून घासत गेला आणि त्यातून एक जेनी बाहेर आली.
'रिटा !! मी या दिव्याची जेनी. तुझ्या तीन इच्छा मी पूर्ण करेन. 'जेनी'
' तुम्ही जेनी फार बंडल असता, प्रॉमिस करता एक आणि मग काही देत नाही. 'रिटा'
' नाही तस काही होणार नाही. माग तुला हवं असेल ते फक्त काळावर माझे वर्चस्व नाही त्यामुळे तू प्रचंड आयुष्य, मरण नाही अशा गोष्टी मागू नकोस 'जेनी'
' हे बघ माझ्या पहिल्या इच्छेनुसार मला तीन ऐवजी असंख्य इच्छा हव्या. 'रिटा'
' रिटा काहीतरीच काय मागते चल मी तुला तीन ऐवजी पाच इच्छा देते. 'जेनी'
' बघ मी म्हंटल नव्हतं कि तुम्ही मागितलेले कधीच देत नाही. 'रिटा'
जेनी फार नाखूष झाली पण शेवटी तिला रिटाचे म्हणणे मान्य करावे लागले.
' हे बघ रिटा मी नाईलाजाने तुझे म्हणणे मान्य करत आहे पण काही अटी आहेत. एक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तू दुसरी इच्छा मागू शकणार नाहीस आणि सर्व इच्छा याच जागेवर मागायला लागतील. 'जेनी'
'ठीक आहे. माझ्या इच्छे प्रमाणे तू मला शाळेतील सर्वात सुंदर मुलगी कर. 'रिटा'
' झालीस तू सुंदर 'जेनी'
' पुढची इच्छा म्हणजे मला अतिशय हुशारी कर आणि माझा गृहपाठ आपोआप होऊदेत. 'रिटा'
' ठीक आहे 'जेनी'
' मला एक कोटी रुपये हवे आहेत 'रिटा'
' अग पण तू ठेवणार कुठे तुझ्या सॅक मध्ये तर ते मावणार नाहीत आणि मी जर बॅग दिली तरी सुद्धा तुला ती हलवता येणार नाही. त्यापेक्षा मी तुला एक कोटी रुपयाचा चेक देते 'जेनी '
' ठीक आहे पण मला KBC चा AB नी साइन केलेला चेक हवा. 'रिटा'
' बरं बाई हा घे
रिटा च्या हातात चेक पडताच तिने तो सॅक मध्ये ठेवला. ठेवता ठेवता तिचे लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेले 'अरे बापरे मला आता पळालेच पाहिजे
' रिटा अजूनही पळतेच आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

सर्व इच्छा याच जागेवर मागायला लागतील. >>>> रिटा पळायला लागल्याने पुढची ईच्छा तिला त्याच जागेवर आल्यावर मागायला लागेन. वळण घेता आले तर ठिक नाही तर तिची पृथ्वीप्रदक्षिणा Lol

सर्व इच्छा याच जागेवर मागायला लागतील. >>>> रिटा पळायला लागल्याने पुढची ईच्छा तिला त्याच जागेवर आल्यावर मागायला लागेन. वळण घेता आले तर ठिक नाही तर तिची पृथ्वीप्रदक्षिणा Lol
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 10 October, 2017 - 22:54
>>>>>
पृथ्वीप्रदक्षिणा करून त्याच जागेवर आली तर ठिक आहे पुढील इच्छा मागायला एखादाच क्षण मिळेल. नाहीतर जन्मभर पृथ्वीप्रदक्षिणा