दक्षिणायन

Submitted by सत्यजित on 10 October, 2017 - 00:56

कसे काय तुला मी सांगू
तुला कळले असते का रे?
पश्चिमेस गेले असते
का दक्षिण क्षीण ते वारे?

परतून ये पुन्हा तू
तुझ्या पाऊलखुणा पुसण्या
नागमोडी वळणे आतुर
पुन्हा पुन्हा डसण्या

क्षीण हास्य मनीचे मोद
क्षुधा प्राणांची मिटते
तुझी अग्नीपरीक्षा घेऊन
अग्नी देखील विटते

फिक्कट रंगांचे धागे
घेऊन कशिदा विणतो
सूई बोचारी होते
टाक्या टाक्याला कण्हतो

तू तोड मायेचे पाश
प्राणांचा घेऊन घास
मर्त्याने कशास धरावा
अधृत अमृताचा ध्यास?

-सत्यजित.

Group content visibility: 
Use group defaults

सत्या
मला वाटलं माझ्यावर कविता केल्येस तू... Proud