पुन्हा एकदा

Submitted by वैभव जगदाळे. on 8 October, 2017 - 12:43

पुन्हा एकदा तोच एकांत,तेच दुःख,तीच रात्र झाली...
मनाला समजवायला जेव्हा तुझी आठवण आली...
तरीही अश्रूंना थांबवू शकले नाहीत हे डोळे...
अबोल होते ते बोलू लागले माझे भाव भोळे...

वार्याच्या मंद झुळुकेत आणि चंद्राच्या शीतल छायेत...
तुझ्या आठवणींत माझे डोळे अश्रू ढाळत आहेत....
ते अश्रू मोती होतील जेव्हा तुला ते कळतील..
तेव्हा माझ्यासारखे तुझेही दोन अश्रू गळतील...

भास होतात मला तु जवळ असल्याचे...
तुझे डोके मांडीवर घेऊन एकांतात बसल्याचे..
एकमेकांच्या डोळ्यात डोळे आणि हातात हात....
आणि बसलोय मी तुझ्यासाठी एखादं प्रेम गीत गात...

वास्तवाचं भान झाल्यावर दुःख गळ्यात दाटतं...
परत एकदा त्या स्वप्नांच्या दुनियेत जावसं वाटतं....
त्या साठीच फिरतोय मी तुझ्या मागे मागे...
कारण तुझ्याच हातात आहेत माझे स्वप्नधागे...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults