भूतकाळ

Submitted by योगेश_जोशी on 7 October, 2017 - 07:53

.

.

किती वर्षानी पुन्हा एकदा
झाडावरुन एकेक फळ तोडावं
तश्या तुझ्या आठवणी
प्रत्येक हुंदक्याच्या दगडाने
अलगद मनात सांडत होतो

अनेक प्रसंगाचे मोहोळ उठलंय
दुराव्याची मधमाशी डंख मारतेय
वहीच्या पानातील ...
तू दिलेलं पिंपळपान
आणि ते ...
ग्रीटिंग मधून डोकावणारं मोरपिस

पण !
आयुष्याची गणितं सोडविताना
रात्रं सरली होती नि
पाऊसही पुढे थांबला
आठवणींच्या टपोऱ्या गारा
भूतकाळ चिंब भिजवून....

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच सुंदर... Happy
काय वेगळा प्रतिसाद द्यावा तेच कळत नाहि..सगळेच खूप छान लिहिताय...

धन्यवाद पवनपरी11
समजली बर्र का >> Lol ह्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद Happy