हे सारे कसे बदलेल??

Submitted by कोमल मानकर on 5 October, 2017 - 23:57

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .
या सार्याविरूद्ध संघर्ष करताना दोन सल्ले सतत निदर्शनास येतात .एक म्हणजे की जागतिकीकरण व खाजगीकरण यांतून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली .शिक्षण मिळेल ते मिळाले तर नोकरी मिळेल पण ती टिकेल ह्यांची शाश्वती रहालेली नाही .
ह्या अशा परिस्थितीत परस्पर मानवी संबंधही अमानवी झालेत .
आज धर्माच्या नावाने राजकरण करणार्यांच्या शक्तिंचा प्रभाव समाजावर वाढत चालला आहे .लोकांच्या धर्मभावनेचा कच्चा माल वापरून त्याद्वारे मतपेटीतून सत्तेचा पक्का माल या राजकारणी लोकांना बाहेर काढावयाचा आहे . यासाठी लोकांचा ही भावना नैतिकतेऐवजी धर्मांधतेकडे आकर्षित होत आहे . यासाठी ही बाबा लोकांनी कुठे कसर सोडली नाही महाराजांचे वाढते प्राबल्य ,कर्मकांडे ,धर्मसोहळे यांचा उसळतो जल्लोष वेळ खावू परिस्थित ही तेवढाच अंगीकारला आहे .
पूजाअर्चा ,व्रतवैकल्ये यांद्वारे वंचितांना व बहहुसंख्यकांना या देशात कोणतीतरी दैवी शक्ती ,चमत्काराने आपले रक्षण होईल असे वाटते . समाजात क्रांतिकारी स्वरूपाचे राजकीय ,सामाजिक ,आर्थिक बदल होत नाही तेव्हा पर्यत ही परिस्थिति बदलणे शक्य नाही पण हा बदल स्व : विचारातून होणे गरजेचे आहे .
वर्तमानपत्रात येणारे राशिभविष्य हे लोकांना चक्क वेड लावत असते लोक काही नाही पण सर्वात आधी वर्तमानपत्र हातात आल्यावर राशीभविष्य बघतात. स्युडो सायन्सला तर आजकाल जणू काही पंखच फुटलेले आहे .दैवी वास्तुशास्त्र ,फेंग शुई ,गर्भातील संस्कार अशा अनेक बाबीनी त्या क्षेत्रात आपला विळखा घातला आहे . धर्मातील कालबाह्य वर्ते वा रुढि ह्यांची देशात मोठी परंपरा आहे .वटसावित्री सारखी वर्ते शिकली सवरली ही स्त्री नवर्यांच्या अखंड आयुष्यासाठी वटाची पुजा अर्चना करते हे कितीपत योग्य असते . मार्गशीर्ष महिन्यातील वैभव महालक्ष्मी चे व्रत महानगरांपासून ते पार खेड्यापर्यत पसरले.
पर्यावरणाची ऐसी की तैसीतर होतेच पण ह्या व्रताविरोधात कोणीही ब्र उच्चारत नाही .विज्ञानयुगात अशा खुळचट चालीरिती पार पाडणार्यांबद्दल खंत वाटते . देव-दैवीचे फोटो चमत्कार करतात ही चुकीची मनोधारणाही खुप खोलवर रूतून बसलेली आहे .
गणेशविसर्जनाच्या वेळी पाण्यात न विरघळणारे तसेच गंभीर विषारी रासयनिक रंगानी रंगवलेले हजारो टन प्लँस्टर अॉफ पँरिस पाण्यात मिसळल्या जातात.
वृत्तपत्रांत वा विविध चँनेल्सवर जे सतत दाखविले जाते ,त्याला नकळत अधिमान्यता प्राप्त झालेली असते .धार्मिक सोहळे ,प्रचंड गर्दीच्या जत्रा यात्रा ह्या खपाऊ गोष्टीसोबत लक्षावधी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. डोळसपणे कुणीही ह्यांचा विचार करीत नाही.
आधुनिक आध्यात्मिक बुवाबाजीने सर्वसामान्य जनतेला कसे लुबाडले हे शेवटी निदर्शनास आले ही आधी भक्त बनविने मग पर्मात्मा समजून आपल्या शरणावर भक्तांना जागा देणे .प्रचंड पैशाची लुट प्रचारासाठी स्वतः ची पुस्तके छापने आणिजनातही पाखडाला तेवढी बळी पडते आणि आसाराम ,रामरहिम अशा कितीतरी बलात्कारी बाबांना खतपाणी घालत देव नामाचा त्यांचा सानिध्य्यात राहून जयजयकार करतात. वैज्ञानिक दृष्टिकोण ,शोधक बुद्धि ,सामाजिक सुधारणा मानवतावादी विचार ह्या गोष्टी गेल्या मग खड्यात .
हे सारे कसे बदलेल .कृतीतून की विकृतीतून ??

.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Bakrid moharam ani kay te chandraala dev manat ramjan eid sajari karanyacha kuthe ullelh nahi disla .... ha bhedbhaw ka ? Ki tya shraddha ani ikde saptpadi barse satynarayan hya andhshraddha !
Ek ratricha talaq baddal suddha nakki mahiti ghewun liha moulawi kase tikde divorce ghenyarya baykana bhogat astat te Happy mhanje lekhan kase sarwangin vivharwant lekhikeche watel na !

मी आधी पण बोललो होतो... माझा बाबा आणि मा/ अम्मा लोकांवर पूर्ण विश्वास आहे.
पण दर सहा आठ महिन्यात बाबा बदलावा लागतो कारण ज्याला फोल्लो करू तो जेल मध्ये जातो.

बादवे... लेख पटला.. पण हे गर्भातले संस्कार खोटे आज हे माहीत नव्हते..

लेख नाही पटला. उथळ वाटला. ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. थोडे अजुन खोलात जाऊन निरीक्षण करुन लिहायला हवे होते असे वाटते.