किनार्यालगतच्या कातरवेळी भाग-2

Submitted by कोमल मानकर on 5 October, 2017 - 22:13

"मी गेली आठ दिवस झाले अनु रोज जायचो किणार्यावर .तुझ्या पाऊलखुणाकडे लक्ष नाही पण आपण बसलेल्या दगडावर बसून तुझी वाट बघायचो तिथे बसल्यावर मला तुझा हसण्याचा समुद्राच्या लाटा खळखळल्या म्हणजे तु हसती आहे असा भास व्हायचा .तिथून घरी जावू नयेच असे वाटायचे गं तु येशील असचं वाटायचं .."
"आलोक आज ये मी निघते आता भेटू आपण किणार्यावर."
असं म्हणतं अनु तिथून निघून गेली खूप प्रश्न तिच्या मनात घर करून गेले .प्रेमासारखी ताकदवर गोष्ट अशी संपत नाही तर मग माझ्या मृत्यूलाहि आलोकचा विचार यायला हवा मी नाही सोडून जाऊ शकत त्याला मृत्यू मला येइल घेऊन जाणार पण ह्यात आलोकचा काय दोष ?
घरी जाताच अनु फ्रेश झाली आणि सहा वाजायची वाट बघू लागली.तिकडे आलोक हि कधी निघतो तिला भेटायला असे झाले.
सहा वाजले नेहमी प्रमाणे अनु आधी जाऊन बसली पण किणार्यांवर पोहचताच ढग दाटून आले ..काळोख पसरला ..."
"अनु मला यायला जरा उशीर झाला गं."
"नाही आलोक तु बरोबर आलास पण बघ वातावरण कसे झाले."
विजाच कडाडणे सुरू झाले सोसिट्याचा वारा सुटला .
"अनु पाण्याची थेंब लागतं आहेत चल इथून ."
असं म्हणत आलोकने अनुचा हात हाती धरला .
तसेच पाणी जोरात पडायला सुरूवात झाली.आलोक चा नजरेस आँटो पडला .
"अनु अॉटो लागून आहे चल आपण जावून बसू."
"हो आलोक चल ."
अनुचा हात आताही आलोकच्या हाती होता तो अनुला हि सोडुन घ्यावस नव्हतं वाटे आणि आलोकला हि सोडावा असे नव्हते वाटे.आलोक भाणावर आला त्यानेच अनुचा हात सैल केला.अनुचे घर आले."
"आलोक निघते ते मी."
"हो अनु संभाळुन जाशील."
कधी संभाळुन न जाशिल म्हणार्या आलोकचा तोंडून हा शब्द ऐकून अनुला गहिवरून आले...घराच्या गेट जवळ येऊन आलोकचा जाणार्या अॉटोकडे अनुने एकदांचे बघून घेतले.पावसाच्या वेगात बरसणार्या सरीत अनुचे डोळे हि अंखड बरसू लागले..
घरीआत आल्यावर अनु बिछायान्याला खिन्नली खुप थकुन गेल्यासारखे वाटत होते जीव जातो कि काय असे वाटतं होते.पण आजही आलोक ला भेटून बोलु शकले नाही ह्याचे दुख:झाले..अनु ने आलोक साठी पत्र लिहायला कागद घेतला..त्या पत्रात चार ओळी लिहिल्या......
पत्र लिहून ते त्या लिफाफ्यात तिचा फोटो आणि डायरी तिने अनुकडे दिली..
"अनु माझं एक काम करशील माझी हि डायरी आणि पत्र आलोकला देशील प्लिज ,एवढं करशील ना गं माझ्यासाठी...."
"हो गं ताई दे माझ्याकडे मी देईल त्याला तु झोप आता निवांत."
"पियु झोप नाही येत आहे गं मला उद्या दादा आईबाबा ह्याच्या सोबत गावाला जायचे आहेना ,आलोक इथे एकटाच कसा जगेल गं?"
"ताई तुला आरामाची गरज आहे आता तुला काहीच होणार नाही झोप निवांत..."
असं म्हणतं पियू तिथून निघून गेली.अनामिकाला खुप असह्य त्रास वेदना होतं होत्या डोळे जड झाल्यासारखे वाटतं होते .अश्रु धारा वहात होत्या सारखा आलोकचा चेहेरा नजरेसमोर येत होता.अनुचे डोळे मिटतं होते.....
सकाळ झाली सुर्यणारायनाची तांबुस पिवळी छटा सर्वांना जाग आनुन दिली .अनुला आवाज द्यायला तिची आई रूम मध्ये गेली.अनुला आवाज दिले उठवण्याचा प्रयत्न केला पण अनु आता उठणार नव्हती ती कायमस्वरूपी झोपी गेली..अनुचा कुंटूबाने दुख:चा हबंरडा फोडला सर्व अनुसाठी रडु लागले.अनुचा अंत्यसंस्कार तिचा गावी करण्यात आला..
तिकडे आलोकला ह्याची काहिच खबर नव्हती .पंधरा दिवसांनी ते पत्र पियुचा हाती लागले तिला मग आठवले हे ताईची शेवटची इच्छा होती .
तिने आलोकला तसाच मँसेज केला मला आज किणार्यावर सायंकाळी सहाला भेटायला ये म्हणून .आलोकने हो म्हणून रिपले दिला समोर आलोक मँसेज करू लागला पण त्याला रिपले मिळत नव्हते.
आजतरी अनु होकार देईल खुप दिवसांनी अनु भेटत आहे कशी असेल ती असे एक न अनेक प्रश्न आलोकचा मनात .अनुसाठी जातांनी आलोक ने एक छान गिफ्ट म्हणून डायमन्ड नेक्लेस घेतला तो किणार्यावर बसुन वाट बघू लागला .दुरवरून येताना त्याला एक मुलगी दिसत होती पण त्याला अनु येण्याची नेहमी आहट लागते तशी आज आहट नव्हती लागतं
ती मुलगी जवळ आली तेव्हा आलोकला समजलेच आपली अनु नाही.
"आपण आलोक ना?"
"होय मी आलोकच पण तुम्ही कोण?"
"मी अनुची मामे बहिण पियू,तिने तुम्हाला हे पत्र आणि डायरी दिली आहे."
"पण,अनु कुठे आहे मला तिला भेटायचे आहे .सांग ना अनु कुठे आहे तर?"
काहीच न बोलता डोळयातील आसव पुसत पियू तिथून लवकरच निघून गेली.
आलोक मनात म्हणू लागला अनु आज पण आली नाही खुप अस्वस्थ होऊन त्यांनी ते पत्र खोलले आणि वाचायला लागला.
प्रिय,
आलोक......
रागवलास न माझ्यावर प्लिज रे रागवशील नको,तु खुप प्रेम करतो रे माझ्यावर मला माहिती आहे .मी पण तुझ्यावर खुप प्रेम केले पण तुला दुखवायचे नव्हते मला कधीच म्हणून मी तुला नव्हती सांगु शकली तुझी सारखी आठवण येत असते आलोक ..आज बघं पावसानेही आपली भेट होऊ दिली नाही नियतीलाहि आपल्याला एक होऊ द्यायचे नसेल.एक ह्रदय दिलं त्या ह्रदयात माझं प्रेम म्हणून तुच सर्वांत आधी जागा केली .पण नियतीने माझ्यावर घावच टाकलेत रे मला ब्लड कँन्सर आहे ,तु मला कदाचित म्हणशील मला धोका देऊन कुठे तरी दुर न सांगता निघून गेली.पण खरं सांगते आलोक तुला सोडून कुठेच जायची इच्छा नव्हती.आलोक तुझ्यावर प्रेम करते म्हणायला मी खुप वेळांनी सांगितल तुला ते ही असं वेगळया पद्धतीने पण त्या मागे कारण होते.आज मला कोणत्या क्षणी मृत्यु ओढवून घेऊन जाईल मलाच माहिती नाही पण आलोक एवढं सांगु शकते प्रेमात खरचं ताकद असते ते अस कुणी एक निघून गेल्यावर संपत नसते .माणस मेली तरी प्रेम मरणं नसतं माझं ह्रदय तुझ्यात धडधडत आहे माझा श्वास नेहमी तुझ्यात गुतला असायचा आता मी तुला प्रेम करते हे न सांगता निघून गेली तर आपलं प्रेम हि संपल असं कधीच नको म्हणशील आलोक तु नेहमी हसत रहा.छान दिसतो हसतांनी माझ्या साठी रडला तर बघं मी इकडे नाराज होईल ....तु स्वतः ला कधीच दोष नको देवु मी फार नशीबवान समजतं होते स्वतःला माझ्यावर हि कुणीतरी जिवापाड प्रेम करणारे होते.आलोक माझ्या नावासरखं आपलं प्रेम हि अनामिक होतं असं समजून सुखाने संसार करशिल .मी तुझ्या पासुन खुप लांब आले आपली भेट कधी होईल आता तु सारखा नजरेसमोर येतो
आज आर्तह्रदय रडते
माझे शब्द मी हूंदक्यात गिळते
पाऊलखुणाच्या नक्षीवर मिटल्या त्या आणाभाका
मी काळजात तुझे नाव कोरूण जाते.........
तुझीच
अनामिका
पत्र वाचुन आलोक खुप रडु लागला .अनामिका आपल्याला कायमची सोडुन गेली हे समजल्यावर अनामिकासाठी तो तडफत होता आजही आलोक त्या किणार्यालगतच्या कातरवेळी एकटांच त्या दगडावर बसुन अनामिका सोबत गप्पा करत बसला असतो........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults