सिनेतारकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करणे योग्य आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2017 - 13:17

कदाचित कधी ना कधी आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या सिनेकलाकाराच्या दिसण्यावरून चांगली वाईट कॉमेंट केली असेलच. सई, स्वप्निल, शाहरूख(?), सुबोध भावे, कंगणा राणावत, गेला बाजार अमेय वाघ, कोण तो एक प्रभाकर, लेटेस्ट जॅकलीन आणि अजूनही लिस्ट निघेल... पण हे चटचट आठवणारे.

प्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात.

बरेच दिवसांपासून हा धागा काढायचा होताच, कारण वरच्या लिस्ट मध्ये माझेच फेव्हरेट लोकं जास्त भरले आहेत. त्या त्या वेळी तो तो धागा भरकटू नये म्हणून विषय वाढवायचो नाही, पण आज दुसर्‍या एका धाग्यावर (कुठला ते शोधायला जाऊ नका) हा विषय पुन्हा आल्याने राहावले नाही आणि यावर तो धागा न भरकटता स्वतंत्र चर्चा घडावी यासाठी वेगळा धागा काढला.

चर्चा सुरू करायला माझे स्वत:चे मत मांडतो.
मला एखाद्या कलाकाराच्या दिसण्यावरून कॉमेंट करण्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नाही. फक्त कधीकधी त्यामागचा हेतू कमी जास्त आक्षेपार्ह वाटू शकतो.
मी स्वत: कधी फारशी अशी कॉमेंट केल्याचे आठवत नाही, पण जाणीवपूर्वक टाळलीही नाही. किंवा एखाद्याने केलेली कॉमेंट आवडली तर हसलो देखील असेन.
मला स्वत:ला माझ्या आवडत्या कलाकारांच्या दिसण्यावरून केलेली कॉमेंट त्रास देऊन गेली नाही. कारण वर लिहिले आहे तेच. प्रत्यक्षात सई, स्वप्निल, शाहरूख वगैरे हे कॉमेंट करणार्‍यापेक्षा कैक पटींनी सुंदर असण्याची शक्यताच जास्त असते. आणि हे त्या कॉमेंट करणार्‍यांनाही ठाऊक असतेच. पण होते काय, बरेच वेळा आपण मनात आलेली एखादी विनोदी तुलना कागदावर उतरवायच्या प्रयत्नात असतो. आपल्या नजरेला जे दिसले ते ईतर कोणाला दिसले का हे चाचपत असतो.

तसेच सौंदर्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हे सांगायला नकोच. मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा लहानपणी सलमान आम्हाला जगातला दुसर्‍या की तिसर्‍या क्रमांकाचा चिकणा हिरो वाटायचा पण माझी आत्या एकदा बोलता बोलता सहज बोलून गेलेली, "हा दिसायला काही खास नाही पण अभिनय चांगला करतो.. म्हणून भाव खाऊन जातो Happy
त्या आत्येसाठी सौंदर्याचे बेंचमार्क मधुबाला आणि देव आनंद होते !

बरेचदा काय होते, सिनेकलाकारांबद्दल बोलण्याचा आपला हक्क आपण बजावत असतो. आपण ज्यांना पडद्यावर २०० रुपये खर्चून बघायला जातो जर ते आपल्या डोळ्यांना वा मनाला आल्हाददायक नाही दिसले तर एक ग्राहक म्हणून आपण आपला असंतोष व्यक्त करू शकतो. वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचे सौंदर्य हे आपल्यासाठी एक प्रॉडक्ट असते. निदान आपण तरी तसे समजतो.

बरेचदा आणखी एक प्रकार होतो. एखाद्याचा चेहराच नकोसा वाटणे. जे माझे कोणे एके काळी शक्ती कपूरबाबत फार व्हायचे. म्हणजे तो पडद्यावर आला की मला ईरीटेट व्हायचे. त्याने काहीही केले तरी ते डोक्यातच जायचे. आणि त्याच्या बाबतीत त्याने चांगले काही केले असण्याची शक्यता कमीच असायची. मी माझे पैसे वेळ खर्च करून एखादा सिनेमा बघतोय, मला तो आवडतोय, माझे पैसे वसूल होत आहेत, पण त्यासोबत मला न आवडणारा हा एक माणूस मला सहन करावा लागतोय, ही भावना खरेच खूप ईरीटेटींग असू शकते हे तेव्हा अनुभवलेय. खरे तर तो हिरो नाहीये, त्याने सुंदर दिसावे अशी अट नसायची, पण तरीही ईतके घाण, ओंगळवाणे दिसू नये अशी माझी अपेक्षा असायची. आणि म्हणून त्याने काम केलेला एखादा चित्रपट बघून आल्यावर चित्रपटाबद्दल जे काही चांगलेवाईट मत असेल ते व्यक्त करून झाल्यावर त्याला चार शिव्या हासडायला विसरायचो नाही. तो माझा पब्लिक म्हणून हक्कच समजायचो. बरेचदा त्या बोलण्यात एक विखार असायचा, ज्याची काही गरज नव्हती हे आता मला जाणवतेय. अर्थात, आजही तो माझा नावडताच आहे, आणि आजही तो मला ईरीटेटच करतो. पण आता मी ते ईरीटेशन हॅण्डल करायला शिकलो आहे Happy

अजून मुद्दे आठवतील तसे ईथे किंवा प्रतिसादात भर टाकतो ...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेतारकांच्या दिसण्यावरच कशाला फक्त...एकूणच कोणाच्याही दिसण्यावर कमेंट करण चुकिचं आहे..पण अस असलं तरी सर्वच लोक अशी कमेंट करताना दिसतात(मी पण)...
अगदी व्यक्ती सावळी असली +सुंदर असली तरिही लोक अस म्हणतात दिसतात कि जर हि /हा थोडासा गोरा/गोरी असती तर अजुन भारी दिसली असती...(अजुन बरेच मुद्दे आहेत् )
हे सर्व चालायचच...

प्रभास वाटलंच कसं?
तो तर अस्सल भारतीय मर्दानी सौण्दर्याचा आविष्कार आहे. त्याला नावं ठेऊन कोण आपलेच हसू करून घेणार...

आणि तो ललित प्रभाकर येस्स. त्या दिवशी त्याला कोणीतरी मोगली बोललेले, आणि ते वाचून मला हसायला आलेले ते सहज आठवले. बाकी प्रभाकर म्हटले की आजही मनोज प्रभाकरच आठवते. तो काही मोठा उगवता स्टार वगैरे झाला नाहीये. आधीचाच अजून मावळायचा आहे.

प्रभास वाटलंच कसं?
तो तर अस्सल भारतीय मर्दानी सौण्दर्याचा आविष्कार आहे. त्याला नावं ठेऊन कोण आपलेच हसू करून घेणार...>>>> येस्स
प्रभास बद्दल काही बोलायचे नाही हा, एकमेव आवडता हिरो आहे माझा.

रच्याकने, ललित प्रभाकर सुध्दा गोड आहे दिसायला

निषेध निषेध,
फक्त तारकांचा उल्लेख केला बद्दल निषेध,
तारे पण अशाच टिप्पणीला समीर जातात,
जुना सैफ- बायकी, शर्ट पॅन्ट घातलेली शर्मिला टागोर
अनिल कपूर- अस्वल ,बाल की दुकान
गेला बाजार स्वप्नील जोशी- बोलका बाहुला, तात्या विंचू

तेव्हा शीर्षक बदला आणि लिंगनिरपेक्ष ठेवा

का नाही करायच्या कमेंटस? त्या तर प्रदर्शन मांडूनच बसल्या आहेत ना रुपाचे व सौंदर्याचे? त्यांचा व्यवसायच आहे !
मग आपण कमी जास्त सांगायचे का नाही? हं...एखादी सायंटीस्ट स्त्री आहे...किंवा शिक्षीका आहे....... तर तिचे काम बघा, बुद्धी बघा.....
पण नट नट्यां वर आपण टीका करुच शकतो रुपा बद्दल ....वाटलं तर चांगलही म्हणावं.....

तुम्ही त्या प्रसिद्ध व्यक्तीवर कुठल्याहि बाबतीत टीका केली तरी कदाचित त्या प्रसिद्ध व्यक्तीला कळणार पण ना।ई, कळले तरी ते सोडून देतील, पण खरा धोका तुमच्या मित्रांकडून आहे. म्हणजे जसे कोण तो शहामृग खान त्याच्यावर टीका केली तर ऋन्मेष रागावून बसेल तुमच्यावर, तसे.

ऋ भाऊ आठवण ठेवून माझा प्रतिसाद कोट केल्याबद्दल धन्यवाद.
सौंदर्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे एकाची पसंती दुसर्‍याची नापसंती असू शकते. आपले मत जरूर मांडावे कोणाची भिडभाड न बाळगता.

सर्कशीतल्या विदूषकांच्या वेडेचाळ्यांवर हसावे काय? >> नानाकळा विदुषकाचे कामच ते असते. तुम्ही त्याच्या अस्तित्वावरच शंका घेताय.

कोणाच्याही शारीरिक व्यंगावर हसू नये इथेपर्यंत ठीक आहे. परंतू ही स्टार मंडळी तर शो-बिझनेसमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शनच तर मांडलेले असते. मग त्यांच्याविषयी टीका, कौतूक सर्व येणारच व यायलाच पाहिजे.

नाकळा विदुषकाचे कामच ते असते. तुम्ही त्याच्या अस्तित्वावरच शंका घेताय
>>>>
दक्षिणा +786
विदूषकाचे उदाहरण गैरलागू आहे.
कारण ईथे एक ग्यानबाचे मेख आहे. चित्रपटातील कलाकार आपल्या सौण्दर्याचे दुकान मांडून आहेत की अभिनयाचे हे आधी क्लीअर करावे लागेल. जर उत्तर अभिनय असेल तर तुम्ही त्यांच्या सौण्दर्याबद्दल बरीवाईट टिपणेस् करायचा हक्क कसा राखता. त्या केसमध्ये त्याण्च्या अभिनयाला नावे ठेवायला हवी ना?

ऋ भाऊ आठवण ठेवून माझा प्रतिसाद कोट केल्याबद्दल धन्यवाद.
>>>>>
पाफा, कोणता? ललित प्रभाकर वाला का? प्रतिसाद लक्षात राहिलेला पण कोणाचे ते विसरलेलो या बद्दल क्षमस्व Happy

फक्त तारकांचा उल्लेख केला बद्दल निषेध,
तारे पण अशाच टिप्पणीला समीर जातात,
>>>>>
मराठी कच्चे असल्याने चुकून झाले तसे. पण लेखात मेल फिमेल दोन्ही उदाहरणे दिली आहेतच.
पण तरी मला वाटते पुरुषाच्या सौण्दर्यावर टिप्पणी करने आणि स्त्रीच्या सौण्दर्यावर टिप्पणी करणे यात मूलत: फरक असतो.

पण खरा धोका तुमच्या मित्रांकडून आहे. म्हणजे जसे कोण तो शहामृग खान त्याच्यावर टीका केली तर ऋन्मेष रागावून बसेल तुमच्यावर, तसे.
>>>>>>

हा धोका राजकीय टिकेबाबत लागू. ईथे तितकासा नाही..

..एखादी सायंटीस्ट स्त्री आहे...किंवा शिक्षीका आहे....... तर तिचे काम बघा, बुद्धी बघा.....
>>><<

याच धर्तीवर नटनट्यांचा निव्वळ अभिनय का बघू शकत नाही?
हा टॅग त्यांनी नक्की कुठे लावलेला असतो की माझे सौंदर्य बघा, मी त्याचे प्रदर्शन मांडले आहे. हे आपणच ठरवतो ना Happy

बाकी करणारे तर शिक्षकांच्या सौंदर्यावरही कॉमेंट करतातच (आठवा मेरा नाम जौकर, मै हू ना, आणि आपले बालपण) पण तो या धाग्याचा विषय नाहीये.

<<<अभिनयाचे>>>
माझी समजूत अशी आहे की सौंदर्य असेल नि ते उघडे करून दाखवायला संधि असेल, तर अभिनय असावा लागत नाही.
दिसण्यात थोडे डावे असाल तर अभिनय, संवाद म्हणणे हे उत्तम असायला पाहिजे.

नंद्या,
हा एक फार मजेशीर षटकोन तयार झालाय ईथे.
म्हणजे जे कलाकार अभिनय फारसा जमत नसूनही त्यांच्या सौण्दर्याच्या जीवावर निवडले जातात त्यांच्या सौंदर्यात खोट काढायला काहीतरी सापडते. पण जे अभिनयाच्या जीवावर निवडले जातात आणि सौण्दर्य ज्यांचे बलस्थान नसते अश्यांच्या सौण्दर्यात फारशी खोट निघत नाही वा काढली जात नाही.

याला हुमायून नेचर म्हणावे का, ज्याला सुण्दर गोष्टीतच मुद्दाम खोट काढायला आवडते Happy

{{{ याला हुमायून नेचर म्हणावे का, ज्याला सुण्दर गोष्टीतच मुद्दाम खोट काढायला आवडते
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 5 October, 2017 - 21:42 }}}

अकबराचं आणि बाबराचं नेचर कसं होतं म्हणे?

याच धर्तीवर नटनट्यांचा निव्वळ अभिनय का बघू शकत नाही?
हा टॅग त्यांनी नक्की कुठे लावलेला असतो की माझे सौंदर्य बघा, मी त्याचे प्रदर्शन मांडले आहे. हे आपणच ठरवतो ना

>> भाई, तू एक नक्की कर, तुझा प्रश्न काय आहे तो... परत घोडा, चतुर नको नेहमीसारखे. दोन्ही डगरीवर बसून माझीच लाल.

सिनेतारका आणि अभिनेत्री यात फरक असतो. निरुपा रॉय ला कुणी सिनेतारका म्हणत नाही.

सिनेतारका आणि अभिनेत्री यात फरक असतो. निरुपा रॉय ला कुणी सिनेतारका म्हणत नाही.
>>>>>>
सिनेतारका या अभिनेत्री नसतात असे म्हणायचे आहे का?
प्रत्येक अभिनेत्री ही सिनेतारका नसेलही, पण प्रत्येक सिनेतारका (हिरोईन) ही अभिनेत्री असतेच. अभिनय कमीजास्त असतो प्रत्येकीचा ती गोष्ट वेगळी. पण अभिनेत्री असतातच ना?

मग त्यांना सिनेतारका का म्हणतात? अभिनेत्रीच म्हणा की सरळ.
>>>>
अभिनेत्री वा अभिनेता म्हणजे अभिनय करणारा कोणताही कलाकार.
सिनेस्टार्स म्हणजे चमकणारे ईतकेच Happy

Pages