लेट गो, लेट गो

Submitted by sas on 14 March, 2009 - 13:16

लेट गो, लेट गो

काही वर्षां पुर्वि कोणी एक संत "लेट गो, लेट गो" अस त्यांच्या प्रवाचनात सांगतात अस एकल होत.

कुणी जर आपल्याला शिवी दिली तर आपण काय करतो?
१. काही जण प्रतीसादात शिवी/शिव्या देतात
२. काही जण शिविचा प्रतिसाद मारहाण करुन देतात
३. काही शिवी के बदले में शिवी/शिव्या प्लस मार-हाण असा... एक के बदले में दो असा प्रतिसाद देतात

यातुन साध्य काय होत: आपल्याला शिवी दिली हे आपल्या मनाला दुखवत, आपला मान (बरेचदा अहंकार) दुखावला जातो आणी आपल्यालाच त्याचा त्रास होतो.

आपण शिवीच्या बदले शिवी/मार-हाण करतो त्याने ही समोरच्या पेक्षा जास्त त्रास खरतर आपल्यालाच होतो.. आपल रक्त खवळत/ मनात, डोक्यात, विचारात, ती शिवी/तो अपमान भ्रमण करत रहातो त्यामुळे आपल चित्त विचलीत होत आपला आजचा/आत्ताचा मौलीक क्षण आपण शांततेत, आनंदात घालविण्या पेक्षा त्रागा करण्यात वाया घालतो..... ह्याचे नाकारात्मक परीणाम भविष्यातही आपल्यालाच त्रास देतात..... हे सगळ न करता शांतपणे, आनंदी मनाने रहायच असेल तर काय कराव तर "लेट गो, लेट गो"

समोरच्या ने दिलेली शिवी जर आपण घेतलीच नाही तिला "लेट गो" केल ... म्हणजे ती शीवी वार्‍यावर जावु दिली तर आपल मन ही दुखत नाही, अपमान होत नाही परिणामी पुढ्च सार नकारात्मक ही काही घडत नाही

'लेट गो लेट गो' च हे प्रवचन एकल तेव्हा... केवळ प्रवचन म्हणुन मी ते एकल होत ... नुसतच कानाने एकल होत... मनाने/मेंदुने नाही... पण मनात कुठेतरी ते स्टोअर झाल होत

त्या नंतर किती तरी वर्षे... अगदी काल आज पर्यंत नाही तर... ह्या क्षणाच्या आधिच्या क्षणा पर्यंत.... मी किती तरी क्षण मला लोकांनी/आप्तांनी/मीत्रांनी/इतरांनी दिलेल्या शिव्या, शाप, अपमान आठवुन रडण्यात, स्व:ताच स्व:ताच मन दुखविणात, त्रागा करण्यात व्यर्थ घालविले.

गेल्या काही दिवसां पासुन पुन्हा शिव्या, कडु शब्द, अपमान कारक शब्द या सार्‍यांचा अनुभव मला होतोय ... त्याचा प्रतिकार/प्रतिसाद म्हणुन मी काय केल... कदाचीत मी ही कडु वचन वापरले.... शिवी देणार्‍याला शिवी देवु नकोस असा समजावण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न सुरु ठेवला, ह्या प्रयत्नात माझ्या काही समंजस मित्र/मैत्रिणींचा हातभार ही मला कळत नकळत मिळाला ..... आणी हा प्रयत्न करत असतांना एकदम मला जाणवल कशाला हा नसता प्रयत्न.... जाऊ दे... 'लेट इट गो' ... 'लेट गो, लेट गो' ... जर मी शिवि देणार्‍याच्या शिव्या घेतल्याच नाही तर तो आपसुकच गप्प होईल आणी आपल्याला त्याच्या तोंडी ही लागाव लागणार नाही.

मी ठरवल "लेट गो, लेट गो".... समोरचा शिव्या देत राहीला पण त्या शिव्या आहेत हे माझ्या.... कानांना कळल्यावर कानांनी त्या स्विकारल्याच नाहीत आणी अर्थात मी त्या घेतल्या नाही..... मी आपल शांत राहुन मला करायच ते करत होते..... अखेर शिवी देणारा माझ्या वर त्याच्या शिव्यांचा काहीच परिणाम होत नाही आहे हे समजल्यावर आपसुक गप्प झाला आणी मला काही न करता जे करायच होत ते साध्य झाल..... माझा एक क्षण ही नकारत्मक न करता ... sometimes silence speaks louder than words and actions so sometimes let go let go Happy

Let go, Let go अस आचरण ठेवायच ठरविल्या पासुन, रागात नवर्‍याच्या चुका, न आवडलेल्या गोष्टी वारंवार उगाळण्याची आणी त्याच त्याच पुरातन गोष्टि (आपल लग्न झाल तेव्हा ... माझ्या सोबत अस झाल/ अस केल ई ई.) सतराशे साठ वेळा त्याला एकवुन उगाच त्याच मन दुखविण्याची, आजचा वेळ खराब करण्याची माझी सवय जरा (अगदि जराच पण) कमी झालीय ... ती पुर्ण बंद होईल ही आशा Happy

गुलमोहर: 

गांधीजींच्या बद्दल एक किस्सा ऐकला होता. त्यांना कोणीतरी बरीच पानं भरून टीका करणारं, शिवीगाळ करणार पत्र लिहिलं होतं. त्यांनी ते वाचलं, पत्राला लावलेली टाचणी काढून नीट आपल्या टेबलच्या खणात ठेवली अन पत्राचे कागद कचर्‍यात टाकले. आजूबाजूच्यांनी ( का सेक्रेटरीने ) विचारलं 'असं का केलंत ?' तर ते उत्तरले ' या पत्रातली महत्त्वाची गोष्ट ठेवून घेतली. बा़की काही कामाचं नाही त्यात.'

ह्म्म.. मलाही ती गांधीजींची गोष्टच आठवली होती..
सास, बर्‍याच समस्येवरचे हे उत्तर आहे, लेट गो! मी ही खूप ठीकाणी वापरते.. Happy

अशीच गोष्ट बुद्धांची देखिल आहे. पण ही निर्वाणावस्था येण्यापूर्वी आपण गांधीजी किंवा बुद्ध नसल्याने बरेच बोलून गेलेले असतो आणि माणसं दुखावली जातात. Happy

एक सल्ला जो मला दाद किंवा सुमॉने (नक्की आठवत नाही) दिला होता - भावनेच्या भरात लिहून झालं की लगेच छापू नकोस, पुन्हा एक-दोनदा वाचून बघ. कधी कधी शुद्धलेखनाच्या ऑब्विअस चुका, वाक्य रचनेतले फेरफार लक्षात येतात.

नविन संकल्प तडीस नेण्यास शुभेच्छा! Happy

Let go ही neutral भूमिका झाली.

संत लोक त्याहीपुढे जाऊन सांगतात ,"जो आपलं वाईट इच्छितो त्याचं भलं होऊदे म्हणून प्रार्थना करा." कधीतरी हे करून पहा. देवासमोर उभं राहून आपला सर्वात मोठा शत्रू डोळ्यासमोर आणा आणि त्याचं चांगलं होऊ दे, भलं होऊ दे अशी प्रार्थना करा. खूप कठिण गोष्ट आहे. पण जर ही साध्य झाली तर मग आयुष्य म्हणजे निव्वळ आनंदाचा झराच!
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

सास,
काही वर्षांपूर्वी आम्हाला मॅनेजमेंट ट्रेनिंग, स्ट्रेस हॅनडलींग ह्याचे १ आठवडा ट्रेनिंग सेशन होते. त्यात आम्हाला 'लेट गो' ह्या तत्वावर पूर्ण १ दिवस लेक्चर आणि इंटरॅक्टीव्ह सेशन घेतले होते.

शेवटी हे सगळं आपल्या अध्यात्मात देखिल आहे. पण काय आहे ना कळलेलं अध्यात्मं, चांगले विचार, तत्व आचरणात आणणे हि फार अवघड गोष्ट असते. प्रिचिंग करणे, लोकाला समजवुन सांगणे हे खुप सोपे असते पण ते स्वतः आचरणात आणणे किती अवघड असते नाही. जो ते आचरणात आणु शकतो तो खरंच महान आणि संत.

छान लिहिलेय. सर्वांनीच असा विचार केला तर..
There is one management funda -
make allowances for people to behave as they want.
आपण कसे वागतो ह्यावरून आपली जिवनशैली ठरते, नाही का?
दहा मोजणे, आलेले विचार लिहून नंतर फाडून टाकणे, हे ही काही ऊपाय.
सर्वेन्मपि सुखेन्तू. ही best prayer.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

सगळ्यांचे आभार

जाई, मी १-२ वेळा वाचुन मग छापते पण ते वाचन खुपच वरवर करते Happy ... आता निट वाचुन मग छापत जाईल Happy ..... शुद्ध लेखनाच्या व ईतर निदान काही चुका टाळता येतिल... Happy

खरच क्षमा करण, भल्याची प्रार्थना करण खुप कठिण आहे... त्या आधिचा 'लेट गो' चा ट्प्पा तरी जमला पाहिजे Happy

लोकाला समजवुन सांगणे हे खुप सोपे असते पण ते स्वतः आचरणात आणणे किती अवघड असते नाही>>>>> ... बरोबर आहे Happy ... मी आपला प्रयत्न करुन पाहतेय... तसे बरेच प्रयत्न करते/केलेत मी माझ्या रागा वर ताबा ठेवण्याचे Happy ... आता हा नवा प्रयत्न बघु या कोणता प्रयत्न यशस्वी ठरतो ते Happy

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो>>>>>..... सहिच Happy

आभार Happy

सास, तुम्ही लिहिलेले आवडले..
विषय नेहमीचा आहे,पण तुम्ही तुमची भाषा आणि अनुभव वापरुन ते अगदी फ्रेश करुन लिहिलेत.

------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

छान लिहिलं आहे.
आजच एक फॉर्वर्ड मेसेज आला होता.. त्याचाही अर्थ असाच काहीसा होता..
एक अर्धा भरलेला ग्लास (हे रूपक- आपल्या अपमानांचं, दु:खाचं, अस्वस्थतेचं इ) आपण हातात धरला १० मिनिटे- काय होईल? काही नाही
१ तास?- हात दुखायला लागेल
१ दिवस- हाताच्या शिरा बधीर होतील, हात पॅरलाईझ होईल
पण ग्लासचे वजन वाढले का? होते तसेच राहिले ना? पण आपण ते ओझं दिवसभर बाळगून आपला हात गमावण्याची परिस्थिती मात्र ओढवून घेतली. कश्यासाठी?
त्यापेक्षा तो ग्लास काम झालं की खाली ठेवा, तेव्हाच शक्य नसेल, तर दिवसाच्या शेवटीतरी नक्कीच ठेवा. नवीन दिवसाला नव्या आशेने, उत्साहाने सामोरे जा. आधीचे सर्व -जस्ट लेट गो Happy
-----------------------------------
Its all in your mind!

हे लेट गो वाले प्रवचन मी मागे एकदा SSY ह्या कोर्समध्ये ऐकले होते. मला माझ्या वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट फार उपयोगी पडते:
आपल्याला राग येतो म्हणजे दुसर्‍याने केलेल्या चुकीचा स्वतःला करुन घेतलेला मनःस्ताप. चूक करतो दुसरा, त्रास होतो आपल्याला. तेव्हा राग येणे हा मुर्खपणा.

चूक करतो दुसरा, त्रास होतो आपल्याला. तेव्हा राग येणे हा मुर्खपणा. >>>> बरोबर आहे. पण बर्‍याचदा कळतय पण वळत नाही टाइप होतं..

सास, लेख छान आहे..

छान आहे. मीही आता हेच ठरवलंय.. जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान! निदान मायबोलीवर तरी.. घरी जमणं जssssरा कठिण आहे पण जमेगा! Happy
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

सास, चान्गल लिहिलय Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सास चांगले लिहिले आहे. मला "तु" परत एकदा वाचायचय. पण पेज ओपन होत नाहिये Sad
--------------
नंदिनी
--------------

चूक करतो दुसरा, त्रास होतो आपल्याला. तेव्हा राग येणे हा मुर्खपणा. >>>> बरोबर आहे. पण बर्‍याचदा कळतय पण वळत नाही टाइप होतं.. >>>>>>अगदी बरोबर
सास , चान्गला लेख आहे.....बर्याचदा हे एकून / वाचून सोडून दिले जाते..पण सवय केली तर ते आप ल्याच फायद्याचे आहे....तेव्हा आजपासून लेट गो....घरीच सुरुवात करते...तिथेच जास्त गरज आहे....मलातरी

फुलराणी.

नंदिनी,
माझा 'तु' चा लेख ललित मध्ये दिसत नाही आहे. मी माझ्या पाउलखुणात जावुन शोधला तर मिळाला ही लिंक उघडेल कदाचित : http://www.maayboli.com/node/6312 (मी लेखात बदल केलाय... 'तु' च्या आणखी काही आठवणी टाकल्यात Happy )

चूक करतो दुसरा, त्रास होतो आपल्याला. तेव्हा राग येणे हा मुर्खपणा. >>>> बरोबर आहे. पण बर्‍याचदा कळतय पण वळत नाही टाइप होतं>>>>>>अगदी बरोबर >>>>..... १०००% सत्य Happy

घरीच सुरुवात करते...तिथेच जास्त गरज आहे....मलातरी.>>>>>.....मला ही Happy

मायबोली वर आल कि 'लेट गो' च पालन कारायची (घरात व सर्वत्र) स्वःताला आठवण (reminder) होईल ह्या कारणाने मायबोली वर हा लेख टाकला... आता घरात ही मी 'लेट गो' ची फलक जागो जागी लावयचा विचार करतेय... रागावर ताबा ठेवण्या साठी Happy

आभार Happy