सहवास

Submitted by कोमल मानकर on 4 October, 2017 - 01:49

सहवास....

    प्रिये होती रात्र सुमंधूर मी तुझ्या
    स्वप्नात विसावलो होतो,
    काजव्याच्या गिरट्या घालण्यात
    मी चांदण्या वेचत तुझ्यात हरवत होतो.....
    चंद्राच्या कोरीत तुझा चेहरा शोधत मी तुला 
    स्मरत होतो.....
    येशील पुन्हा घेशील मला मिठीत म्हणत रात्र
    तुझ्या विचारातच जगत होतो .....
    तुझ्या पाऊलखुणाचा पाठलाग करतं 
    मी पलायन करीत होतो,
    माझ्या जड अंतकरणाच्या व्यथा 
    एकट्यातच मी तुझ्याशी मांडीत होतो.......
    पावसाच्या सरीतही मी भिजतो एकटा 
    अश्रूधारांचा पुर लोटत तेव्हा हि स्मरतो तुला 
    आर्तह्रदयातून गुलाबांच्या फुलाचा गंध तुला 
    खुप आवडतो म्हणून बोचणार्या काट्याचा 
    विचार न करता आणतो मी तोडून तुझ्यासाठी
    बोचणार्या काटयाकडे नसतेच कसले भान ,
    रक्ताच्या वाहणार्या धारेतून बनते 
    तुझ्यावर नवे काव्य छान.......
    मी जगतो आजही आपल्या त्या 
    सहवासात तुझ्या येण्याच्या दिशाहीन 
    मार्गाकडे टक लावत तुझी वाट बघतं
    बघशिलं ना प्रिये मागे वळून एकदा???
    आपल्या सहवासाच्या त्या करूण कहाण्या 
    न राहून होतात गं ताज्या ह्रदयस्पर्शी 
    माझ्या वेड्या मनातून.........

कवयित्री:-कोमल प्रकाश मानकर
          विजय कॉलनी ,सिंन्दी रेल्वे .जि.वर्धा
          Email I'd :- Mankar123komal@gmail.com
    
     
  
    
   

  

Group content visibility: 
Public - accessible to all site users