राख थंडावताना

Submitted by कुणी दिवाणा on 1 October, 2017 - 16:26

चाल मंदावलेली
वाट रुंदावताना
झाड हरवुन गेले
रोपटे लावताना

बोलके श्वास माझे
मुक्यासारखेच होते
धाप संचारलेली
दु:ख होकारताना

किनारे पुन्हा नदीचे
दिसले कुठेच नाही
वाहुन पार गेलो
पोहुन पाहताना

सावल्या तापलेल्या
संतापुनी निघालो
उसासेही पोळलेले
दिलासेच माळताना

कोणती आग होती
कोण आगीत होते
शेवटी गीत झाले
राख थंडावताना

Group content visibility: 
Use group defaults