विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-४

Submitted by अतरंगी on 1 October, 2017 - 01:14

भाग 3:- https://www.maayboli.com/node/64031

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised.

स्त्रियांनी, मुलींनी, 18 वर्षाखालील सर्वांनी हा भाग स्कीप करावा ही नम्र विनंती Happy

"तू 32 GB चे मेमरी कार्ड कशाला घेतो आहेस ? " 

"अगं फोनची मेमरी कमी पडते, गाणी वगैरे ठेवता येत नाहीयेत मोबाईल मध्ये"

" तू आणि तुझे ते येडछाप मित्र जी गाणी ऐकता, त्यावर एक तर मुळात बंदी असायला पाहिजे. शिवाय असून असून ती सगळी गाणी २ ते ३ GB पेक्षा जास्त नसतील. त्या साठी 32 GB चे मेमरी कार्ड कशाला लागतं? आणि तुझ्या मोबाईलची मेमरी आधीच 16 GB आहे. "

च्यायला, या बायकांना कोणी mind ur own business हे वाक्य शिकवलेलेच नसते का ? मी आता साधे मेमरी कार्ड घेताना पण capital purchase सारखी जस्टीफिकेशन लिहून मॅनेजमेंट अप्रुव्हल घ्यायचे का ? आता असतात काही मेन्स सिक्रेट, त्यासाठी लागते थोडी फार स्टोरेज स्पेस आणि आताच्या HD च्या काळात तर खूपच. पण आता हे बायकांना कोण समजून सांगणार? काय थाप मारावी ? 

" अगं नित्याने आमच्या प्लेलिस्टमधल्या सगळ्या गाण्यांचे व्हिडीओ डाउनलोड केले आहेत, मला ते कॉपी करायचे आहेत." येस्स, वेळेवर अशी थाप सुचावी यापेक्षा भारी फिलिंग जगात कोणतेही नसते. 

"तुम्ही वाट बघतोय रिक्षावाला, पप्पी दे पारूला, बाबा लगीन, रेतीवाला नवरा, बेबी ब्रिन्ग इट ऑन या असल्या गाण्यांचे व्हिडीओ डाउनलोड करून मोबाईल मध्ये ठेवणार आहात ???? " थाप असो किंवा काही असो पण यात इतके इरिटेट होण्यासारखे काय आहे ?

बायकोचा टोन ऐकून मला पण ही थाप मारल्याचा पश्चाताप झाला, पण जाऊ दे तिने होपलेस केस म्हणून विषय सोडून दिल्याने माझं 32 GB मेमरी कार्ड तरी आलं :डोमा: 

आजचा भाग आमच्या वयात असलेल्या हॉस्टेलाईट् मुलांनी (अंकल लोकांनी) मोबाईल आणि हार्डडिस्क कशी सांभाळावी तसेच नवविवाहित किंवा विवाहोत्सुक तरुणांना स्वतःची इमेज डिसेंट कशी ठेवता येईल यासाठी समर्पित.... 

१. आपली हॉस्टेलची गाणी आणि प्लेलिस्ट कुठे तरी लपवून ठेवा. गाडीत एक आपला एक आणि घरच्यांसोबत ऐकायचा एक असे वेगवेगळे पेन ड्राइव्ह ठेवा. त्यात अर्जित सिंग, सोनू निगम वगैरे लोकांच्या फालतू, रटाळ, कंटाळवाण्या प्लेलिस्ट डाउनलोड करा. ती सहन करायची सवय लावून घ्या.

टीप:- शास्त्रीय संगीत वगैरे डुलक्या न काढता, अधून मधून मान डोलवत, "वाह/ क्या बात/ सुंदर " असले तुकडे फेकत  ऐकू शकलात तर nothing like it.... 

२.व्हाट्सअप मधील ऑटो डाउनलोड बंद करा. अविवाहित मित्र जुन्या मैत्रीला जागून काहीबाही फोटो, क्लिप पाठवतात. ते ऑटो डाउनलोड मोड मध्ये मुलांच्या हातात मोबाईल असताना डाउनलोड व्हायचा संभव असतो... 

(नोट:- अशा फोटो आणि क्लिप शेअर करण्यासाठी व्हाट्सअप्प पेक्षा टेलिग्राम हे अधिक उपयोगी आहे, असे एका मित्राने सांगितले. कोणी वापर करून आम्हाला फीडबॅक दिल्यावर पुढच्या आवृत्ती मध्ये वि.सू टाकण्यात येईल. )

३. गॅलरी मधले सगळे आक्षेपार्ह फोटो, क्लिप्स या whatsapp>media>videos>sent या फोल्डर मध्ये ठेवा. दुसरीकडे ठेवणार असला तर no media ची फाईल त्या फोल्डर मध्ये टाका, म्हणजे मग त्या सगळ्या क्लिप/फोटो गॅलरी मध्ये दिसत नाहीत.  

४. हार्ड डिस्क मधील " सुट्टा ना मिला, एक्सेल की कुडीया" वगैरे गाणी डिलिट करा. वगैरे मध्ये कोणती गाणी येतात हे इंजिनिअरिंग केलेल्या, हॉस्टेल वर राहीलेल्या मुलांना सांगायची गरज नाही.  

५. रात्री 10 नंतर फोन सायलेंट वर टाकायची सवय लावून घ्या. प्यायला बसलेले मित्र, न पिणारे पण किडे असणारे मित्र उगीच, "च्यायला, लाव रे त्या xxx ला फोन" असे म्हणून फोन करतात. बायकोची नाहीतर बाळाची झोप मोड होते आणि पुढचे काही दिवस घरातली शांतता भंग पावते. 

६. जुन्या गर्ल फ्रेंड्स चे, कधी काळी ज्यांना stalk केलं होतं त्या मैत्रिणींचे नंबर, ईमेल, मेसेज ब्लॉक/डिलिट करा. ईमेलच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन त्यांचे ईमेल आयडी डिलिट करा. आज काल चे स्मार्ट फोन तुमच्या ईमेल कॉन्टॅक्ट फोन नंबरशी sync असतात त्यामुळे तो आयडी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये अवतरु शकतो. 

७. फेसबुकवर जुने, पिऊन लोळताना/रांगताना टाकलेले फोटो डिलिट करा. गोव्याचे हार्ड डिस्क मधले फोटो एका सेपरेट कधीही हाताला लागणार नाहीत अशा फोल्डर मध्ये टाका. 

८. तरुणपणी घरचा कम्प्युटर वापरून झाला की browser history साफ करून तिथे काही कामाच्या, अभ्यासाच्या वेबसाईट उघडून ठेवयची जी सवय हॉस्टेल वर मोडून पडली होती ती परत लावून घ्या. यापेक्षा सोप्पा पर्याय म्हणजे, आपल्यासारख्या.... सॉरी 'तुमच्यासारख्या'... ठर्कि लोकांसाठी आता  incognito mode सारखे पर्याय आले आहेत. ते कसे वापरायचे ते शिकून घ्या. 

९. युट्युब मध्ये सेटिंग मध्ये जाऊन Pause watch history, pause search history हे पर्याय सिलेक्ट करून ठेवा. 

१०. तुमचा फोन गाडीतील ब्लुटूथ सोबत sync करू नका. केलात तरी फोन बुक शेअर करू नका. 

माझ्या एका मित्राच्या स्क्रीन वर  "chxxxx calling...." असे आले होते.

वि.सु. :- कोणताही फोन गाडी चालवत आहात/दुसरे काही काम चालू आहे म्हणुन स्पीकरवर टाकू नका किंवा उचलू नका.

क्रमशः

भाग ५:- https://www.maayboli.com/node/64316

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी बाबा की जय हो. आजची रिव्हीजन छान झाली.
आजकाल मोबाईलला OTG केबलने मेमरी कार्ड कनेक्ट करता येते. सुज्ञास वेगळे न सांगणे लागे.

८. तरुणपणी घरचा कम्प्युटर वापरून झाला की browser history साफ करून तिथे काही कामाच्या, अभ्यासाच्या वेबसाईट उघडून ठेवयची जी सवय हॉस्टेल वर मोडून पडली होती ती परत लावून घ्या.
>>>

हे सगळ्यात भारी. लै हसलो. यावर एक से एक किस्से आहेत स्वतःचे, मित्रांचे.

आजकाल मोबाईलला OTG केबलने मेमरी कार्ड कनेक्ट करता येते. >>>>

करून पाहतो. Wink

याच बरोबर आठवलेला दुसरा उपाय म्हणजे. सेटिंग मध्ये जाऊन मेमरी कार्ड deactivate/unmount करून ठेवणे. पाहिजे तेव्हा चालू करायचे आणि मग बंद करून ठेवायचे.

८. तरुणपणी घरचा कम्प्युटर वापरून झाला की browser history साफ करून तिथे काही कामाच्या, अभ्यासाच्या वेबसाईट उघडून ठेवयची जी सवय हॉस्टेल वर मोडून पडली होती ती परत लावून घ्या.
>>>
हे सगळ्यात भारी. हा भाग लईच आवडला