.. गर्दी

Submitted by अंबज्ञ on 30 September, 2017 - 08:40

.

.

गर्दीला चेहरा नसतो
खरंय .... पण
माणुसकीही नसेल का !
की असते फक्त चेष्टा वृत्ती
अफवांची पेरणी
आणि लुटावी त्यातून
विघातक मौजमस्ती...

गर्दीला स्व-मत नसते
खरंय ... पण
सारासार विचारशक्तिही नसेल का !
की असते फक्त हिंस्त्र वृत्ती
आणि निव्वळ अंदाधुंद
स्वार्थी बेफिकीरी...

गर्दीला अंकुश नसतो
खरंय ... पण
कदाचित पूर्वनियोजित असते का !
अनामिक बुरख्याआडील बंडाळी
खुर्चीचीच अजुन एक खेळी
अप्पलपोटी राजकारणी

काय असते ही गर्दी
?
विखुरलेली मनं
की ... दुरावलेली राहणी
आणि माणुसकी हरवलेली
कलेवरं यंत्रवत चालणारी
!

दंगलीतुन एकमेकांना
भोसकणारी आणि
विकृत कामांध स्पर्शाने
अंगचटीला येणारी
जीवंत लोक पायदळी तुडवत
शोक यात्रेला हिरीरीने जमणारी

सगळी कड़े अशीच असते का हो
ही गर्दी ... !!

― अंबज्ञ

.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान कविता लिहिलीय. मनाचा झालेला कोंडमारा जेव्हा असह्य होतो, तेव्हा कवितेच्या रूपाने तो कसा प्रगटतो याचे प्रत्यंतर दिसून आले.

धन्यवाद अक्षय, सचिनजी, कऊ, सायुरी आणि मनीमोहोर

खुपच वाईट घडलं एल्फिस्टनला आणि सचिनजी म्हणाले तसेच झालंय - मनाचा झालेला कोंडमारा जेव्हा असह्य होतो, तेव्हा कवितेच्या रूपाने प्रगटला