"मुक्ति"

Submitted by सेन्साय on 27 September, 2017 - 00:01

.

.

ओलेते मन ,
भिजेलेलं जीवन
पेटही न घेईना,
मरणाचे सारण

साथ मिळेना
नातं कळेना
काय चुकले
काही उमजेना

मुक्ति कुठे
अन चिता कुठे
विचार करायला
वेळ तरी कुठे

तू बसला
दगड होऊन
नाती राहिली
मजा बघून

जीव लावला
त्यातून एक गेला
इथे हिशेबाला
वेळ कोणाला

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर ...

अगदी मनाला भावणारी.... अन नि:शब्द करुन जाणारी आहे

सुंदर !

एक बदल
मरणाचे सारण ....मरणाचे सरण हवे का ?

हो दतात्रय Happy टायपो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

मरण्याची इच्छा तीव्र आहे अन त्याला अनुसरून कारणे सुद्धा जीवनात भरपूर आहेत ह्या कारणाना मुद्दाम येथे सारण म्हणून संबोधलं आहे जे आपल्या मनात ठासून भरलेली आहेत पण म्हणून लगेच तो अविचार कृतित आणणे नक्कीच सहज जमत नाही